व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?

यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?

 यहोवाच्या साक्षीदारांनी बायबल शिकून घेण्यासाठी अभ्यासाची एक साधीसोपी पद्धत तयार केली आहे. या अभ्यासामुळे तुम्हाला:

  •  ● आनंदी जीवन जगता येईल

  •  ● देवाशी जवळचं नातं जोडता येईल

  •  ● भविष्याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय ते जाणून घेता येईल

या पानावर

 बायबल अभ्यास कसा असतो?

 एखादा यहोवाचा साक्षीदार तुम्हाला बायबलच्या एकेका विषयाची माहिती घ्यायला मदत करेल. हा अभ्यास कायम जीवनाचा आनंद घ्या!  या प्रकाशनाच्या मदतीने चर्चेद्वारे केला जाईल. या अभ्यासाद्वारे तुम्हाला बायबलचे मुख्य विषय क्रमाक्रमाने समजून घेता येतील आणि ही माहिती तुमच्यासाठी कशी उपयोगाची आहे हेही कळेल. याबद्दल जास्त माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा.

 अभ्यासासाठी पैसे द्यावे लागतील का?

 नाही. कारण येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या या आज्ञेचं यहोवाचे साक्षीदार पालन करतात: “तुम्हाला फुकट मिळालंय, तुम्हीही फुकट द्या.” (मत्तय १०:८) तसंच, अभ्यासाचं साहित्य म्हणजेच बायबल किंवा कायम जीवनाचा आनंद घ्या!  याची प्रत मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत.

 अभ्यास किती दिवस चालेल?

 या अभ्यासात एकूण ६० धडे आहेत. बरेच विद्यार्थी दर आठवड्याला एक किंवा त्यापेक्षा जास्त धडे पूर्ण करतात. तुम्हाला किती धडे पूर्ण करायला आवडतील हे तुम्ही ठरवू शकता.

 अभ्यास सुरू करण्यासाठी काय करावं लागेल?

  1.  १. ऑनलाईन फॉर्म भरा. तुम्ही स्वतःबद्दल पुरवलेली माहिती फक्‍त तुमच्या विनंतीप्रमाणे, एका यहोवाच्या साक्षीदाराने तुमच्याशी संपर्क करावा म्हणून वापरली जाईल.

  2.  २. यहोवाचा एक साक्षीदार तुमच्याशी संपर्क करेल. चर्चेतून केला जाणारा हा अभ्यास कसा असतो हे तो/ती तुम्हाला समजावून सांगेल. तसंच, तुमच्या प्रश्‍नांची उत्तरंही तुम्हाला दिली जातील.

  3.  ३. अभ्यास कसा आणि कधी करायचा हे तुम्ही दोघं मिळून ठरवू शकता. हा अभ्यास एकतर प्रत्यक्ष भेटून किंवा फोन, व्हिडिओ कॉल, पत्र आणि ई-मेल यांपैकी कोणत्याही मार्गाने केला जाऊ शकतो. सहसा अभ्यास एका तासाचा असतो पण तुमच्या सोयीप्रमाणे तो कमी किंवा जास्त वेळही केला जाऊ शकतो.

 अभ्यास कसा असतो हे फक्‍त पाहायचं असेल तर काय करावं लागेल?

 यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यावर यहोवाचा एक साक्षीदार तुमच्याशी संपर्क करेल. तेव्हा तुम्ही त्यांना सांगू शकता की अभ्यास करायचा की नाही हे ठरवण्याआधी तो कसा असतो हे तुम्हाला पाहायचंय. मग तो/ती सुरुवातीचे तीन धडे असलेल्या कायम जीवनाचा आनंद घ्या!  या माहितीपत्रकातून अभ्यास कसा केला जातो हे तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला अभ्यासाची पद्धत आवडली तर तुम्ही पुढेही तो चालू ठेवू शकता.

 अभ्यास सुरू केला तर माझ्यावर यहोवाचा साक्षीदार बनायचा दबाव तर टाकला जाणार नाही ना?

 नाही. यहोवाच्या साक्षीदारांना इतरांना बायबलबद्दल शिकवायला खूप आवडतं. पण आमचा धर्म स्वीकारण्याचा आम्ही कधीही कोणावर दबाव टाकत नाही. याउलट, आम्ही फक्‍त बायबलमध्ये दिलेली माहिती इतरांना आदरपूर्वक सांगतो. आम्हाला जाणीव आहे की या माहितीवर विश्‍वास ठेवायचा की नाही हे ठरवायचा प्रत्येकाला अधिकार आहे.—१ पेत्र ३:१५.

 मी माझं स्वतःचं बायबल वापरू शकतो का?

 हो. तुम्हाला आवडेल ते बायबलचं भाषांतर तुम्ही वापरू शकता. पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर  हे स्पष्ट आणि अचूक असल्यामुळे आम्हाला ते वापरायला आवडतं. पण, बऱ्‍याच जणांना आधीपासूनच ज्याची सवय असते ते भाषांतर वापरायला आवडतं. आणि या गोष्टीला आमची काही हरकत नाही.

 अभ्यासात माझ्यासोबत दुसरं कोणी बसलं तर चालेल का?

 हो. तुम्ही तुमच्या पूर्ण परिवाराला किंवा मित्रांनासुद्धा तुमच्यासोबत अभ्यासासाठी बसायला सांगू शकता.

 मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत आधी बायबल अभ्यास केलाय. मग तरी पुन्हा अभ्यास करावा लागेल का?

 हो. पण आता तुम्हाला बायबलचा अभ्यास करायला आधीपेक्षा जास्त आवडेल. कारण, लोकांच्या सध्याच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही आमच्या बायबल अभ्यासाच्या साहित्यात थोडा बदल केला आहे. आता या अभ्यासात बरीच चित्रं आणि व्हिडिओसुद्धा आहेत. आणि यात चर्चेला जास्त वाव आहे.

 कोणाच्या मदतीशिवाय मी स्वतःहून हा अभ्यास करू शकतो का?

 हो. सहसा एखाद्या व्यक्‍तीच्या मदतीने बायबल अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त फायदा होतो. पण काही लोकांना सुरुवातीला एकट्यानेच अभ्यास करायला आवडतं. बायबल अभ्यासाची साधनं या वेबपेजवर असलेली माहिती आणि व्हिडिओंमुळे तुम्हाला बायबलचा अभ्यास करायला खूप मदत होईल. खाली दिलेल्या साधनांचा तुम्ही वापर करू शकता:

  •   बायबलच्या शिकवणी. यात असलेल्या लेखांमुळे तुम्हाला दररोजच्या जीवनात बायबलची तत्त्वं कशी लागू करायची हे कळेल. जसं की, तणावाचा सामना कसा करता येईल? पैशाचे नियोजन कसे कराल? मुलांवर संस्कार कसे कराल?

  •   बायबल व्हिडिओ. या लहान लहान व्हिडिओंमध्ये बायबलच्या महत्त्वाच्या शिकवणी स्पष्ट केल्या आहेत.

  •   बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं. यात दिलेल्या लेखांमधून, तुम्हाला बायबलविषयी असलेल्या वेगवेगळ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील.