तीमथ्य याला पहिलं पत्र ४:१-१६

  • दुष्ट स्वर्गदूतांच्या शिकवणींबद्दल इशारा (१-५)

  • ख्रिस्ताचा चांगला सेवक होण्यासाठी सल्ला (६-१०)

    • शारीरिक प्रशिक्षण विरुद्ध देवाची भक्‍ती ()

  • तू देत असलेल्या शिक्षणाकडे लक्ष दे (११-१६)

 पण, प्रेरित वचन स्पष्टपणे सांगतं की भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा काही जण दिशाभूल करणाऱ्‍या प्रेरित संदेशांकडे+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या* शिकवणींकडे लक्ष देऊन विश्‍वास सोडून देतील. २  कारण ते खोटं बोलणाऱ्‍या अशा माणसांच्या ढोंगीपणाला बळी पडतील,+ ज्यांचा विवेक जणू तापलेल्या लोखंडाने डाग दिल्याप्रमाणे सुन्‍न झाला आहे. ३  ते लग्न करण्याची मनाई करतात+ आणि काही खाद्यपदार्थ न खाण्याची आज्ञा देतात.+ पण विश्‍वास ठेवणाऱ्‍यांनी+ आणि सत्याचं अचूक ज्ञान असलेल्यांनी हे खाद्यपदार्थ उपकारस्तुती करून खावेत, म्हणून स्वतः देवाने ते निर्माण केले आहेत.+ ४  कारण उपकारस्तुती करून स्वीकारली, तर देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही चांगलीच आहे.+ त्यामुळे कोणतीही गोष्ट नाकारली जाऊ नये.+ ५  कारण देवाच्या वचनाने आणि तिच्यावर केलेल्या प्रार्थनेने ती पवित्र होते. ६  बांधवांना हा सल्ला दिलास, तर तू ख्रिस्त येशूचा एक चांगला सेवक ठरशील. असा सेवक, ज्याचं विश्‍वासाच्या वचनांनी आणि तू काटेकोरपणे पाळत असलेल्या उत्तम शिकवणीने पोषण झालं आहे.+ ७  पण, म्हाताऱ्‍या बायका सांगतात तशा काल्पनिक, आणि देवाचा अनादर करणाऱ्‍या कथा कहाण्यांपासून दूर राहा.+ उलट, देवाच्या भक्‍तीचं ध्येय ठेवून त्याप्रमाणे स्वतःला प्रशिक्षित कर. ८  शारीरिक प्रशिक्षण* हे फक्‍त काही प्रमाणात उपयोगी आहे, पण देवाची भक्‍ती तर सर्व गोष्टींसाठी फायदेकारक आहे. कारण ती आताच्या जीवनाचं आणि येणाऱ्‍या जीवनाचंही अभिवचन देते.+ ९  हे वाक्य विश्‍वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे. १०  म्हणूनच आपण मेहनत आणि परिश्रम करतो.+ कारण आपण एका जिवंत देवावर आशा ठेवली आहे. तो सर्व प्रकारच्या लोकांचा,+ आणि खासकरून विश्‍वासू जनांचा तारणकर्ता आहे.+ ११  त्यांना या आज्ञा देऊन शिकवत राहा. १२  तुझ्या तरुण वयामुळे कोणीही तुला तुच्छ लेखणार नाही याची काळजी घे. त्याऐवजी, बोलण्यात आणि वागण्यात, तसंच प्रेम, विश्‍वास आणि शुद्धता या बाबतींत विश्‍वासू जनांसमोर एक चांगलं उदाहरण ठेव. १३  मी येईपर्यंत, सार्वजनिक वाचन,+ मार्गदर्शन* देणं आणि शिकवणं यांत स्वतःला वाहून घे. १४  वडीलवर्गाने तुझ्यावर हात ठेवले, तेव्हा एका भविष्यवाणीद्वारे जे दान तुला देण्यात आलं,+ त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. १५  या गोष्टींबद्दल खोलवर विचार* करत राहा; त्यांत अगदी गढून जा, म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल. १६  स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.+ या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असं केल्याने तू स्वतःला आणि जे तुझं ऐकतात त्यांनाही वाचवशील.*+

तळटीपा

किंवा “व्यायाम.”
किंवा “प्रोत्साहन.”
किंवा “मनन.”
किंवा “तारण मिळेल.”