व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | रोमकर ४-६

“देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो”

“देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो”

५:८, १८, २१

खंडणी ही यहोवाकडून मानवजातीला मिळालेली एक भेट आहे. ही भेट खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे यहोवाच्या नावाला लागलेला कलंक पुसून टाकला जाईल. तसंच, विश्‍वावर राज्य करण्याचा अधिकार यहोवालाच आहे आणि राज्य करण्याची त्याची पद्धतच योग्य आहे हे सिद्ध होईल. खंडणीमुळे आज आपल्याला यहोवाशी मैत्री करणं शक्य झालं आहे. आणि याच खंडणीमुळे देवाच्या आज्ञेत राहणाऱ्‍यांना अनंतकाळ जगण्याची आशाही मिळणार आहे.

खंडणीच्या भेटीसाठी आपल्या मनात कदर आहे हे कसं दाखवता येईल?

  • समर्पण आणि बाप्तिस्मा यांद्वारे खंडणीवर आपला विश्‍वास आहे आणि आपल्याला यहोवाची बाजू घ्यायची इच्छा आहे हे दिसून येईल

  • देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करत राहण्याद्वारे आपण दाखवतो की सर्व प्रकारच्या लोकांसाठी असलेल्या यहोवाच्या प्रेमाचं आपण अनुकरण करत आहोत.​—मत्त २२:३९; योह ३:१६

खंडणीच्या भेटीबद्दल माझ्या मनात कदर असल्याचं मी आणखी कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?