मराठी
यहोवाच्या साक्षीदारांविषयी?
https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1011228/univ/art/1011228_univ_sqr_xl.jpg

आमच्याविषयी

यहोवाचे साक्षीदार कोण आहेत?

आम्ही यहोवाचे साक्षीदार एका जागतिक धार्मिक संघटनेचा भाग आहोत. आम्ही निर्माणकर्ता आणि सर्वसमर्थ देव असलेल्या यहोवा देवाची उपासना करतो. (स्तोत्र ८३:१८; प्रकटीकरण ४:११) आम्ही ख्रिस्ती आहोत आणि असं मानतो, की येशू ख्रिस्त देवाचा मुलगा आहे आणि तारण त्याच्याकडूनच मिळू शकतं. (योहान ३:१६; प्रेषितांची कार्यं ४:१०-१२) आम्ही मानत असलेल्या गोष्टी फक्‍त बायबलवर आधारित आहेत. (२ तीमथ्य ३:१६) आमच्या विश्‍वासाबद्दल जाणून घ्यायला तुम्ही आमची वेबसाईट पाहू शकता आणि तुमच्या स्वतःच्या बायबलमधून तपासून पाहू शकता.

आमच्याबद्दल आणखी जाणून घ्यायला, यहोवाचे साक्षीदार—आम्ही कोण आहोत? हा व्हिडिओ पाहा.

गोळाबेरीज

ठिकाणांप्रमाणे माहिती

सहसा विचारले जाणारे प्रश्न

यहोवाचे साक्षीदार वाढदिवस का करत नाहीत?

वाढदिवसाचे समारंभ देवाला का आवडत नाहीत याची चार कारणं जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार रक्‍तसंक्रमण का स्वीकारत नाहीत?

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणि रक्‍तसंक्रमणाबद्दल बऱ्‍याच गैरसमजुती आहेत. आमच्या विश्‍वासाबद्दलचे सत्य जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती आहेत का?

स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या इतर धार्मिक गटांपेक्षा आम्ही वेगळे कसे आहेत हे जाणून घ्या.

आमच्याशी संपर्क साधा

भेटण्यासाठी विनंती करा

बायबलच्या एखाद्या प्रश्‍नावर चर्चा करा किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जास्त जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार यांच्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहा

आमच्या सभांबद्दल जाणून घ्या. तुमच्या घराजवळ कुठे सभा भरतात ते जाणून घ्या.

यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा

जगभरात पसरलेल्या आमच्या कार्यालयांशी संपर्क साधण्यासाठी माहिती.

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

तुमच्या घराजवळ शाखा कार्यालय कोठे आहे ते माहीत करून घ्या. तेथे टूर घेण्याच्या व्यवस्थेबद्दल जाणून घ्या.