योहानला झालेलं प्रकटीकरण २:१-२९

 इफिस इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला+ लिही: ज्याच्या उजव्या हातात सात तारे आहेत आणि जो सोन्याच्या सात दीपवृक्षांच्या मधून चालतो तो+ असं म्हणतो: २  ‘तुझी कार्यं, आणि तुझी मेहनत आणि धीर मला माहीत आहे. मला हेही माहीत आहे की वाईट माणसांना तू खपवून घेत नाहीस. तसंच, जे प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणवतात त्यांची तू परीक्षा घेतली+ आणि ते खोटे असल्याचं तुला दिसून आलं. ३  तू अजूनही धीर धरत आहेस; माझ्या नावासाठी तू टिकून राहिला आहेस+ आणि तू खचून गेला नाहीस.+ ४  तरीपण, एका गोष्टीसाठी मी तुला दोषी ठरवतो. ती म्हणजे, तुझं सुरुवातीचं प्रेम आता आटलं आहे. ५  म्हणून तू कुठून पडला आहेस ते आठव; पश्‍चात्ताप कर+ आणि तू सुरुवातीला केली होती तशी कार्यं कर. जर तू असं केलं नाहीस, तर मी तुझ्याकडे येईन आणि तू पश्‍चात्ताप केला नाहीस, तर+ मी तुझा दीपवृक्ष+ त्याच्या जागेवरून काढून टाकीन. ६  तरीसुद्धा, तुझी एक गोष्ट चांगली आहे, की तू निकलावच्या पंथाच्या कार्यांचा द्वेष करतोस;+ मीसुद्धा त्या कार्यांचा द्वेष करतो. ७  पवित्र शक्‍ती* मंडळ्यांना काय म्हणते, हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं:+ जो विजय मिळवेल त्याला+ मी देवाच्या सुंदर बागेत* असलेल्या जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ देईन.’+ ८  स्मुर्णा इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: ‘जो पहिला आणि शेवटला,’+ जो मेला होता आणि पुन्हा जिवंत झाला+ तो असं म्हणतो: ९  ‘तुझी संकटं आणि गरिबी मला माहीत आहे, पण तरीसुद्धा तू श्रीमंत आहेस.+ आणि जे मुळात यहुदी नसताना स्वतःला यहुदी म्हणतात त्यांनी केलेली निंदाही मला माहीत आहे. ती खरंतर सैतानाची सभा आहे.+ १०  तुला लवकरच जी दुःखं सहन करावी लागणार आहेत त्यांची भीती बाळगू नकोस.+ पाहा! तुमची पूर्णपणे परीक्षा व्हावी म्हणून सैतान* तुमच्यापैकी काहींना तुरुंगात टाकत राहील आणि दहा दिवस तुम्हाला संकट सोसावं लागेल. मरणापर्यंत विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.+ ११  पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते, हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं:+ जो विजय मिळवेल+ त्याला दुसऱ्‍या मृत्यूचा अनुभव येणारच नाही.’+ १२  पर्गम इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ लांब, धारदार, दुधारी तलवार आहे+ तो असं म्हणतो: १३  ‘तू कुठे राहत आहेस हे मला माहीत आहे. त्या ठिकाणी सैतानाचं राजासन आहे; आणि तरीसुद्धा तू माझ्या नावाला धरून ठेवलं आहेस.+ आणि तुमच्या शहरात, जिथे सैतान राहत आहे, तिथे माझा विश्‍वासू साक्षीदार+ अंतिपा याला ठार मारण्यात आलं,+ तेव्हासुद्धा तू माझ्यावर असलेला विश्‍वास नाकारला नाहीस.+ १४  पण काही गोष्टींसाठी मी तुला दोषी ठरवतो. तुमच्याकडे बलामच्या शिकवणीप्रमाणे+ चालणारे काही जण आहेत. त्या बलामने बालाकला+ इस्राएलच्या मुलांसमोर अडखळण ठेवायला शिकवलं होतं. हे यासाठी, की त्यांनी मूर्तींना अर्पण केलेल्या वस्तू खाव्यात आणि अनैतिक लैंगिक कृत्यं* करावीत.