व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २

देव कोण आहे?

देव कोण आहे?

१. आपण देवाची उपासना का केली पाहिजे?

खरा देव तोच आहे, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत. त्याला सुरुवातही नव्हती आणि त्याचा कधी अंतही होणार नाही. (स्तोत्र ९०:२) बायबलमधला आनंदाचा संदेश त्यानेच आपल्याला दिला आहे. (१ तीमथ्य १:११) देवाने आपल्याला जीवन दिलं आहे आणि म्हणून आपण फक्‍त त्याचीच उपासना केली पाहिजे.—प्रकटीकरण ४:११ वाचा.

२. देव कशाप्रकारची व्यक्‍ती आहे हे आपण कसं जाणून घेऊ शकतो?

आपण देवाला पाहू शकत नाही, कारण तो अदृश्‍य आहे आणि स्वर्गात राहतो. (योहान १:१८; ४:२४) देव अदृश्‍य असला, तरी तो कशाप्रकारची व्यक्‍ती आहे हे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून आपण जाणून घेऊ शकतो. जसं की, त्याने वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि फुलं निर्माण केली आहेत. यावरून आपल्याला कळतं, की तो प्रेमळ आणि बुद्धिमान आहे. तसंच, हे अफाट विश्‍व पाहून आपल्याला कळतं, की तो किती शक्‍तिशाली आहे!—रोमकर १:२० वाचा.

देव कशाप्रकारची व्यक्‍ती आहे हे आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, बायबल वाचणं. उदाहरणार्थ, देवाला काय आवडतं आणि काय आवडत नाही, याबद्दल बायबल आपल्याला सांगतं. तसंच, तो लोकांशी कसा व्यवहार करतो आणि वेगवेगळ्या परिस्थितींत कसं वागतो हेही ते आपल्याला सांगतं.—स्तोत्र १०३:७-१० वाचा.

३. देवाचं नाव काय आहे?

येशूने म्हटलं, “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.” (मत्तय ६:९) जरी देवाला बऱ्‍याच पदव्या असल्या, तरी त्याला फक्‍त एकच नाव आहे. प्रत्येक भाषेत या नावाचा वेगवेगळ्या प्रकारे उच्चार केला जातो. मराठीत या नावाचा उच्चार सहसा “यहोवा” असा केला जातो. पण काही लोक “याव्हे” असाही त्याचा उच्चार करतात.—स्तोत्र ८३:१८ वाचा.

बऱ्‍याच बायबलमधून देवाचं नाव काढून, त्याठिकाणी प्रभू किंवा परमेश्‍वर यांसारख्या पदव्या वापरण्यात आल्या आहेत. पण मुळात जेव्हा बायबल लिहिण्यात आलं, तेव्हा त्यात जवळजवळ ७,००० वेळा देवाचं नाव होतं. येशूने लोकांना देवाबद्दल शिकवलं, तेव्हा त्याने त्यांना देवाचं नावही सांगितलं.—योहान १७:२६ वाचा.

देवाला नाव आहे का? हा व्हिडिओ पाहा

४. यहोवाला आपली काळजी आहे का?

या प्रेमळ पित्याप्रमाणे, देव आपल्या कायमच्या भल्याचा विचार करून आज आपल्याला दुःख सहन करू देतो

आज लोकांना खूप दुःख सहन करावं लागतं. पण याचा अर्थ असा होतो का, की यहोवा देवाला आपली काहीच काळजी नाही? काही जण असंही म्हणतात, की देव आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्याला दुःख सहन करायला लावतो. पण हे खरं नाही.—याकोब १:१३ वाचा.

देवाने माणसाला इच्छा-स्वातंत्र्य, म्हणजेच निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. असं करून त्याने आपल्या प्रत्येकाबद्दल कदर असल्याचं दाखवलं आहे. आपण देवाची सेवा करावी की नाही, हे निवडायचं स्वातंत्र्य त्याने आपल्याला दिलं आहे. ही आपल्यासाठी खरंच किती मोठी गोष्ट आहे! (यहोशवा २४:१५) पण बरेच लोक वाईट गोष्टी करायचं निवडतात आणि म्हणून आज जगात इतकं दुःख आहे. हा अन्याय पाहून यहोवाला खूप दुःख होतं.—उत्पत्ती ६:५, ६ वाचा.

यहोवा देवाला आपली काळजी आहे. आपण जीवनात आनंदी असावं असं त्याला वाटतं. म्हणून तो लवकरच सगळ्या दुःखांचा आणि त्यांना जबाबदार असलेल्या लोकांचा नाश करणार आहे. पण सध्या त्याने काही काळासाठी दुःख राहू दिलं आहे. आणि यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. ते कारण काय आहे, हे आपण ८ व्या पाठात शिकणार आहोत.—२ पेत्र २:९; ३:७, १३ वाचा.

५. आपण देवासोबत जवळचं नातं कसं जोडू शकतो?

यहोवा आपल्याला प्रार्थनेत त्याच्याशी बोलायचं प्रोत्साहन देतो. असं करून आपण त्याच्या जवळ येऊ शकतो. आपल्यापैकी प्रत्येकाबद्दल त्याला काळजी आहे. (स्तोत्र ६५:२; १४५:१८) हे खरं आहे की, कधीकधी आपण चुकतो; तरीसुद्धा यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो, त्यांची तो कदर करतो. आणि आपल्या चुकांची क्षमा करायला तो तयार असतो. म्हणूनच, आपल्या हातून चुका होत असल्या तरीसुद्धा आपण देवासोबत एक जवळचं नातं जो़डू शकतो.—स्तोत्र १०३:१२-१४; याकोब ४:८ वाचा.

यहोवाने आपल्याला जीवन दिलं आहे. त्यामुळे, आपण इतर कोणत्याही व्यक्‍तीपेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे. (मार्क १२:३०) जेव्हा तुम्ही देवाबद्दल आणखी जास्त शिकून घेता आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागता, तेव्हा तुम्ही दाखवून देता की तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. तुम्ही असं केलं, तर यहोवासोबतचं तुमचं नातं दिवसेंदिवस मजबूत होत जाईल.—१ तीमथ्य २:४; १ योहान ५:३ वाचा.