व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या जवळ या

यहोवा खरोखरच तुमची काळजी करतो का?

यहोवा खरोखरच तुमची काळजी करतो का?

“कमीपणाची भावना ही देवाच्या जवळ जाण्याकरता सर्वात मोठे अडखळण आहे ज्यावर मी मात करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे एक स्त्री म्हणते. यहोवा तिची काळजी करतो यावर तिचा विश्‍वास बसत नव्हता. तुम्हालादेखील असेच वाटते का? जर होय तर तुम्ही विचार कराल, “यहोवा खरंच त्याच्या सेवकांची व्यक्‍तिगत रीत्या काळजी करतो का?” होय, तो काळजी करतो! याचा पुरावा आपल्याला येशूच्या शब्दांतून मिळतो.—योहान ६:४४ वाचा.

यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या आणि त्याची इच्छा काय आहे हे माहीत असलेल्या येशूने काय म्हटले? (लूक १०:२२) “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.” त्यामुळे जोपर्यंत यहोवा आपल्याला आकर्षित करत नाही तोपर्यंत आपण येशूचे शिष्य आणि यहोवाचे सेवक बनू शकत नाही. (२ थेस्सलनीकाकर २:१३) येशूने काय म्हटले हे आपल्याला समजले तर आपल्याला कळेल की यहोवा आपली वैयक्‍तिक रीत्या काळजी घेतो.

यहोवा आपल्याला आकर्षितो याचा काय अर्थ होतो? आकर्षित करणे असे भाषांतरित केलेल्या ग्रीक क्रियापदाचा अर्थ, माशांनी भरलेले जाळे खेचणे असाही होतो. (योहान २१:६, ११) माशांना जसे त्यांच्या इच्छेविरुद्ध जाळ्यात खेचले जाते तसे यहोवा आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध त्याची सेवा करण्याची जबरदस्ती करतो का? बिलकुल नाही. यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे तो आपल्यावर त्याची सेवा करण्याचा दबाव आणत नाही. (अनुवाद ३०:१९, २०) जे लोक निर्मळ मनाने त्याचा शोध घेत असतात अशा लोकांचे अंतःकरण तो पारखतो. (१ इतिहास २८:९) जेव्हा त्याला अशी व्यक्‍ती दिसते तेव्हा तोही मग एक पाऊल पुढे टाकतो. कसे?

जे योग्य अंतःकरणाचे आहेत त्यांना यहोवा आकर्षित करतो. (प्रेषितांची कृत्ये १३:४८) हे तो दोन मार्गांनी करतो. एक म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीपर्यंत बायबलचा संदेश पोहचवण्याद्वारे आणि दुसरा म्हणजे त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे. जेव्हा एक व्यक्‍ती बायबल सत्य स्वीकारते तेव्हा यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तिला ते सत्य शिकण्यास आणि जीवनात लागू करण्यास मदत करतो. (१ करिंथकर २:११, १२) यहोवाच्या मदतीशिवाय आपण येशूचे खरे शिष्य आणि यहोवाचे समर्पित सेवक कधीच बनू शकलो नसतो.

यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे तो आपल्यावर त्याची सेवा करण्याचा दबाव आणत नाही

तर मग योहान ६:४४ मधील येशूच्या शब्दांतून यहोवा देवाविषयी आपण काय शिकतो? यहोवा लोकांना आकर्षित करतो कारण तो त्यांच्या मनात काहीतरी चांगले पाहतो आणि त्यांची व्यक्‍तिगत रीत्या काळजी घेतो. सुरुवातीला उल्लेख केलेल्या स्त्रीला याच गोष्टीमुळे सांत्वन मिळाले. ती म्हणते: “यहोवाची सेवक असणं हा माझ्याकरता सर्वात मोठा बहुमान आहे. आणि जर त्यानं मला त्याची सेवा करण्यास निवडलं आहे तर मी नक्कीच त्याच्या नजरेत अनमोल असेन.” तुमच्याबाबतीत काय? यहोवा आपल्या उपासकांची व्यक्‍तिगत रीत्या काळजी करतो हे समजल्यावर तुम्ही त्याच्या जवळ जाण्यास प्रवृत्त होताका? ▪ (w१३-E ०५/०१)

बायबल वाचन

लूक ७-२१