व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची कृत्ये —थोर व आश्‍चर्यकारक

यहोवाची कृत्ये —थोर व आश्‍चर्यकारक

अध्याय ३१

यहोवाची कृत्ये —थोर व आश्‍चर्यकारक

दृष्टांत १०​—प्रकटीकरण १५:१–१६:२१

विषय: यहोवा आपल्या पवित्रस्थानी आहे; त्याच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओतल्या जातात

पूर्णतेचा काळ: १९१९ ते हर्मगिदोन

१, २. (अ) योहान कोणते तिसरे चिन्ह कळवतो? (ब) यहोवाच्या लोकांना देवदूतांच्या भूमिकेबद्दल फार पूर्वीपासून काय माहीत होते?

 एका मुलास जन्म देणारी स्त्री! त्या मुलास खाऊन टाकण्यास टपलेला मोठा अजगर! प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायात अत्यंत ठळकपणे चित्रित करण्यात आलेल्या या दोन स्वर्गीय चिन्हांनी, देवाच्या स्त्रीचे संतान आणि सैतान व त्याचे दुरात्मिक संतान यामधील युगानुयुगे असणारे वैर कळसास पोहंचल्याचे आपल्या लक्षात आणून दिले. या चिन्हांना ठळकपणे दाखवताना, योहान म्हणतोः “नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले . . . दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले.” (प्रकटीकरण १२:१, ३, ७-१२) आता योहान तिसरे चिन्ह कळवतोः नंतर मी अत्यंत आश्‍चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. सात पीडा घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले. त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्यायोगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.” (प्रकटीकरण १५:१) यहोवाच्या सेवकांसाठी या तिसऱ्‍या चिन्हाचाही अत्यंत महत्त्वपूर्ण अर्थ आहे.

देवाच्या इच्छेची पूर्णता करण्यामध्ये देवदूत पुन्हा जी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहेत त्याकडे लक्ष द्या. ही वस्तुस्थिती यहोवाच्या सेवकांनी पुष्कळ आधीच ओळखली आहे. प्राचीन काळातील स्तोत्रकर्त्याने प्रेरित होऊन अशा स्वर्गीय दूतांसोबत बोलणी केली व त्यांना आर्जविलेः “अहो परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्‍न आहा आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा”! (स्तोत्र १०३:२०) आता, या नव्या दृश्‍यात, देवदूतांना शेवटल्या सात पीडांना ओतण्याची नेमणूक मिळाली आहे.

३. सात पीडा काय आहेत आणि त्यांचे ओतणे काय सूचित करते?

या पीडा काय आहेत? त्या सात कर्ण्यांच्या नादाप्रमाणे दुखावणाऱ्‍या न्यायदंडाच्या घोषणा आहेत; त्या या जगाच्या विविध गोष्टींबद्दल यहोवाचे दृष्टिकोन प्रदर्शित करतात आणि त्याच्या न्यायी निर्णयाचा शेवट जाहीर करतात. (प्रकटीकरण ८:१–९:२१) यांना ओतणे हे, त्या न्यायदंडाच्या अंमलबजावणीस सूचित करते. त्यावेळी, यहोवाच्या क्रोधरुपी अग्निमय दिवसात त्याच्या क्रोधाने सर्वकाही भस्मसात होईल. (यशया १३:९-१३; प्रकटीकरण ६:१६, १७) याद्वारे, ‘देवाचा क्रोध पूर्ण होतो.’ तथापि, ती ओतण्याची क्रिया घडण्याआधी, योहान आम्हाला अशा काही लोकांची माहिती देतो, ज्यांना त्याकडून काहीएक इजा होणार नाही. या लोकांनी श्‍वापदाची खूण धारण करण्याचे नाकारले म्हणून, ते निष्ठावंत जन यहोवाच्या दिवसाचा सूड घेण्याची घोषणा करीत असता, त्याची स्तुती करीत आहेत.—प्रकटीकरण १३:१५-१७.

