व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वात फायदेकारक सल्ला मिळवणे

सर्वात फायदेकारक सल्ला मिळवणे

सर्वात फायदेकारक सल्ला मिळवणे

यशस्वी जीवन सर्वांना आवडते. फायदेकारक सल्ला आणि या सल्ल्याच्या सामंजस्यात वागण्याची इच्छा, या गुंतागुतीच्या जगात अशा प्रकारचे जीवन मिळवण्याची गुरूकिल्ली आहे. परंतु फायदेकारक सल्ल्याकडे लक्ष देण्याची मानवांची नेहमीच मनोवृत्ती राहिलेली नाही. पुष्कळांनी असा दावा केला आहे, की मानवाने आपल्या मर्जीनुसार जीवन जगावे. खरे पाहता, बायबलमधील अहवाल दाखवतो, की ईश्‍वरी सार्वभौमत्वाचा मूळ शत्रू सैतान याने पहिल्या मानवांना आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्यास सुचवले. उत्पत्ति ३:५ मध्ये लिहिल्यानुसार त्याने हव्वेला असे सांगितले: “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ [बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ] खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”

आदाम आणि हव्वा आपल्या मर्जीनुसार वागल्यानंतर, गंभीर परिणाम न भोगता यशस्वी जीवन जगू शकले का? मुळीच नाही. त्यांना लगेच, चांगले आणि वाईट हे जाणण्याचा दावा केल्याचे परिणाम भोगावे लागले. यहोवाने त्यांना उचितरीत्या नाकारले; त्यांनी अपरिपूर्णतेच्या मार्गावरील खडतर जीवनप्रवास सुरू केला ज्याचा अंतिम परिणाम मृत्यू होता. (उत्पत्ति ३:१६-१९, २३) मृत्यूचा आपल्या सर्वांवर प्रभाव पडतो. बायबल म्हणते: “एका माणसाच्या [आदाम] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.

आदाम आणि हव्वेच्या निवडीचे विपरीत परिणाम घडले असले तरी, पुष्कळ लोकांना अजूनही मनुष्याच्या निर्माणकर्त्याकडून येणाऱ्‍या सल्ल्याचे पालन करण्यातच सुज्ञता आहे याची खात्री पटलेली नाही. परंतु बायबल “परमेश्‍वरप्रेरित” आहे आणि ते आपल्याला “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होण्यासाठी मदत करू शकते. (२ तीमथ्य ३:१६, १७) तेव्हा, बायबलच्या सल्ल्याचे आपण पालन केले तर आपण निश्‍चितच आनंदी होऊ शकतो. कौटुंबिक जीवन हे एक मोठे क्षेत्र आहे जेथे आपण या सल्ल्याचे पालन करू शकतो.

विवाहातील विश्‍वासूपणा

बायबलनुसार विवाह हा चिरकाल टिकला पाहिजे असा देवाचा उद्देश आहे. (उत्पत्ति २:२२-२४; मत्तय १९:६) आणि शास्त्रवचन असे म्हणते, की “अंथरूण निर्दोष असावे” म्हणजे विवाहबाह्‍य लैंगिक संबंधांद्वारे पतीपत्नीमधील संबंध भ्रष्ट होऊ नयेत. (इब्री लोकांस १३:४) परंतु तुम्हाला कदाचित माहीत असेल, की आज पुष्कळ विवाहांत या तत्त्वाचे पालन केले जात नाही. काही लोकांना, कामाच्या ठिकाणी आपला वैवाहिक सोबती नसणाऱ्‍या विरुद्धलिंगी व्यक्‍तीबरोबर प्रणयचेष्टा करण्याची सवय असते. इतर काही लोक, आपल्या वैवाहिक सोबत्याला सोडून इतर व्यक्‍तीबरोबर प्रेमाचे चाळे करण्यासाठी वेळ घालवता यावा म्हणून आपल्या कुटुंबाशी खोटे बोलतात. काही तर, आपल्या वैवाहिक सोबत्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्‍तीबरोबर राहण्याकरता आपल्या पतीला किंवा पत्नीला सोडून देतात; यामुळे, पहिल्या लेखात उल्लेख केलेल्या वेरोनिकाच्या बाबतीत घडले त्याप्रमाणे असे लोक, आपण अजूनही तरुण आहोत आणि आनंदी आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करतात.

