व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार

भाषा निवडा मराठी

यहोवाचे साक्षीदार यांच्या मंडळीच्या सभा

आमच्या सभांबद्दल जाणून घ्या. तुमच्या घराजवळ कोणती मंडळी आहे ते जाणून घ्या.

तुम्हाला जवळ असलेले ठिकाण शोधा

आमच्या सभा कशा असतात?

यहोवाचे साक्षीदार आठवड्यातून दोन वेळा उपासनेकरता सभा आयोजित करतात. (इब्री लोकांस १०:२४, २५) या सभा सर्वांकरता खुल्या असून, या सभांमध्ये आम्ही बायबलमध्ये काय सांगितले आहे व त्यातील शिकवणींचा आपण जीवनात कशा प्रकारे उपयोग करू शकतो याचे परीक्षण करतो.

आमच्या सभांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या बहुतेक भागांत वर्गातील चर्चेप्रमाणे श्रोत्यांचाही सहभाग असतो. सभांची सुरुवात व शेवट गीत व प्रार्थनेने होतो.

आमच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असण्याची गरज नाही. आम्ही सर्वांना आमच्या सभांना येण्याचे आमंत्रण देतो. प्रवेश विनामूल्य आहे. वर्गणी कधीही मागितली जात नाही.