व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

शाफानाच्या कुटुंबाबद्दल शिकल्याने आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?

शाफान, यहुदाचा राजा योशीया याच्या दरबारात लेखक आणि चिटणीस म्हणून काम करत असे. राज्यात वजनदार पुरुष यानात्याने शाफानने खऱ्‍या उपासनेच्या पुनर्स्थापनेकरता योशीयाने हाती घेतलेल्या पहिल्या मोहिमेत पूर्ण पाठिंबा दिला. शाफानच्या दोन पुत्रांनी संदेष्टा यिर्मया यास पाठबळ दिले. आणि त्याच्या दुसऱ्‍या एका पुत्राने आणि दोन नातवंडांनी देखील खऱ्‍या उपासनेला पाठबळ देण्यासाठी आपल्या उच्च पदांचा उपयोग केला. तसेच, आपणही खऱ्‍या उपासनेला पाठबळ देण्यासाठी आपल्या साधनसंपत्तीचा व प्रभावाचा उपयोग केला पाहिजे.—१२/१५, पृष्ठे १९-२२.

इरेन होकस्टनबॉक कशाप्रकारे आपल्या एका मोठ्या अपंगत्वावर मात करून यहोवाची सेवा करू शकली आहे?

सात वर्षांची असताना ती बधीर झाली. बधीर असूनही ती लोकांबरोबर संवाद साधण्यास शिकली आणि आता आपल्या पतीबरोबर (एक प्रवासी पर्यवेक्षक) नेदरलंडमधील मंडळ्यांना भेटी द्यायला जाते.—१/१, पृष्ठे २३-६.

“राज्याचे आवेशी उद्‌घोषक” या प्रांतीय अधिवेशनांत कोणत्या दोन नवीन अभ्यासाच्या साधनांचे प्रकाशन करण्यात आले?

संपूर्ण जगभरातील ख्रिश्‍चनांना, एकमेव खऱ्‍या देवाची उपासना करा (इंग्रजी) हे पुस्तक पाहून आनंद वाटला; सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचा अभ्यास करून झाल्यानंतर नवीन लोकांनी या पुस्तकातून अभ्यास करावा म्हणून हे बनवण्यात आले आहे. आणि दुसरे पुस्तक होते, यहोवाजवळ या (इंग्रजी). या पुस्तकातली माहिती, यहोवाच्या गुणांवर आणि त्याच्या व्यवहारांवर केंद्रित आहे. यहोवाचे गुण प्रदर्शित करून आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो हेही या पुस्तकात सांगितले आहे.—१/१५, पृष्ठे २३-४.

नीतिसूत्रे १२:५ मधील: “धार्मिकांचे विचार यथान्याय असतात,” याचा काय अर्थ होतो?

चांगल्या लोकांचे विचार सरळ असून त्यात पक्षपातीपणा किंवा अन्याय नसतो. धार्मिक लोक देवाप्रती आणि सहमानवांप्रती असलेल्या प्रेमाने प्रेरित होत असल्यामुळे त्यांचे हेतू चांगले असतात.—१/१५, पृष्ठे ३०.

कोणती गोष्ट कामासंबंधाने संतुलित दृष्टिकोन बाळगण्यास एखाद्याला मदत करू शकते?

कामाचे महत्त्व समजण्याचे एखाद्याला बालपणापासूनच प्रशिक्षण मिळणे उपयुक्‍त ठरते. कामासू असण्यास आणि आळशीपणा टाळण्यास बायबल उत्तेजन देते. (नीतिसूत्रे २०:४) कामात पूर्णपणे बुडून न जाण्यासही ते आपल्याला उत्तेजन देते. देवाच्या सेवेला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व असले पाहिजे हे आपण सर्वांनी ओळखले पाहिजे. (१ करिंथकर ७:२९-३१) शिवाय, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना हा विश्‍वास आहे की देव त्यांना सोडणार नाही.—२/१, पृष्ठे ४-६.

बायबलमध्ये वेदीचा उल्लेख सर्वात आधी कोठे आढळतो?

बायबलमध्ये उत्पत्ति ८:२० मध्ये वेदीचा उल्लेख सर्वात आधी आढळतो; जलप्रलयानंतर नोहा जहाजाबाहेर आला तेव्हा त्याने बांधलेल्या वेदीचा तो उल्लेख आहे. पण कदाचित, काइन व हाबेलने देखील आपल्या अर्पणांसाठी वेदींचा उपयोग केला असावा. (उत्पत्ति ४:३, ४)—२/१५, पृष्ठ २८.

काही ख्रिस्ती आपल्या बदललेल्या परिस्थितीचा सदुपयोग कसा करू शकतात?

काहींनी, आपल्या नोकरीच्या संबंधाने झालेले बदल स्वीकारले आहेत किंवा स्वतःहून बदल करवून घेतले आहेत; यामुळे त्यांना सेवेसाठी अधिक वेळ मिळू लागला आहे. इतर जण, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍या कमी झाल्यानंतर, म्हणजे त्यांची मुले प्रौढ होऊन त्यांचा विवाह झाल्यानंतर, देवाच्या सेवेत अधिक वेळ खर्च करू लागले आहेत व विशेषाधिकार स्वीकारू लागले आहेत.—३/१, पृष्ठे १९-२२.

योना आणि प्रेषित पेत्र यांची उदाहरणे आपल्याला, यहोवाच्या नजरेतून इतरांना पाहण्यास कशाप्रकारे मदत करतात?

योना आणि पेत्र या दोघांच्याही विचार करण्याच्या पद्धतीत चुका होत्या तसेच विश्‍वास व आज्ञाधारकता यांबाबतीत त्यांच्यावर परीक्षा आल्या तेव्हा त्यांनी चुकीची प्रतिक्रिया दाखवली. तरीसुद्धा, यहोवाने त्यांच्यातील चांगले गुण पाहिले आणि आपल्या सेवेसाठी तो त्यांचा उपयोग करून घेत राहिला. इतरांमुळे आपल्याला दुःख होते किंवा आपण निराश होतो तेव्हा पूर्वी आपल्याला दिसलेल्या त्यांच्या चांगल्या गुणांवर आणि यहोवा पाहत असलेल्या त्यांच्यातील चांगुलपणावर आपले लक्ष केंद्रित करू या.—३/१५, पृष्ठे १६-१९.

अनेक बायबल भाषांतरांत, स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातील क्रमांकांत फरक का आहे?

मूळ इब्री भाषेतील पुस्तक आणि त्याचे सेप्टुआजिंटमध्ये केलेल्या ग्रीक भाषांतरातील क्रमांकांत फरक आहे. अलीकडील भाषांतरांत, इब्री पाठाच्या आधारानुसार किंवा सेप्टुआजिंटच्या आधारानुसार क्रमांकांत फरक असेल.—४/१, पृष्ठ ३१.