परिणामांकडे दुर्लक्ष करून मनास येईल त्याप्रमाणे वागण्याचा अट्टाहास केल्याने चिरकाल आनंद मिळणार नाही. रोनाल्ड याला पुष्टी देऊ शकेल. आपण आपले जीवन सुधारू शकतो अशी खात्री पटल्यामुळे त्याने आपल्या पत्नीला सोडून दिले आणि सहा वर्षांपासून त्याची गुप्त प्रेयसी असलेल्या आणि जिला त्याच्याकडून दोन मुले झाली होती अशा एका स्त्रीबरोबर तो राहायला गेला. परंतु, आपला विवाह मोडून काही काळ झाल्यानंतर त्याची ही प्रेयसी त्याला सोडून गेली! रोनाल्ड शेवटी आपल्या आईवडिलांकडे जाऊन राहू लागला. आपली परिस्थिती ‘अधोगतीस’ गेली असे तो म्हणाला. हे केवळ एक उदाहरण आहे. स्वार्थी इच्छा पूर्ण करणाऱ्‍या वर्तनामुळे, घटस्फोट आणि कुटुंबाची ताटातूट या गोष्टी वारंवार घडू लागल्या आहेत ज्याचे चटके अगणित लोकांना—प्रौढांना आणि मुलांना समप्रमाणात बसत आहेत.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, बायबलच्या सल्ल्याचे पालन केल्याचा परिणाम खरा आनंद आहे. रॉबर्टोने असे केले; तो म्हणतो: “बायबलच्या सल्ल्याचं पालन केल्यामुळेच तर मी माझ्या पत्नीला गमावता गमावता वाचलो. आपला वैवाहिक सोबती नसलेल्या व्यक्‍तीच्या प्रेमात पडल्याने, मग ती कितीही आकर्षक असली तरी, खरा आनंद मिळत नाही. बायबलच्या शिक्षणानं मला, इतक्या वर्षांपासून माझ्या सुखा-दुःखात साथ देणाऱ्‍या माझ्या पत्नीची किंमत समजण्यास मदत केली आहे.” “आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्‍वासघात करू नये” या बायबमधील सल्ल्याने रॉबर्टोच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. (मलाखी २:१५) अजून कोणकोणत्या बाबतीत आपण देवाकडून येणाऱ्‍या सल्ल्यातून फायदा मिळवू शकतो?

मुलांचे संगोपन

अनेक दशकांआधी, ही धारणा प्रचलित झाली की पालकांनी आपल्या मुलांचे संगोपन करताना बंधने घालू नयेत. मुलांनी कशाप्रकारे विचार करावा आणि कशाप्रकारे वागावे याबद्दल त्यांना स्वतःला निर्णय घेऊ द्यावेत, ही धारणा तेव्हा तर्कशुद्ध वाटत होती. अशाने मुलांची वाढ खुंटणार नाही, हा त्या मागचा हेतू होता. काही ठिकाणी तर, शैक्षिणक व्यवस्थेत बरीच सूट देण्यात आली, ज्यात, विद्यार्थ्यांना इतर गोष्टींव्यतिरिक्‍त क्लासला उपस्थित राहावे की राहू नये, किती मनोरंजन करावे किंवा कोणत्या सूचनांचे पालन करावे हे ठरवण्याची मोकळीक देण्यात आली. अशा प्रकारच्या एका शाळेचे असे धोरण होते, की “प्रौढांची टीका आणि हस्तक्षेप यांपासून मुक्‍त असलेल्या भावनांचा मुलांना अनुभव घेऊ द्यावा.” मानवी वर्तनाच्या विषयावरील काही सल्लागार अजूनही, विशिष्ट प्रकारच्या शिक्षा दिल्याने लाभ होतो याजशी सहमत नाहीत. पालकांना कधीकधी आपल्या मुलांना प्रेमळ शिक्षा देण्याची गरज भासते त्या बाबतीतही त्यांचे हेच मत आहे.

याचा परिणाम काय घडला आहे? पुष्कळ लोकांचे असे मत आहे की मुलांचे संगोपन करताना त्यांना शिक्षा न दिल्याने त्यांना अति मोकळीक मिळते. आणि यामुळेच गुन्हेगारी आणि मादक पदार्थांचे व्यसन यांत कमालीची वाढ झाली आहे, असे त्यांना वाटते. संयुक्‍त संस्थानांत घेतलेल्या एका सर्व्हेतील जवळजवळ ७० टक्के लोकांचा असा विचार होता, की मुलांना आणि तरुणांना, हवे तितके पालकीय मार्गदर्शन खरे तर मिळत नाही. शाळेत होणारा गोळीबार आणि किशोरवयीन करत असलेले इतर भयंकर गुन्हे यांमागचे कारण, “ताबा ठेवण्यात पालकांचा ढिलेपणा” आहे, असे काही लोक म्हणतात. आणि परिणाम जरी इतके दुःखदायक नसले तरीसुद्धा, पालक आणि मुलांना संगोपनाच्या बाबतीत चुकीच्या मार्गदर्शनाची कडू फळे चाखावी लागतात.