मोशेचे व कोकऱ्‍याचे गीत

४. आता योहानापुढे कोणते दृश्‍य येते?

आता एक भव्य दृश्‍य योहानापुढे येतेः मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काही तरी माझ्या दृष्टीस पडले; श्‍वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक हातात देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.प्रकटीकरण १५:२.

५. ‘अग्निमिश्रित काचेचा समुद्र’ याद्वारे काय चित्रित करण्यात आले आहे?

योहानाने पाहिलेला हा ‘काचेचा समुद्र’ तोच आहे जो त्याने आधी देवाच्या सिंहासनापुढे पाहिला होता. (प्रकटीकरण ४:६) तो शलमोनाच्या मंदिरातील “गंगाळसागर” (पाणी साठवण्याचे भांडे) या सारखाच होता, जेथे याजकांना स्वतःला शुद्ध करण्यासाठी पाणी मिळत होते. (१ राजे ७:२३) येशू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या याजकीय मंडळीला ज्याने शुद्ध करतो त्या देवाच्या वचनाचे, ‘जलस्नानाचे’ ते सुंदर प्रतीक आहे. (इफिसकर ५:२५, २६; इब्रीयांस १०:२२) हा काचेचा समुद्र “अग्निमिश्रित” आहे, याचा हा अर्थ आहे की, त्या अभिषिक्‍त जनांना पारखले जाते व ते त्यांच्यासाठी असणाऱ्‍या उच्च दर्जांचे पालन करतात तसे त्यांना शुद्ध करण्यात येते. यासोबत आम्हाला याचेही स्मरण घडवले जाते की, देवाच्या वचनात सुद्धा देवाच्या शत्रूंविरुद्ध अग्निमय न्यायदंड सामावण्यात आलेले आहेत. (अनुवाद ९:३; सफन्या ३:८) यापैकीचे काही अग्निमय न्यायदंड आता ओतल्या जाणाऱ्‍या सात पीडेत आहेत.

६. (अ) स्वर्गातील काचेच्या समुद्रापुढे उभे असलेले गायक कोण आहेत आणि आपल्याला ते कसे समजले? (ब) ते कोणत्या अर्थाने ‘जय मिळवून’ आले आहेत?

शलमोनाच्या काळी असणारे गंगाळ सागर हे याजकांच्या उपयोगासाठी ठेवण्यात आलेले होते हे पाहता, काचेच्या समुद्रापाशी उभे असणारे गायक हे याजकवर्गातील आहेत हे कळते. त्यांच्यापाशी “देवाच्या वीणा” आहेत; या कारणामुळे ते २४ वडील व १,४४,००० आहेत असे आपण म्हणू शकतो, कारण हे गट देखील वीणा घेऊन गात आहेत. (प्रकटीकरण ५:८; १४:२) योहानाने पाहिलेले गायक “श्‍वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक” आहेत. या कारणामुळे ते, पृथ्वीवर शेवटल्या काळी राहणारे १,४४,००० मधील अवशिष्ट असावेत. एक गट असे ते विजयाने पुढे येतात. १९१९ पासून ७० पेक्षाही अधिक वर्षे ते, श्‍वापदाची खूण धारण करण्याचे किंवा त्याच्या मूर्तीकडे मानवाची शांतीची एकमात्र आशा या नात्याने पाहण्याचे नाकारीत आलेले आहेत. यापैकीचे पुष्कळ जण मरणापर्यंत विश्‍वासू राहिले आहेत आणि आता स्वर्गात असल्यामुळे ते अद्याप पृथ्वीवर असणाऱ्‍या आपल्या बांधवांच्या गीताच्या मधूर आनंदाचा खास मागोवा घेत आहेत.—प्रकटीकरण १४:११-१३.

७. प्राचीन इस्राएलात वीणेचा वापर कसा होत होता आणि योहानाच्या दृष्टांतामधील देवाच्या वीणांनी आम्हावर कसा परिणाम करण्यास हवा?

