व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ५

बॅबिलोनमधला बंदिवास ते जेरूसलेमच्या वेशीची पुनर्बांधणी

बॅबिलोनमधला बंदिवास ते जेरूसलेमच्या वेशीची पुनर्बांधणी

बॅबिलोनमध्ये बंदिवासात असताना, इस्राएलांच्या विश्‍वासाची अनेकदा परीक्षा झाली. शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांना धगधगत्या भट्टीत टाकलं गेलं पण देवानं त्यांना जिवंत बाहेर आणलं. पुढे, मेदी आणि पर्शियन लोकांनी बॅबिलोनचा पाडाव केल्यानंतर, दानीएलाला सिंहांच्या गुहेत टाकलं गेलं. परंतु सिंहांची तोंडं बंद करून देवानं त्याचंही रक्षण केलं.

अखेरीस, पर्शियन राजा कोरेश यानं इस्राएलांना मोकळं केलं. बॅबिलोनला कैदी म्हणून नेल्यानंतर केवळ ७० वर्षांनी ते आपल्या मायदेशी परतले. जेरूसलेमला परत आल्यावर त्यांनी प्रथम ज्या गोष्टी केल्या त्यातली एक म्हणजे, यहोवाचं मंदिर बांधायची सुरवात. परंतु लवकरच शत्रूंनी त्यांचं काम थांबवलं. त्यामुळे, जेरूसलेमला परतल्यावर सुमारे २२ वर्षांनी त्यांनी एकदाचं मंदिर पूर्ण केलं.

त्यापुढे, मंदिर सुशोभित करण्यासाठी एज्रानं जेरूसलेमला केलेल्या प्रवासाबद्दल आपण शिकतो. ही गोष्ट, मंदिर बांधून झाल्यावर जवळपास ४७ वर्षांनी घडली. मग, एज्राच्या प्रवासानंतर १३ वर्षांनी, जेरूसलेमच्या मोडलेल्या वेशीची पुनर्बांधणी करायला नहेम्यानं मदत केली. भाग ५ मध्ये येथपर्यंतच्या १५२ वर्षांचा इतिहास आहे.

 

या विभागात

कथा ७७

ते दंडवत घालीनात

धगधगत्या आगीच्या भट्टीतून देव या तीन आज्ञाधारक तरुणांना वाचवेल का?

कथा ७८

भिंतीवरचं लिखाण

दानीएल संदेष्टा भिंतीवरच्या चार रहस्यमय शब्दांचा अर्थ सांगतो.

कथा ७९

सिंहांच्या गुहेत दानीएल

दानीएलला मृत्यूदंडाची शिक्षा मिळते. पण ही शिक्षा मिळण्यापासून स्वतःला वाचवणं त्याच्या हातात होतं का?

कथा ८०

देवाचे लोक बॅबिलोन सोडतात

पर्शियाच्या राजाने बॅबिलोन काबीज केलं तेव्हा एक भविष्यवाणी पूर्ण झाली, आणि आता आणखी एक पूर्ण होईल.

कथा ८१

देवाच्या मदतीवर भिस्त ठेवणं

इस्राएली माणसाचा नियम मोडून देवाची आज्ञा पाळतात. मग देव त्यांना आशीर्वाद देईल का?

कथा ८२

मर्दखय आणि एस्तेर

वश्‍ती राणी दिसायला सुंदर होती पण तरीही अहश्‍वेरोश राजाने तिच्या जागी एस्तेरला आपली नवीन राणी म्हणून निवडलं. पण का?

कथा ८३

जेरूसलेमच्या वेशी

भिंतीचं बांधकाम चालू असताना मग तो दिवस असो किंवा रात्र, इस्राएली लोकांना आपले भाले आणि तलवारी नेहमी सोबत ठेवायच्या होत्या.