याबाबतीत बायबल काय म्हणते? शास्त्रवचने असा सल्ला देतात, की पालकांनी आपला अधिकार प्रेमळपणे आणि ठामपणे गाजवला पाहिजे. बायबल म्हणते: “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देतो.” (नीतिसूत्रे २२:१५) अर्थात पालक देत असलेली सर्व प्रकारची शिक्षा परिस्थितीनुरूप योग्य असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची शिक्षा देत असताना, ती सौम्यतेने, संयमाने आणि विचारपूर्वक दिली पाहिजे. त्यावरून प्रेम दिसून येते. पालक जेव्हा आपला अधिकार निर्दयीपणे नव्हे तर प्रेमळपणे गाजवतात तेव्हा यश मिळण्याची शक्यता वाढते.

या सल्ल्याचे पालन केल्याने उत्तम फायदे दिसून आले आहेत. मेक्सिकोतील ऑर्टुरो नावाचा ३० वर्षीय मनुष्य ज्याचे नुकतेच लग्न झाले आहे तो म्हणतो: “माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या भावांना स्पष्टपणे सांगितलं, की त्यांना आणि आईला कुटुंबात अधिकार आहे. त्यांनी आम्हाला शिक्षा देण्यात कधी कुचराई केली नाही. पण आमच्याशी बोलायला त्यांच्याकडे नेहमी वेळ असायचा. आता प्रौढ व्यक्‍ती या नात्यानं मी उपभोगत असलेल्या स्थिर जीवनाची मला किंमत आहे आणि हे बहुतांशी मला मिळालेल्या उत्तम मार्गदर्शनाचा परिणाम आहे, हे मला माहीत आहे.”

सर्वात फायदेकारक सल्ल्याचा लाभ घ्या

देवाचे वचन बायबल यात मानवजातीसाठी असलेला सर्वात फायदेकारक सल्ला आहे. त्यातील सल्ला केवळ कौटुंबिक व्यवस्थेपुरताच मर्यादित नाही. हा सल्ला आपल्याला अनेक मार्गांनी सज्ज करतो. ज्या जगामध्ये लोक त्यांचे भले होत असले तरी सर्वश्रेष्ठ बुद्धीच्या उगमाकडून मार्गदर्शन स्वीकारायला तयार नाहीत त्या जगात कसे जगावे हे तो आपल्याला शिकवतो.

मानवजातीचा निर्माणकर्ता यहोवा देव याने स्तोत्रकर्ता दावीद याला अशी हमी दिली: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तोत्र ३२:८) धोक्यांपासून आपले संरक्षण करण्याकरता निर्माणकर्ता आपल्यावर लक्ष ठेवून आहे याचा काय अर्थ होतो याची तुम्ही कल्पना करू शकता का? मग आपण स्वतःला असा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘मी यहोवाचे संरक्षक मार्गदर्शन नम्रपणे स्वीकारेन का?’ त्याचे वचन आपल्याला प्रेमळपणे असे सांगते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.

यहोवाशी परिचित होण्यासाठी प्रयत्न आणि चिकाटी यांची गरज आहे आणि हे मानवजातीच्या आवाक्यात आहे अर्थात बायबलद्वारे शक्य आहे. यहोवा सुचवत असलेली जीवनशैली “आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन” देते. मिळणाऱ्‍या फायद्यांचा विचार केल्यास हा खरोखर एक मोठा लाभ आहे.—१ तीमथ्य ४:८; ६:६.

बायबलमधील सूक्ष्मदृष्टी आणि बायबलच्या सल्ल्यानुसार वागल्यामुळे मिळणारे आशीर्वाद यांकडे तुम्ही आकर्षित झाला असाल तर देवाच्या वचनाचे वाचन आणि त्यावर मनन करण्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्या. असे केल्याने आज आणि उद्या येऊ शकणाऱ्‍या अडचणींचा यशस्वीरीत्या सामना करण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल. याशिवाय, तुम्ही देवाच्या नवीन जगात जगण्याच्या आशेविषयी शिकाल जेथे सर्वांना यहोवाकडून शिक्षण मिळेल आणि ते विपुल शांतीचा उपभोग घेतील.—यशया ५४:१३.

[५ पानांवरील चित्र]

बायबलचा सल्ला वैवाहिक बंधन मजबूत करू शकतो

[६ पानांवरील चित्रे]

बायबलचा सल्ला उत्तम मार्गदर्शन देणारा असला तरी त्यात आनंद करण्यास अनुमती दिली आहे

[७ पानांवरील चित्रे]

बायबलच्या सल्ल्याचे पालन करणारे संतुलित आणि वैविध्यपूर्ण जीवनाचा उपभोग घेऊ शकतात