या निष्ठावंत विजेत्यांपाशी देवाच्या वीणा आहेत. याबाबतीत, ते प्राचीन काळातील लेव्यांसारखे आहेत, जे गीत व वीणेद्वारे यहोवाची स्तुती आपल्या मंदिरात करीत. (१ इतिहास १५:१६; २५:१-३) वीणेवरील काव्य इस्राएलांच्या आनंदी गीतांना व यहोवास केलेल्या स्तुती व आभारप्रदर्शनांच्या प्रार्थनांना शोभा आणत होते. (१ इतिहास १३:८; स्तोत्र ३३:२; ४३:४; ५७:७, ८) त्रास व बंदिवासाच्या वेळी वीणेचा सूर कानी ऐकू येत नव्हता. (स्तोत्र १३७:२) या दृश्‍यात दिसत असलेल्या देवाच्या वीणांद्वारे आमच्या देवास विजयाचे स्तुतीगान, आभारप्रदर्शनाचे उच्चतम गीत गायिले जाण्याची आमची अपेक्षा अधिकच वाढवली पाहिजे. *

८. कोणते गीत गायिले जाते व त्याचे कोणते बोल आहेत?

हेच योहान आता कळवतोः ते देवाचा दास मोशे ह्‍याचे गीत, व कोकऱ्‍याचे गीत गाताना म्हणतातःहे प्रभू [यहोवा, NW] देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते [“सनातन राजा,” NW] तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो, [यहोवा] तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र [निष्ठावंत, NW] आहेस, आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करितील.’”प्रकटीकरण १५:३, ४.

९. या गीताला काही अंशी “मोशे ह्‍याचे गीत” असे का म्हटले आहे?

हे विजयी लोक “मोशे ह्‍याचे गीत” गात आहेत, याचा हा अर्थ आहे की, ते मोशेने अशा विजयाच्या परिस्थितीत जे गीत गायिले त्याच्यासारखेच आहे. इस्राएल लोकांनी मिसरात दहा पीडांचा अनुभव घेतला व त्यानंतर त्यांनी तांबड्या समुद्रात मिसरी सैन्याला बुडताना पाहिले तेव्हा मोशेने त्यांना यहोवाची स्तुती समाविष्ट असलेले विजयी गीत गाण्याचे नेतृत्व केले व म्हटलेः “परमेश्‍वर [यहोवा, NW] युगानुयुग राज्य करील.” (निर्गम १५:१-१९) तर मग, श्‍वापदापासून विजय मिळवणाऱ्‍या तसेच सात पीडांची घोषणा करण्यात समाविष्ट असणाऱ्‍यांनी या योहानाच्या दृष्टांतात ‘सनातन राजाची’ स्तुती गाणे हे देखील किती योग्य आहे!—१ तीमथ्य १:१७.

१०. मोशेने आणखी कोणत्या गीताची रचना केली आणि या गीतातील शेवटले कवन आजच्या मोठ्या लोकसमुदायाशी कसे संबंधित आहे?

१० तसेच कनानावर विजय मिळविण्याच्या तयारीत असताना वृद्ध झालेल्या मोशेने रचलेल्या एका गायनाद्वारे इस्राएल राष्ट्राला असे संबोधिलेः “मी परमेश्‍वराच्या नावाची [यहोवा, NW] घोषणा करीन; आमच्या देवाची महति वर्णा!” या गीताच्या शेवटल्या वचनांनी देखील इस्राएलेत्तर लोकांना उत्तेजन दिले आणि मोशेचे हे प्रेरित वचन आजच्या मोठ्या लोकसमुदायापर्यंत येऊन पोहंचतातः “राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा.” पण यांनी तो जयजयकार का करावा? कारण यहोवा आता “आपल्या सेवकांच्या रक्‍तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील.” या नीतीमान न्यायदंडाची अंमलबजावणी ही यहोवावर आशा ठेवणाऱ्‍या सर्वांना आनंद व हर्ष देईल.—अनुवाद ३२:३, ४३; रोमकर १५:१०-१३; प्रकटीकरण ७:९.

