व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

तुम्हाला देवाचे अदृश्‍य गुण पाहता येतात का?

तुम्हाला देवाचे अदृश्‍य गुण पाहता येतात का?

वेगवेगळ्या रंगात नटलेली फुलं, ताऱ्‍यांनी सजलेलं आकाश, ओसंडून वाहणारा धबधबा, या सगळ्या गोष्टीचं सौंदर्य अनुभवताना त्यामागे दडलेली निर्माणकर्त्याची कला तुम्हाला दिसते का? खरंच, आपल्याभोवती असलेल्या सृष्टीतून यहोवाचे अदृश्‍य गुण आपल्याला स्पष्टपणे पाहता येतात. (रोम १:२०) सृष्टीचं बारकाईने परीक्षण करत असताना देवाची शक्‍ती, प्रेम, बुद्धी, न्याय आणि त्याची उदारताही आपल्याला दिसून येते.​—स्तो १०४:२४.

दररोजच्या जीवनात तुम्हाला सृष्टीतल्या कोणत्या काही गोष्टी पाहायला मिळतात? तुम्ही शहरात राहत असला, तरी झाडं आणि पाखरं तुम्ही पाहिलीच असतील. यहोवाच्या सृष्टीचं जवळून परीक्षण केल्यामुळे मनाला हायसं वाटतं आणि आपल्या चिंता कमी होऊ शकतात. तसंच, आपल्या समस्यांबद्दल विनाकारण चिंता करण्याचं टाळण्यासाठीही आपल्याला मदत होऊ शकते. यासोबतच, यहोवा आपल्याला नेहमी सांभाळेल असा विश्‍वास बाळगायलासुद्धा आपल्याला मदत होऊ शकते. (मत्त ६:२५-३२) तुम्हाला मुलं असतील तर त्यांना यहोवाचे अद्‌भुत गुण समजून घ्यायला मदत करा. जसजशी यहोवाच्या सृष्टीबद्दल आपली कदर वाढेल, तसतसं निर्माणकर्त्यासोबतचं आपलं नातं आणखी घनिष्ठ होत जाईल.​—स्तो ८:३, ४.

अप्रतिम सृष्टी देवाचे गुण प्रकट करते-प्रकाशकिरणं आणि रंग  हा व्हिडिओ पाहा आणि नंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात?

  • कोणत्या गोष्टीमुळे इरीडीसेन्स किंवा चकाकणारे बदलते रंग दिसून येतात?

  • आकाशात आपल्याला वेगवेगळे रंग का दिसतात?

  • तुमच्या घराशेजारच्या परिसरात कोणते अप्रतिम रंग तुम्हाला पाहायला मिळाले आहेत?

  • आपण उत्सुकतेनं निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी वेळ का काढला पाहिजे?

प्रकाश आणि निसर्गात दिसणारे वेगवेगळे रंग पाहून आपल्याला निर्माणकर्त्याच्या कोणत्या गुणांची आठवण होते?