व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्‍नांची उत्तरे

बायबल प्रश्‍नांची उत्तरे

जगात शांती आणणे इतके कठीण का आहे?

जे सरकार मानवांच्या हृदयाचे परिवर्तन करू शकते तेच या पृथ्वीवर शांती आणू शकते

बायबलमध्ये यामागची दोन कारणे सांगण्यात आली आहेत. पहिले, खरेतर मानवांनी आत्तापर्यंत खूप काही साध्य केले आहे तरी त्यांच्यात स्वतःचे मार्गदर्शन करण्याची कुवत नाही. दुसरे, मानवांच्या सर्व उपाययोजना फोल ठरल्या आहेत कारण “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे” म्हणजे सैतानाच्या मुठीत आहे. म्हणून, जगात शांती आणण्यासाठी मानव करत असलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत!—यिर्मया १०:२३; १ योहान ५:१९ वाचा.

जगात शांती येण्यासाठी मानवांचा स्वार्थ आणि महत्त्वाकांक्षीपणासुद्धा आडवा येतो. जे सरकार लोकांना योग्य गोष्टींवर प्रेम करण्यास आणि एकमेकांची काळजी निःस्वार्थपणे घेण्यास शिकवेल तेच सरकार जगात शांती निर्माण करू शकते.—यशया ३२:१७; ४८:१८, २२ वाचा.

जगात शांती कोण आणेल?

सर्व मानवजातीवर फक्‍त एकच सरकार राज्य करेल असे आश्‍वासन सर्वशक्‍तिमान यहोवा देव आपल्याला देतो. इतर सर्व मानवी सरकारांऐवजी हे सरकार राज्य करेल. (दानीएल २:४४) देवाचा पुत्र, येशू शांतीचा राजा या नात्याने पृथ्वीवरील सर्व दुष्टाईचा मुळासकट नाश करेल आणि लोकांना शांतीचा मार्ग शिकवेल.—यशया ९:६, ७; ११:४,  वाचा.

जगातील हजारो लोकांनी तर, येशूच्या मार्गदर्शनाखाली राहून देवाचे वचन बायबल यातून एकमेकांबरोबर शांतीने कसे वागायचे हे इतरांना शिकवायला केव्हाच सुरुवात केली आहे. लवकरच, जगात शांती येणार आहे.—यशया २:३, ४; ५४:१३ वाचा. (w१३-E ०६/०१)