११. योहानाने ऐकलेल्या गीताची अजूनही कशी पूर्णता होत आहे?

११ आजच्या काळी स्वर्गीय समूहासोबत “सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करितील” हे गीत गाण्यात मोशेला स्वतः केवढा आनंद वाटला असता! त्या श्रेष्ठ गीताची आज मोठी अद्‌भुत पूर्णता होत आहे हे, केवळ दृष्टांतात नव्हे, तर खऱ्‍या अर्थाने दिसते; कारण ‘राष्ट्रांमधून’ लाखो जन यहोवाच्या पृथ्वीवरील संघटनेकडे आनंदाने झुंडीने येत आहेत.

१२. विजेत्यांचे गीत “कोकऱ्‍याचे गीत” देखील कसे आहे?

१२ तरीदेखील हे केवळ मोशेचे गीत नसून “कोकऱ्‍याचे गीत” देखील आहे. ते कसे? मोशे हा इस्राएलांमध्ये यहोवाचा संदेष्टा होता पण स्वतः मोशेनेच, त्याच्या स्वतःसारख्या आणखी एका संदेष्ट्याचा उदय यहोवा करील असे भाकीत केले. हा कोकरा, येशू ख्रिस्त असल्याचे सिद्ध झाले. मोशे हा “देवाचा दास” होता पण येशू तर देवाचा पुत्र होता, यास्तव तो थोर मोशे आहे. (अनुवाद १८:१५-१९; प्रेषितांची कृत्ये ३:२२, २३; इब्रीयांस ३:५, ६) या कारणामुळे, गायक “कोकऱ्‍याचे गीत” देखील गात आहेत.

१३. (अ) येशू मोशेपेक्षा श्रेष्ठ असला तरी तो त्याच्यासारखा कसा आहे? (ब) आपण त्या गायकांसोबत कसे समाविष्ट होऊ शकू?

१३ मोशेप्रमाणेच येशूनेही देवाची जाहीरपणे स्तुती गायिली व त्याच्या सर्व शत्रूंवर तो विजय मिळवणार असल्याचे भाकीत केले. (मत्तय २४:२१, २२; २६:३०; लूक १९:४१-४४) राष्ट्रे सामोरी येऊन यहोवाची स्तुती गातील, त्या काळाकडे येशूने देखील दृष्टिक्षेप टाकला आणि हे शक्य व्हावे यासाठी त्याने स्व-बलिदान करणारा “देवाचा कोकरा” असे आपल्या जीवनाचे अर्पण दिले. (योहान १:२९; प्रकटीकरण ७:९; पडताळा यशया २:२-४; जखऱ्‍या ८:२३.) जसे मोशेने देवाचे नाव जाणले व त्याला गौरव दिले तसेच येशूनेही देवाचे नाव प्रदर्शित केले. (निर्गम ६:२, ३; स्तोत्र ९०:१, १७; योहान १७:६) यहोवा निष्ठावंत देव असल्यामुळे त्याचे सर्व वैभवी भविष्यवाद पूर्ण होण्याची हमी आहे. या कारणामुळेच आम्ही त्या सर्व निष्ठावंत गायकांसोबत, कोकऱ्‍यासोबत आणि मोशेसोबत हे गीत गाण्यात आपला सूर मिळवतो की, “हे प्रभो, [यहोवा NW] तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?”

वाट्या घेतलेले देवदूत

१४. पवित्र स्थानातून कोणास बाहेर पडल्याचे योहान बघतो आणि त्यांना काय देण्यात येते?

१४ विजेत्या अभिषिक्‍तांचे गीत आपण ऐकावे हे योग्यच आहे. ते का? कारण ते, देवाच्या क्रोधांनी भरलेल्या वाट्यातील न्यायदंड आहेत, ज्यांची पृथ्वीवर घोषणा केली गेलेली आहे. पण तो क्रोध ओतण्यास मानवापेक्षा अधिकाची गरज असणार व हेच योहान पुढे कळवतोः नंतर मी पाहिले, तेव्हा साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर [पवित्र स्थान, NW] उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी, तागाची वस्त्रे परिधान केलेले व छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे, सात पीडा घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले. त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणाऱ्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांस दिल्या.प्रकटीकरण १५:५-७.

१५. पवित्र स्थानातून सात देवदूत बाहेर येतात हे का आश्‍चर्याचे नाही?

१५ स्वर्गीय गोष्टींचे प्रतिरूप असलेल्या इस्राएलाच्या मंदिरी, केवळ प्रमुख याजक परमपवित्र स्थानात जात असे, येथे या स्थानाला ‘मंदिर’ [पवित्र स्थान, NW] असे म्हटले आहे. (इब्रीयांस ९:३, ७) ते यहोवाच्या स्वर्गातील उपस्थितीच्या स्थानाचे प्रतिनिधीत्व करते. तथापि, या स्वर्गामध्ये केवळ प्रमुख याजक येशू ख्रिस्ताला नव्हे, तर देवदूतांनाही प्रवेश करण्याची सुसंधी आहे. (मत्तय १८:१०; इब्रीयांस ९:२४-२६) यास्तव, स्वर्गातील पवित्र स्थानातून सात देवदूत येत आहेत हे बघून आपणाला आश्‍चर्य वाटू नये. त्यांना प्रत्यक्षात यहोवा देवाकडून ही आज्ञा आहेः देवाच्या क्रोधांनी भरलेल्या वाट्या ओतून द्या.—प्रकटीकरण १६:१.

१६. (अ) ते सात देवदूत आपल्या कामासाठी योग्य आहेत हे कसे दिसते? (ब) लाक्षणिक वाट्या ओतण्याच्या मोठ्या कामात इतरांचाही समावेश आहे हे कसे सूचित होते?

१६ या कामासाठी हे देवदूत अगदीच पात्र आहेत. ते स्वच्छ, तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान करून आहेत. याद्वारे ते, आध्यात्मिक रितीने शुद्ध व यहोवाच्या दृष्टिने पवित्र, नीतीमान आहेत. याप्रमाणेच ते उरावरुन सोन्याचा कमरबंद घालून आहेत. कमरबंद हा बहुधा जेव्हा काम पूर्ण करण्यास घेतात तेव्हा बांधला जातो. (लेवीय ८:७, १३; १ शमुवेल २:१८; लूक १२:३७; योहान १३:४, ५) अशाप्रकारे नेमणूकीची पूर्तता करण्यासाठी देवदूत सिद्ध झालेले आहेत. त्यांचे हे कमरबंद सोन्याचे आहेत. प्राचीन काळच्या निवासमंडपात सोने हे ईश्‍वरी, स्वर्गीय गोष्टींना सूचित करण्यासाठी वापरण्यात येत होते. (इब्रीयांस ९:४, ११, १२) याचा अर्थ हा की, या देवदूतांना कार्य पूर्ण करण्याची मोलवान, ईश्‍वरी आज्ञा आहे. या मोठ्या कामात इतरांचाही समावेश आहे. चार प्राण्यांपैकी एकजण त्या वाट्या या दूतांना देतो. हा पहिला प्राणी, जो दिसावयाला सिंहासारखा व ज्याचा अर्थ धैर्य, तोच यहोवाचे न्यायदंड घोषित करण्यासाठी लागणारे मनोधैर्य याला सूचित करणारा असावा.—प्रकटीकरण ४:७.

यहोवा आपल्या पवित्र स्थानी

१७. योहान आपल्याला पवित्रस्थानाबद्दल काय सांगतो व हे आम्हाला प्राचीन इस्राएलांच्या पवित्रस्थानाबद्दल कसे स्मरण देते?

