येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी
सोमवार, २२ मार्च २०२७
यहोवाचे साक्षीदार वर्षातून एकदा येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळतात. हा विधी पाळण्याची आज्ञा येशूने दिली होती. त्याने म्हटलं होतं: “माझी आठवण म्हणून हे करत राहा.”—लूक २२:१९.
आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या कार्यक्रमाचं आमंत्रण देतोय.
सहसा विचारले जाणारे प्रश्न
कोणकोण येऊ शकतं?
कोणीही येऊ शकतं. तुमच्या मित्रांना, घरच्यांना आणि नातेवाईकांनाही तुम्ही सोबत आणू शकता.
हा कार्यक्रम किती वेळ चालेल?
जवळपास एक तास.
हा कार्यक्रम कुठे होईल?
तुमच्या जवळच्या ठिकाणी हा कार्यक्रम कुठे असणार आहे, हे माहीत करून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना संपर्क करा.
प्रवेश फी आहे का?
नाही.
वर्गणी गोळा केली जाईल का?
नाही. यहोवाचे साक्षीदार त्यांच्या सभांमध्ये कधीच वर्गणी गोळा करत नाहीत.—मत्तय १०:८.
तिथे विशिष्ट प्रकारचे कपडे घालून यायचंय का?
या कार्यक्रमासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घालायची गरज नाही. पण यहोवाचे साक्षीदार बायबलमध्ये दिलेला सल्ला पाळून कार्यक्रमाला शोभतील असे सभ्य आणि शालीन कपडे घालतात.
स्मारकविधीच्या कार्यक्रमात काय होणार आहे?
या कार्यक्रमात एक भाषण दिलं जाईल. त्यात येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं तसंच, देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलं आहे, त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे सांगितलं जाईल. या कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट गीत आणि प्रार्थनेने होईल.
जास्त माहिती हवी असेल तर हा लेख वाचा: “यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात?”
येणाऱ्या वर्षांमध्ये स्मारकविधी कधी साजरा केला जाणार आहे?
२०२७: सोमवार, २२ मार्च
२०२८: रविवार, ९ एप्रिल
२०२९: गुरुवार, २९ मार्च

