व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ३

एदेन बागेत जीवन कसं होतं?

एदेन बागेत जीवन कसं होतं?

यहोवाने आदाम आणि हव्वाला पुष्कळ चांगल्या गोष्टी दिल्या होत्या. उत्पत्ती १:२८

आदामला बनवल्यावर यहोवाने स्त्रीला निर्माण केलं. तिचं नाव हव्वा होतं. यहोवाने तिला आदामकडे आणलं आणि ती त्याची बायको झाली.—उत्पत्ती २:२१, २२.

यहोवाने त्यांना मनाने आणि शरीराने परिपूर्ण बनवलं होतं, म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणताही दोष नव्हता.

ते एदेन बागेत, एका सुंदर नंदनवनात राहत होते. त्या बागेत एक नदी होती आणि वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आणि प्राणीही होते.

यहोवा त्यांच्याशी बोलायचा आणि त्यांना शिकवायचा. त्यांनी यहोवाचं ऐकणं गरजेचं होतं. त्यांनी त्याचं ऐकलं असतं, तर ते कायम पृथ्वीवरच्या त्या नंदनवनात राहू शकले असते.

बागेतल्या एका झाडाचं फळ खाऊ नका, असं देवाने सांगितलं होतं. उत्पत्ती २:१६, १७

एक स्वर्गदूत देवाचा विरोधी बनला. तो दुष्ट स्वर्गदूत म्हणजे दियाबल सैतान.

यहोवाने आदाम आणि हव्वाला बागेतल्या एका झाडाचं फळ खाऊ नका असं सांगितलं. त्यांनी जर ते फळ खाल्लं, तर ते मरतील असं तो म्हणाला.

आदाम आणि हव्वाने यहोवाचं ऐकू नये असं सैतानाला वाटत होतं. म्हणून तो एका सापाद्वारे हव्वाशी बोलला. तो तिला म्हणाला, की तिने झाडाचं फळ खाल्लं तर ती मरणार नाही; उलट, ती देवासारखी होईल. पण सैतानाने सांगितलेली ही गोष्ट साफ खोटी होती.—उत्पत्ती ३:१-५.