१७ शेवटी या दृष्टांताची पूर्णता सांगताना योहान म्हणतोः तेव्हा देवाचे तेज व पराक्रम ह्‍यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा संपेपर्यंत कोणालाहि मंदिरात जाता आले नाही.” (प्रकटीकरण १५:८) इस्राएलांच्या इतिहासात खऱ्‍या पवित्र स्थानावर मेघाची छाया येत असे, तेव्हा यहोवाच्या वैभवाचे हे दर्शन, याजकांना तेथे जाण्यापासून प्रतिबंध करीत असे. (१ राजे ८:१०, ११; २ इतिहास ५:१३, १४; पडताळा यशया ६:४, ५.) हे असे काळ होते जेव्हा यहोवा पृथ्वीवरील घडामोडींत क्रियाशीलपणे समाविष्ट झाला होता.

१८. सात देवदूत यहोवास आपला अहवाल देण्यास केव्हा परततील?

१८ आजही ज्या गोष्टी या पृथ्वीवर होत आहे त्याबद्दल यहोवा गाढ आस्था बाळगून आहे. सात देवदूतांनी आपली कामगिरी पूर्ण करावी अशी त्याची इच्छा आहे. हा स्तोत्र ११:४-६ मध्ये वर्णिण्यात आलेल्या न्यायदंडाच्या कळसाचा काळ आहे. तेथे म्हटले आहेः “परमेश्‍वर [यहोवा, NW] आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्‍वराचे [यहोवा, NW] राजासन स्वर्गात आहे; त्याचे नेत्र मानवांस पाहतात. त्याच्या पापण्या त्यांस अजमावितात. परमेश्‍वर [यहोवा, NW] नीतिमानाला कसास लावितो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो. दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील. अग्नि, गंधक व दाहक वारा ह्‍यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.” दुष्टांवर त्या सात पीडा ओतण्याचे संपेपर्यंत, ते सात देवदूत यहोवाच्या त्या वैभवी स्थानाकडे परतणार नाहीत.

१९. (अ) कोणती आज्ञा दिली जाते आणि कोणाद्वारे? (ब) लाक्षणिक वाट्यांचे ओतणे केव्हापासून सुरू झाले असावे?

१९ आता एक भयानक आज्ञा निनादतेः नंतर मी मंदिरातून [“पवित्र स्थानातून,” NW] निघालेली एक मोठी वाणी ऐकली; ती त्या सात देवदूतांस म्हणालीःजा, देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.’” (प्रकटीकरण १६:१) ही आज्ञा कोण देतो? तो यहोवाच असला पाहिजे, कारण त्याच्या वैभवाचा प्रज्वलितपणा आणि सामर्थ्य यांनी कोणालाही पवित्र स्थानात जाण्यास मज्जाव केला होता. यहोवा आपल्या आध्यात्मिक मंदिरात १९१८ मध्ये न्याय करण्यासाठी आला. (मलाखी ३:१-५) आणि बहुधा, यानंतर काही वेळातच त्याने देवाच्या क्रोधाच्या वाट्या ओतण्याची आज्ञा दिली असावी. खरे म्हणजे, लाक्षणिक वाट्यातील न्यायदंडाची घोषणा १९२२ पासून अगदी प्रखरतेने होण्यास सुरवात झाली. आता या घोषणेचा सूर अधिक उत्कर्षाने वाढत आहे.

वाट्या व कर्ण्यांचे निनाद

२०. यहोवाच्या क्रोधाच्या वाट्या काय प्रकट करतात आणि काय इशारा देतात, तसेच त्या कशा ओतल्या जातात?

