प्रश्‍न १३

कामाबद्दल बायबल काय सांगतं?

“आपल्या कामात कुशल असलेला माणूस तू पाहिला आहेस का? तो सर्वसामान्य लोकांसमोर नाही, तर राजांसमोर उभा राहील.”

नीतिवचनं २२:२९

“चोरी करणाऱ्‍याने यापुढे चोरी करू नये. उलट, त्याने मेहनत करावी आणि आपल्या हातांनी प्रामाणिकपणे काम करावं, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्‍तीला देण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी असेल.”

इफिसकर ४:२८

“प्रत्येकाने खावं-प्यावं आणि आपल्या सगळ्या मेहनतीच्या फळाचा आनंद घ्यावा. ही देवाची देणगी आहे.”

उपदेशक ३:१३