व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संकटांच्या विळख्यात जग

१ | आरोग्य जपा

१ | आरोग्य जपा

हे महत्त्वाचं का आहे?

जेव्हा एखादं संकट किंवा विपत्ती येते तेव्हा लोकांच्या आरोग्यावर तिचा वेगवेगळ्या मार्गांनी परिणाम होत असतो.

  • कठीण परिस्थिती येते तेव्हा तणाव वाढतो आणि तो जास्त काळ राहिला की आपण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

  • नैसर्गिक विपत्ती किंवा महामारीसारखी संकटं येतात तेव्हा खूप लोक आजारी पडतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भार वाढतो आणि औषधोपचार मिळणं कठीण होऊन जातं.

  • विपत्तीचा लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. आणि यामुळे पौष्टिक अन्‍न आणि औषधांसारख्या आवश्‍यक गोष्टीसुद्धा मिळवणं त्यांना कठीण होतं.

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

  • गंभीर आजार आणि मानसिक तणावामुळे आपण सहसा चुकीचे निर्णय घेतो. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेकारक असणाऱ्‍या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपली तब्येत आणखीनच बिघडते.

  • आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

  • तुमचं आरोग्य जितकं चांगलं असेल तितकं संकटांदरम्यान चांगले निर्णय घेणं तुम्हाला शक्य होईल.

  • तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली, तरी आरोग्य जपण्यासाठी तुम्ही योग्य ती पावलं उचलू शकता.

तुम्ही आत्ता काय करू शकता?

जेव्हाही शक्य असतं तेव्हा सूज्ञ माणूस पुढे येणारे धोके ओळखून त्यांना टाळण्यासाठी योग्य ती पावलं उचलतो. हीच गोष्ट आरोग्याच्या बाबतीतही खरी आहे. चांगली स्वच्छता राखल्यामुळे तुम्ही बरेच आजार आणि त्यांचे गंभीर परिणाम टाळू शकता. उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही चांगला!

“स्वतःची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखल्यामुळे आपण डॉक्टर आणि औषध-पाण्याचा बराच खर्च वाचवू शकतो.”​—अमेय *

^ काही नावं बदलण्यात आली आहेत.