व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शोक करणाऱ्‍यांसाठी मदत

शोक करणाऱ्‍यांसाठी सर्वोत्तम मदत

शोक करणाऱ्‍यांसाठी सर्वोत्तम मदत

आपल्या प्रिय व्यक्‍तीला मृत्यूमध्ये गमावण्याच्या दुःखाबद्दल अलीकडे भरपूर संशोधन करण्यात आलं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तज्ज्ञ जो उत्तम सल्ला देतात तो बऱ्‍याचदा बायबलमध्ये असलेल्या सुज्ञ सल्ल्याशी मेळ खातो. यावरून कळतं की बायबल जरी खूप वर्षांआधी लिहिलेलं असलं तरी त्यातले सल्ले आजही लागू होतात. पण यात फक्‍त भरवशालायक सुज्ञ सल्लेच नाहीत, तर अशी माहितीही दिली आहे जी आपल्याला कुठेच वाचायला मिळणार नाही. या माहितीमुळे दुःखात असणाऱ्‍यांना भरपूर प्रमाणात सांत्वन मिळू शकतं.

  • आपल्या प्रियजनांना कुठलाही त्रास होत नाही ही खातरी

    बायबलमध्ये उपदेशक ९:५ या वचनात असं म्हटलं आहे, की “मृतांस तर काहीच कळत नाही.” त्यांच्या “योजनांचा शेवट होतो.” (स्तोत्र १४६:४) तसंच, बायबल मृत्यूची तुलना एका शांत झोपेशी करते.​—योहान ११:११.

  • प्रेमळ देवावर भक्कम विश्‍वास ठेवल्यामुळे दिलासा

    बायबलमध्ये १ पेत्र ३:१२ या वचनात असं म्हटलं आहे: “यहोवाचे * डोळे नीतिमानांकडे लागलेले असतात आणि तो  त्यांच्या याचनेकडे कान लावतो,  पण वाईट गोष्टी करणाऱ्‍याकडे यहोवा पाठ फिरवतो.” प्रार्थना ही एक उपचारपद्धती किंवा विचार मांडण्याचा मार्ग नाही. खरंतर प्रार्थनेमुळे आपल्या निर्माणकर्त्यासोबत एक वैयक्‍तिक नातं जोडायला आपल्याला मदत होते. तो आपलं सांत्वन करण्यासाठी त्याच्या शक्‍तीचा वापर करू शकतो.

  • एका चांगल्या भविष्याची आशा

    एका अशा भविष्याची कल्पना करा जेव्हा मरण पावलेल्या लोकांना या पृथ्वीवर जिवंत करण्यात येईल. बायबलमध्ये बऱ्‍याच वेळा या अभिवचनाबद्दल सांगण्यात आलं आहे. त्या वेळी पृथ्वीवर कशी परिस्थिती असेल याबद्दल बायबल म्हणतं की देव आपल्या “डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल.”​—प्रकटीकरण २१:३, ४.

आपल्या मृत प्रिय जणांना पुन्हा पाहण्याची आशा असल्यामुळे यहोवावर विश्‍वास करणाऱ्‍या अनेक जणांना दुःखातून सावरायला खूप मदत मिळते. उदाहरणार्थ, ६५ वर्षं एकत्र संसार केल्यानंतर ॲनाचे पती वारले. ती म्हणते: “बायबलमध्ये मला ही खातरी मिळते की आपले प्रियजन यातना सहन करत नाहीत आणि देव त्याच्या स्मरणात असणाऱ्‍या सर्वांना पुन्हा जिवंत करणार आहे. मी जे गमावलं आहे त्याचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला देवाचं हे अभिवचन आठवतं. आणि यामुळे जीवनातल्या सर्वात मोठ्या दुःखातून सावरायला मला मदत मिळते.”

सुरुवातीच्या लेखात उल्लेख करण्यात आलेली टिना म्हणते: “टेरीला मी गमावलं पण देवाने माझी साथ कधीच सोडली नाही. या कठीण काळात यहोवा माझ्या पाठीशी होता हे मी अनुभवलं आहे. बायबलमध्ये असलेल्या मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याच्या अभिवचनावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. टेरीला पुन्हा भेटता येईल तो दिवस येईपर्यंत मला या आशेमुळे जीवन जगण्याची उमेद मिळते.”

अशाच भावना बायबलच्या अभिवचनावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या हजारो लोकांच्याही आहेत. तुम्हाला कदाचित बायबलची अभिवचनं खरी वाटत नसतील किंवा काल्पनिक वाटत असतील. असं असलं तरी बायबलमधील मार्गदर्शन आणि अभिवचनं खरी आहेत याच्या पुराव्यांचा तुम्ही एकदातरी अभ्यास करणं फायद्याचं ठरेल. आणि असं करताना कदाचित तुम्हाला जाणवेल की शोक करणाऱ्‍यांसाठी बायबलमध्ये सर्वोत्तम मदत दिली आहे!

मृत लोकांसाठी असलेल्या आशेबद्दल जास्त माहिती घ्या

jw.org या आमच्या वेबसाईटवर यासंबंधित व्हिडिओ पाहा.

आपल्या मृत प्रिय जणांना पुन्हा भेटण्याच्या आशेबद्दल बायबल आपल्याला अभिवचन देतं

मृत लोकांची काय अवस्था आहे?

मरणानंतर आपलं काय होतं? बायबल याचं स्पष्ट उत्तर देतं आणि यामुळे आपल्याला सांत्वन व आशा मिळते

‘लायब्ररी > व्हिडिओ’ इथे पाहा (व्हिडिओ विभाग: बायबल)

तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला आवडेल का?

सर्वत्र वाईट बातम्या ऐकायला मिळत असताना तुम्हाला आनंदाची बातमी कुठून मिळेल?

लायब्ररी > व्हिडिओ’ इथे पाहा (व्हिडिओ विभाग: आमच्या सभा आणि सेवाकार्य)

^ परि. 7 बायबलनुसार यहोवा हे देवाचं वैयक्‍तिक नाव आहे.