व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरा देव कोण आहे?

खरा देव कोण आहे?

देवाच्या वचनातून शिका

खरा देव कोण आहे?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे वाचायला मिळतील हे या लेखात सांगितले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. खरा देव कोण आहे?

खरा देव हा सर्व गोष्टींना बनवणारा आहे. तो “सनातन” आहे म्हणजे त्याला सुरुवात आणि शेवट नाही, असे बायबल म्हणते. (१ तीमथ्य १:१७) देव जीवनाचा स्रोत असल्यामुळे आपण फक्‍त त्याचीच उपासना केली पाहिजे.प्रकटीकरण ४:११ वाचा.

२. देव कसा दिसतो?

देव आत्मा असल्यामुळे त्याला अजूनपर्यंत कोणीही पाहिलेले नाही; म्हणजे, पृथ्वीवर जगणाऱ्‍या मानवांपेक्षा तो उच्च आहे. (योहान १:१८; ४:२४) त्याने जे काही निर्माण केले त्यातून त्याचे व्यक्‍तिमत्त्व झळकते. उदाहरणार्थ, विविध प्रकारची फळे-फुले व त्यांची रचना पाहिल्यावर देवाचे आपल्यावर असलेले प्रेम व त्याची बुद्धी दिसून येते. या विश्‍वाच्या व्यापकतेवरून आपल्याला देवाच्या शक्‍तीबद्दल कळते.रोमकर १:२०.

आपण बायबलमधून देवाच्या गुणांबद्दल आणखी खूप काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, देव कशाने संतुष्ट होतो, कशाने होत नाही, तो लोकांशी कसा वागतो, वेगवेगळ्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया व्यक्‍त करतो याबद्दल बायबलमध्ये सांगितलेले आहे.स्तोत्र १०३:७-१० वाचा.

३. देवाला नाव आहे का?

येशू म्हणाला: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) देवाला अनेक पदव्या असल्यातरी त्याचे एकच नाव आहे. प्रत्येक भाषेत त्याच्या नावाचा उच्चार वेगळा केला जातो. जसे की मराठीत आपण सहसा “यहोवा” किंवा कधीकधी “याव्हे” असे म्हणतो.स्तोत्र ८३:१८, पं.र.भा वाचा.

देवाचे नाव अनेक बायबलमधून काढून त्याऐवजी प्रभू किंवा देव या पदव्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण जेव्हा बायबल लिहिण्यात आले होते तेव्हा त्यात देवाचे नाव जवळजवळ ७,००० वेळा आले आहे. येशू, देवाचे वचन लोकांना समजावून सांगताना देवाच्या नावाचा उल्लेख करायचा. देवाला जाणून घेण्यास त्याने लोकांना मदत केली.योहान १७:२६ वाचा.

४. देवाला आपली काळजी आहे का?

आपल्या प्रार्थना ऐकण्याद्वारे यहोवा आपल्यात आवड घेतो. (स्तोत्र ६५:२) आज आपण दुःखाचे प्रमाण वाढत असल्याचे पाहतो; मग याचा अर्थ देवाला आपली काळजी नाही असा होतो का? आपली परीक्षा पाहण्यासाठी देवच आपल्यावर दुःख आणतो, असा दावा काही लोक करतात, पण हा दावा खरा नाही. कारण बायबलमध्ये, “देव निःसंशय काही वाईट करीत नाही,” असे म्हटले आहे.—ईयोब ३४:१२; याकोब १:१३ वाचा.

देवाने मानवाला इच्छा स्वातंत्र्य देऊन त्याला सन्मानित केले आहे. देवाची सेवा करण्याची निवड करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे याबाबतीत आपण कृतज्ञ आहोत, नाही का? (यहोशवा २४:१५) दुःखाचे प्रमाण वाढत चाललेले आहे कारण अनेक जण इतरांवर अन्याय करतात. हा अन्याय पाहून यहोवाचे मन दुखावते.उत्पत्ति ६:५, ६ वाचा.

लवकरच यहोवा येशूद्वारे दुःखांचा व त्यांना कारणीभूत असणाऱ्‍यांचा नाश करणार आहे. पण तात्पुरत्या काळासाठी यहोवाने दुःखाला अनुमती का दिली आहे याचे एक चांगले कारण त्याच्याजवळ आहे. ते कोणते कारण आहे, ते या शृंखलेतील पुढील लेखात समजावून सांगितले जाईल.यशया ११:४ वाचा.

५. आपण काय करावे अशी देवाची इच्छा आहे?

देवाला ओळखून त्याच्यावर प्रेम करण्याची कुवत त्याने आपल्याला दिली आहे. त्याची अशी इच्छा आहे की आपण त्याच्याबद्दलचे सत्य जाणून घ्यावे. (१ तीमथ्य २:४) आपण बायबलचा अभ्यास केला तर आपल्याला, देव आपल्या मित्राप्रमाणे आहे, हे समजेल.नीतिसूत्रे २:४, ५ वाचा.

देवाने आपल्याला जीवन दिले आहे त्यामुळे आपण त्याच्यावर इतर कोणाहीपेक्षा जास्त प्रेम केले पाहिजे. आपण देवाला प्रार्थना करण्याद्वारे व तो आपल्याकडून जे अपेक्षितो ते पूर्ण करण्याद्वारे दाखवून देऊ शकतो, की आपले त्याच्यावर प्रेम आहे. (नीतिसूत्रे १५:८) आपण इतरांशी प्रेमाने वागावे अशीदेखील तो आपल्याकडून अपेक्षा करतो.मार्क १२:२९, ३०, वाचा; १ योहान ५:३. (w११-E ०२/०१)

जास्त माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय १ पाहा.

[२३ पानांवरील चित्र]

तात्पुरत्या काळासाठी दुःख राहू देण्यामागे काही चांगले कारण असेल का?