व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ८१

डोंगरावरचा उपदेश

डोंगरावरचा उपदेश

बारा प्रेषित निवडल्यानंतर येशू डोंगरावरून खाली उतरला. तो एका अशा ठिकाणी आला जिथे खूपसारे लोक एकत्र जमले होते. ते गालील, यहूदीया, सोर, सीदोन, सूरिया आणि यार्देनच्या पलीकडून आले होते. त्यांनी आपल्यासोबत आजारी लोकांना आणलं होतं. तसंच, त्यांच्यासोबत असेही काही होते ज्यांना दुरात्मे खूप त्रास देत होते. येशूने त्या सर्वांना बरं केलं. मग, तो डोंगराजवळ एका ठिकाणी बसला आणि जमलेल्या लोकांना शिकवू लागला. देवाचे मित्र बनण्याची आपली इच्छा असेल, तर आपण काय केलं पाहिजे हे त्याने लोकांना समजावून सांगितलं. त्याने सांगितलं, की आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच, आपण देवावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. पण, आपण जर इतरांवर प्रेम केलं नाही, तर आपण देवावरही प्रेम करू शकत नाही. म्हणून आपण सर्वांवर, अगदी आपल्या शत्रूंवरही प्रेम केलं पाहिजे. आपण कधीही भेदभाव करू नये.

येशूने म्हटलं: ‘तुम्ही फक्‍त आपल्या मित्रांवरच प्रेम करून चालणार नाही. तर आपल्या शत्रूंवरही प्रेम करणं गरजेचं आहे. तसंच, तुम्ही लोकांना मनापासून माफ केलं पाहिजे. तुमच्यावर कोणी रागवलं आहे हे तुम्हाला समजलं, तर लगेच जाऊन त्याची माफी मागा. लोकांनी तुमच्यासोबत जसं वागावं असं तुम्हाला वाटतं, तसं तुम्हीही त्यांच्यासोबत वागा.’

येशूने लोकांना भौतिक गोष्टींबद्दलही चांगला सल्ला दिला. त्याने म्हटलं: ‘खूप पैसे असण्यापेक्षा यहोवा देवासोबत आपली मैत्री असणं जास्त महत्त्वपूर्ण आहे. एक चोर तुमच्याजवळ असलेले पैसे चोरू शकतो. पण, यहोवा देवासोबत असलेली तुमची मैत्री कोणीही चोरू शकत नाही. काय खावं, काय प्यावं किंवा काय घालावं या गोष्टींबद्दल चिंता करत बसू नका. पक्ष्यांचंच उदाहरण घ्या. त्यांना खाण्यासाठी पुरेसं अन्‍न मिळेल, याची देव नेहमी काळजी घेतो. त्यामुळे हे लक्षात असू द्या, की तुमच्या गरजा काय आहेत हे यहोवाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून चिंता करू नका. कारण चिंता करून तुमच्या जीवनाचा आणखीन एक दिवस वाढणार नाही.’

येशूने जे शिकवलं ते याआधी कोणीही शिकवलं नव्हतं, हे लोकांच्या लक्षात आलं. सदूकी आणि परूशी या त्यांच्या धार्मिक गुरूंनीही, त्यांना अशा गोष्टी कधीच शिकवल्या नव्हत्या. पण, येशू हा एक महान शिक्षक का होता? कारण, तो जे काही शिकवायचा ते यहोवाकडून असायचं.

“माझं जू आपल्या खांद्यावर घ्या आणि माझ्याकडून शिका, कारण मी सौम्य मनाचा आणि नम्र आहे आणि तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल.”—मत्तय ११:२९