व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

जरुशलेमला वेढा पडला आणि तिचा नाश करण्यात आला तेव्हा यहेज्केल कोणत्या अर्थाने “स्तब्ध” किंवा “मुका” झाला?

त्याचा मुळात असा अर्थ होतो, की यहोवाकडून आलेल्या भविष्यसूचक संदेशासोबत त्याला आणखी काही सांगायचे नव्हते.

संदेष्टा यहेज्केलने बॅबिलोनमध्ये बंदिवासात असलेल्या इस्राएलांसाठी, ‘यहोयाखीन राजाच्या बंदिवासाच्या पाचव्या वर्षी’ म्हणजे सा.यु.पू. ६१३ मध्ये विश्‍वासू पहारेकऱ्‍याचे काम सुरू केले. (यहेज्केल १:२, ३) सा.यु.पू. ६०९ वर्षाच्या दहाव्या चान्द्र महिन्याच्या दहाव्या दिवशी, बॅबिलोनी सैन्य जरुसलेमला वेढा घालत आहे हे त्याला ईश्‍वरप्रेरणेने सांगण्यात आले. (यहेज्केल २४:१, २) याचा परिणाम काय होणार होता? जरुसलेम आणि तिचे अविश्‍वासू निवासी वाचतील का? पहारेकरी या नात्याने यहेज्केलने, न चुकणाऱ्‍या नाशाचा यहोवाचा संदेश आधीच घोषित केला होता व हा संदेश आणखी पक्का करण्यासाठी यहेज्केलला त्यात आणखी कशाची भर घालण्याची गरज नव्हती. जरुसलेमच्या वेढ्याविषयी तो पुढे काहीच बोलला नाही; स्तब्ध झाला.—यहेज्केल २४:२५-२७.

सा.यु.पू. ६०७ मध्ये जरुसलेमच्या नाशाच्या सहा महिन्यांनंतर, पळून आलेल्या एका मनुष्याने यहेज्केलला बॅबिलोनमध्ये पवित्र शहराच्या नाशाविषयीची बातमी दिली. तो मनुष्य यायच्या आधी, यहोवाने यहेज्केलाचे ‘तोंड उघडिले. . . . तेव्हा तो काही मुका नव्हता.’ (यहेज्केल ३३:२२) त्यानंतर यहेज्केल बोलू लागला.

या काळादरम्यान यहेज्केल खरोखरच मुका झाला होता का? नाही, कारण तो स्तब्ध झाल्यानंतरही त्याने जरुसलेमच्या पतनाविषयी ऐकून आनंद करणाऱ्‍या आजूबाजूच्या राष्ट्रांना उद्देशून अनेक भविष्यवाण्या केल्या. (यहेज्केल अध्याय २५-३२) पूर्वी संदेष्टा व पहारेकरी या नात्याने सेवा करत असताना यहोवाने यहेज्केलास सांगितले: “तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस; कारण ते फितुरी घराणे आहे; तरी पण मी तुजबरोबर बोलेन तेव्हा मी तुझे तोंड उघडीन.” (यहेज्केल ३:२६, २७) इस्राएलाकरता यहोवाचा काही संदेश नव्हता तेव्हा यहेज्केलास त्या राष्ट्राच्या संबंधाने स्तब्ध राहायचे होते. यहेज्केलाला, यहोवाच्या ठराविक वेळेला आणि त्याच्या इच्छप्रमाणेच बोलायची परवानगी होती. यहेज्केलाच्या स्तब्ध राहण्याचा अर्थ इस्राएलांकरता भविष्यसूचक महत्त्व असलेले काहीही तो बोलू शकत नव्हता.

आधुनिक दिवसांतील पहारेकरी वर्ग अर्थात अभिषिक्‍त वर्ग प्रतिनमुनेदार जरुसलेम अर्थात ख्रिस्ती धर्मजगताच्या नाशाविषयी इशारा देत आहे. “मोठे संकट” येईल आणि ते खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्याचा अर्थात ‘मोठ्या बाबेलचा’ नाश करील तेव्हा अभिषिक्‍त यहेज्केल वर्गाला, साम्राज्याचा बहुतांश भाग असलेल्या ख्रिस्ती धर्मजगताच्या नाशाविषयी आणखी काहीही बोलावे लागणार नाही.—मत्तय २४:२१; प्रकटीकरण १७:१, २, ५.

होय, एक असा दिवस येणार आहे जेव्हा अभिषिक्‍त शेष आणि त्यांचे सोबती स्तब्ध अर्थात मुके होतील, ख्रिस्ती धर्मजगताला त्यांना सांगण्याकरता काही उरणार नाही. हे तेव्हा होईल जेव्हा “दहा शिंगे” आणि “श्‍वापद” मोठ्या बाबेलला ओसाड व नग्न करतील. (प्रकटीकरण १७:१६) याचा अर्थ असा होत नाही, की ख्रिस्ती अक्षरशः मुके होतील. तर आताप्रमाणेच ते तेव्हा देखील यहोवाची स्तुती करतील आणि दररोज व “पिढ्यानपिढ्या” त्याच्या नावाचे स्मरण करतील.—स्तोत्र ४५:१७; १४५:२.