व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘पाहा! मोठा लोकसमुदाय!’

‘पाहा! मोठा लोकसमुदाय!’

परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहा

‘पाहा! मोठा लोकसमुदाय!’

कित्येक दशके यहोवाचे सेवक एका प्रश्‍नामुळे गोंधळात पडले होते. बायबलच्या आधारावर या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा कित्येक वर्षांपासून प्रयत्न केला जात होता. हा प्रश्‍न वारंवार चर्चेचा विषय बनला होता. पण शेवटी त्याचे बायबल आधारित उत्तर सापडले; १९३५ साली, वॉशिंग्टन डी.सी. येथील एका अधिवेशनात या प्रश्‍नाचे उत्तर मिळाल्यावर उपस्थितांमध्ये जणू उत्साहाची लाट पसरली.

या सर्व वादविवादाला कारणीभूत ठरलेला प्रश्‍न असा होता: प्रकटीकरण ७:९ येथे उल्लेख केलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायात’ कोण सामील आहेत? या समूहातील विश्‍वासू लोक स्वर्गात जातील का?

जुना प्रश्‍न

प्रेषित योहानाच्या काळापासून आपल्या काळापर्यंत ख्रिस्तीजनांना, “मोठा लोकसमुदाय” कोणाच्या संदर्भात म्हटले आहे याविषयी शंका होती. बायबल विद्यार्थी असे समजत होते की हा स्वर्गात जाणारा दुय्यम दर्जाचा समूह असावा; त्यांच्या मते या समूहातील लोकांना बायबल सत्याचे ज्ञान तर होते पण या ज्ञानाचा प्रसार करण्यात हे लोक भाग घेत नव्हते.

परंतु, अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांच्या सोबत्यांपैकी काहीजण प्रचार कार्यात अतिशय आवेशी बनले. शिवाय, त्यांना स्वर्गात जाण्याची आस नव्हती. खरे तर, १९१८ पासून १९२२ पर्यंत यहोवाच्या लोकांनी सादर केलेल्या “आज जीवित असलेले लाखो लोक कधी मरणारच नाहीत” या जाहीर भाषणाला अनुलक्षून त्यांची आशा होती. या लोकांना पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद लाभणार होता.

टेहळणी बुरूज (इंग्रजी), ऑक्टोबर १५, १९२३ च्या अंकात येशूने दिलेल्या शेरड्यांच्या व मेंढरांच्या दृष्टान्ताची चर्चा करण्यात आली होती. त्यात असे म्हटले होते: “मेंढरे राष्ट्रांतील अशा सर्व लोकांना सूचित करतात, जे आत्म्याने अभिषिक्‍त नाहीत पण ज्यांची धार्मिक प्रवृत्ती आहे; ते आपल्या मनात येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारतात आणि त्याच्या राज्याखाली चांगल्या परिस्थितीत राहण्याची आशा धरतात.”—मत्तय २५:३१-४६.

आणखी प्रकाश

दोषनिवारण (इंग्रजी) भाग एक, या १९३१ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात यहेज्केल ९ व्या अध्यायाची चर्चा करण्यात आली आणि यात असे सांगण्यात आले, की या जगाच्या अंतातून बचावण्याकरता ज्यांच्या कपाळावर चिन्ह करण्यात येते तेच लोक येशूच्या दृष्टान्तातील मेंढरे आहेत. दोषनिवारण भाग तीन (१९३२ साली प्रकाशित), यात गैरइस्राएली यहोनादाबच्या शुद्ध मनोवृत्तीविषयी वर्णन करण्यात आले; खोट्या उपासकांचा नाश करण्यात इस्राएलचा अभिषिक्‍त राजा येहू याचा आवेश पाहण्याकरता यहोनादाब त्याच्या रथावर चढून त्याच्या सोबत गेला होता. (२ राजे १०:१५-२८) या पुस्तकात असे सांगण्यात आले: “यहोनादाबने सध्या पृथ्वीवर असलेल्या अशा लोकांच्या वर्गाला पूर्वसूचित केले जे सैतानाच्या संघटनेपासून वेगळे झाले आहेत व ज्यांनी धार्मिकतेची बाजू घेतली आहे; प्रभू या लोकांचा हर्मगिदोनाच्या वेळेस बचाव करेल, त्यांना त्या संकटाच्या काळातून निभावून नेईल आणि पृथ्वीवर त्यांना सार्वकालिक जीवन देईल. या लोकांच्या वर्गालाच ‘मेंढरे’ म्हणण्यात आले आहे.”

पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या ख्रिश्‍चनांनी यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घ्यावा असे १९३४ सालीच टेहळणी बुरूज यात स्पष्ट करण्यात आले होते. पार्थिव आशा असलेल्या या वर्गासंबंधी उत्तरोत्तर अधिक प्रकाश मिळू लागला होता!—नीतिसूत्रे ४:१८.

स्पष्टीकरणाचा तेजस्वी प्रकाशझोत

प्रकटीकरण ७:९-१७ या वचनांचा अर्थ लवकरच अगदी तेजस्वी प्रकाशाप्रमाणे स्पष्ट होणार होता. (स्तोत्र ९७:११) टेहळणी बुरूज नियतकालिकात अशी आशा व्यक्‍त करण्यात आली होती की अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे आयोजित केलेले मे ३० ते जून ३, १९३५ पर्यंतचे अधिवेशन यहोनादाब वर्गाद्वारे सूचित होणाऱ्‍या लोकांकरता “खऱ्‍या अर्थाने सांत्वनदायक आणि लाभदायक” ठरेल. आणि खरोखर असेच घडले!

“मोठा लोकसमुदाय” असे शीर्षक असलेल्या एका प्रेरणादायक भाषणात जे. एफ. रदरफोर्ड यांनी जवळजवळ २०,००० उपस्थितांना बायबलमधील पुरावा दाखवून हे समजावून सांगितले की आधुनिक काळातील “दुसरी मेंढरे” आणि प्रकटीकरण ७:९ येथे उल्लेख केलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायात’ काही फरक नाही. (योहान १०:१६) भाषणाच्या समारोपास वक्‍त्‌याने विचारले: “पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा बाळगणारे कृपया उभे राहतील का?” उपस्थितांपैकी अधिकांश लोक उभे राहिले, तेव्हा रदरफोर्ड यांनी म्हटले “पाहा! मोठा लोकसमुदाय!” क्षणभर सभागृहात शांतता पसरली आणि मग सर्वजण मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागले. दुसऱ्‍या दिवशी ८४० नवीन साक्षीदारांचा बाप्तिस्मा झाला आणि यांतील अधिकांश मोठ्या लोकसमुदायातील होते.

उल्लेखनीय वाढ

सन १९३५ च्या आधी बायबलच्या संदेशाविषयी आस्था दाखवणाऱ्‍यांपैकी अशा लोकांची संख्या वाढत चालली होती जे सुवार्तेच्या प्रचारकार्यात आवेशी होते आणि ज्यांना पृथ्वीवर परादीसात सर्वकाळ जगण्याची आशा होती. त्यांना स्वर्गात जाण्याची इच्छाच नव्हती कारण देवाने त्यांना स्वर्गीय जीवनाची आशा दिलेली नव्हती. या लोकांनी स्वतःला दुसऱ्‍या मेंढरांच्या मोठ्या लोकसमुदायात सामील असल्याचे दाखवले. यामुळे असे सूचित झाले, की १९३५ सालापर्यंत १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे पाचारण जवळजवळ संपुष्टात आले होते.—प्रकटीकरण ७:४.

दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा दियाबल सैतानाने मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांना एकत्रित करण्याच्या कामात अडथळे आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. राज्य प्रचाराच्या कार्यावर बऱ्‍याच देशांत बंदी आणण्यात आली. त्या कठीण काळात, जे. एफ. रदरफोर्ड यांनी जानेवारी १९४२ साली आपल्या मृत्यूच्या काही काळाआधीच असे म्हटले की “‘मोठा लोकसमुदाय’ फारसा मोठा होईल असे दिसत नाही.”

पण देवाच्या आशीर्वादामुळे या उलटच घडले आहे. अभिषिक्‍त आणि त्यांचे सोबती, अर्थात दुसरी मेंढरे, ‘परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहून’ त्यांना सोपवलेले शिष्य बनवण्याचे काम पूर्ण करत आहेत. (कलस्सैकर ४:१२; मत्तय २४:१४; २८:१९, २०) १९४६ सालापर्यंत जगभरात प्रचार करणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांची संख्या १,७६,४५६ होती—आणि यांपैकी अधिकांश लोक मोठ्या लोकसमुदायाचे होते. २००० साली, २३५ देशांत विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करणाऱ्‍या साक्षीदारांची संख्या ६०,००,००० पेक्षा अधिक होती—खरोखर एक मोठा लोकसमुदाय! आणि ही संख्या वाढतच आहे.