+ १५  त्याच प्रकारे, निकलावच्या पंथाच्या शिकवणीप्रमाणे चालणारेही तुझ्याकडे आहेत.+ १६  म्हणून पश्‍चात्ताप कर. जर तू असं केलं नाही, तर मी लवकरच तुझ्याकडे येईन आणि माझ्या तोंडातल्या लांब तलवारीने त्यांच्याशी लढाई करीन.+ १७  पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं:+ जो विजय मिळवेल+ त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्‍नातून काही देईन,+ आणि मी त्याला एक पांढरा खडा देईन. त्या खड्यावर एक नवीन नाव लिहिलं आहे आणि ज्याला तो खडा मिळतो, त्याच्याशिवाय ते नाव कोणालाही माहीत होणार नाही.’ १८  थुवतीरा इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला लिही: देवाचा मुलगा, ज्याचे डोळे आगीच्या ज्वालेसारखे+ आणि ज्याचे पाय शुद्ध तांब्यासारखे आहेत+ तो असं म्हणतो: १९  ‘मला तुझी कार्यं, तुझं प्रेम, तुझा विश्‍वास, तुझं सेवाकार्य आणि धीर माहीत आहे. तसंच, तुझी अलीकडची कार्यं तू पूर्वी केलेल्या कार्यांपेक्षा जास्त आहेत हेही मला माहीत आहे. २०  तरीपण मी या गोष्टीसाठी तुला दोषी ठरवतो, की ईजबेल नावाच्या त्या स्त्रीला तू खपवून घेतोस.+ ती स्वतःला संदेष्टी म्हणवते आणि माझ्या सेवकांना बहकवून त्यांना अनैतिक लैंगिक कृत्यं* करायला+ आणि मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी खायला शिकवते. २१  मी तिला पश्‍चात्ताप करण्याची संधी दिली, पण ती आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांबद्दल* पश्‍चात्ताप करायला तयार नाही. २२  पाहा! मी लवकरच तिला आजारपण देऊन अंथरुणाला खिळून टाकणार आहे. आणि ज्यांनी तिच्यासोबत व्यभिचार केला, त्यांनी तिच्यासारखीच कृत्यं केल्याबद्दल पश्‍चात्ताप केला नाही, तर मी त्यांना मोठ्या संकटांमध्ये पाडीन. २३  आणि तिच्या मुलांना मी भयंकर साथीच्या रोगांनी मारून टाकीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी गुप्त विचारांचं* आणि मनांचं परीक्षण करतो आणि मी तुमच्यापैकी प्रत्येकाला त्याच्या कार्यांप्रमाणे फळ देईन.+ २४  पण, थुवतीरा इथे असलेल्या इतरांना, म्हणजे जे या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत आणि “सैतानाच्या गहन गोष्टी”*+ ज्यांनी जाणून घेतल्या नाहीत त्या सर्वांना मी असं म्हणतो: मी तुमच्यावर आणखी कोणतंही ओझं लादत नाही. २५  पण तरीसुद्धा, मी येईपर्यंत, जे तुमच्याजवळ आहे ते घट्ट धरून ठेवा.+ २६  जो विजय मिळवेल आणि शेवटपर्यंत माझ्या कार्यांचं अनुकरण करेल, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन.+ २७  मला माझ्या पित्याकडून जसा अधिकार मिळाला आहे तसा तोसुद्धा लोहदंडाने लोकांवर अधिकार चालवेल+ आणि मातीच्या भांड्यांप्रमाणे त्यांचा चुराडा करेल. २८  आणि मी त्याला पहाटेचा तारा देईन.+ २९  पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’

तळटीपा

किंवा “नंदनवनात.”
शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अगदी मनातल्या भावनांचं.” शब्दशः “गुरदे.”
किंवा “ज्यांना लोक ‘सैतानाच्या गहन गोष्टी’ म्हणतात अशा गोष्टी.”