२० यहोवाच्या क्रोधाच्या वाट्या, यहोवाला जागतिक दृश्‍यातील प्रकार कसे वाटतात ते प्रकटवितात व तो त्यांच्यावर न्यायदंड आणणार असल्याचा इशारा देतात. देवदूत या वाट्या पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीच्या माध्यमाने ओततात. ते अभिषिक्‍त जन मोशेचे व कोकऱ्‍याचे गीत गाणारे आहेत. राज्याची सुवार्ता घोषित करीत असतानाच योहान वर्गाने क्रोधाच्या वाट्यातील अंतर्गत गोष्टींचे प्रकटन धैर्याने केले. (मत्तय २४:१४; प्रकटीकरण १४:६, ७) अशाप्रकारे, त्यांचा संदेश दुहेरी होता, म्हणजे, मानवजातीची सुटका होईल या नात्याने शांतीमय होता, तर “आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस” याबद्दलचा इशारा देण्यामध्ये तो युद्धासारखा पेटलेला होता.—यशया ६१:१, २.

२१. देवाच्या क्रोधाच्या पहिल्या चार वाट्यांचे लक्ष्य पहिल्या चार कर्ण्यांच्या नादासोबत कसे जुळणारे आहे आणि त्यात कोणता फरक आहे?

२१ देवाच्या क्रोधाच्या पहिल्या चार वाट्यांचे लक्ष्य, पहिल्या चार कर्ण्यांच्या निनादाचे जे लक्ष्य होते तेच, म्हणजे, पृथ्वी, समुद्र, नद्या, पाण्याचे झरे आणि आकाशातील प्रकाशाचा उगम हे होते. (प्रकटीकरण ८:१-१२) फरक एवढाच की, कर्ण्यांच्या निनादानुसार केवळ ‘तृतीयांशावर’ पीडा येणार होती पण आता देवाच्या क्रोधाच्या वाट्या ओतण्याचा सर्वांवर परिणाम होणार होता. अशाप्रकारे प्रभूच्या दिवसात, पहिल्यांदा “तृतीयांश” या अर्थाने ख्रिस्ती धर्मजगताकडे लक्ष देण्यात आले होते तरी आता, सैतानाच्या व्यवस्थेचा कोणताही भाग, यहोवाच्या न्यायदंडाच्या मनस्ताप देणाऱ्‍या संदेशापासून व त्यामुळे येणाऱ्‍या दुःखापासून वाचणार नव्हता.

२२. उरलेले तीन कर्ण्यांचे नाद कसे भिन्‍न होते आणि त्यांचा यहोवाच्या क्रोधाच्या उरलेल्या तीन वाट्यांशी कसा संबंध आहे?

२२ उरलेले तीन कर्ण्यांचे नाद भिन्‍न होते, कारण त्यांना अनर्थ म्हटले आहे. (प्रकटीकरण ८:१३; ९:१२) यातील पहिले दोन टोळ व स्वारांचे सैन्य याजशी संबंधित होते तर तिसऱ्‍याने यहोवाच्या राज्याच्या जन्माची घोषणा केली. (प्रकटीकरण ९:१-२१; ११:१५-१९) देवाच्या क्रोधाच्या राहिलेल्या तीन वाट्यात देखील यापैकीचे काही प्रकार असतील हे आपण पाहणारच आहोत पण ते तीन अनर्थांपासून काहीसे वेगळे आहेत. यास्तव, आपण आता, यहोवाच्या क्रोधाच्या वाट्या ओतल्यामुळे जे परिणाम घडले त्या नाट्यमय प्रस्तुतीकडे बारकाईने लक्ष देऊ या.

[तळटीपा]

^ योहान वर्गाने १९२१ मध्ये देवाची वीणा (इंग्रजी) हे अभ्यासिक साहित्य प्रकाशित केले हे लक्षात घेणे मनोरंजक आहे. याचे २० पेक्षा अधिक भाषेत ५० लाखापेक्षाही अधिक प्रतींमध्ये वितरण झाले. यामुळे अधिक अभिषिक्‍त गायकांना गोळा करण्यास मदत मिळू शकली.

[अभ्यासाचे प्रश्‍न]