व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क्षमा करणं म्हणजे पेटलेली आग पाण्याने विझवणं

विवाहित जोडप्यांसाठी

४: क्षमाशीलता

४: क्षमाशीलता

याचा काय अर्थ होतो?

एखाद्याला क्षमा करणं म्हणजे झालेल्या चुकीकडे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या रागाच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं. पण क्षमा करणं म्हणजे, चुकीला कमी लेखणं किंवा ती झालीच नाही असं समजणं नव्हे.

बायबल तत्त्व: “कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचे सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.”—कलस्सैकर ३:१३.

“जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याच्या अपरिपूर्णतेकडे लक्ष केंद्रित करत नाही, तर ती किंवा तो कशा प्रकारची व्यक्‍ती बनण्याचा प्रयत्न करत आहे याकडे लक्ष देता.”—एरन.

हे का महत्त्वाचं?

आपण जर मनातून राग काढून टाकला नाही तर यामुळे आपण स्वतःला शारीरिक आणि भावनिक रीत्या इजा पोचवू शकतो. तसंच यामुळे आपला विवाहही धोक्यात येऊ शकतो.

“एकदा माझ्या पतीने मला दुखावलं आणि नंतर माझी क्षमा मागितली. पण त्याला माफ करणं मला कठीण गेलं. मी शेवटी त्याला क्षमा केली, पण नंतर मला याचा पस्तावा झाला की मी ते आधीच का केलं नाही. यामुळे आमच्या नातेसंबंधावर उगाचच ताण पडला.”—जुलिया.

तुम्ही काय करू शकता?

स्वतःचं परीक्षण करा

सोबत्याच्या वागण्या-बोलल्याने तुम्ही दुखावला असाल तर स्वतःला विचारा:

  • ‘मी लगेच मनाला लावून घेतो का?’

  • ‘चूक एवढी मोठी आहे का, की माझ्या सोबत्याने त्यासाठी माझी माफी मागितलीच पाहिजे? की मी त्याकडे दुर्लक्ष करू शकतो?’

तुमच्या जोडीदाराशी खालील प्रश्‍नांवर चर्चा करा

  • आपल्या दोघांना एकमेकांना क्षमा करायला किती वेळ लागतो?

  • लवकरात लवकर क्षमा करता यावी यासाठी आपण काय करू शकतो?

सल्ले

  • तुम्ही दुखावले जाता तेव्हा तुमच्या सोबत्याने तुम्हाला मुद्दामहून दुखावलं आहे, असा विचार करू नका.

  • तुमच्या सोबत्याचं वागणं लगेच मनाला लावून घेऊ नका. हे लक्षात असू द्या की “आपण सर्वच अनेकदा चुकतो.”—याकोब ३:२.

“चूक जेव्हा आमच्या दोघांची असते तेव्हा एकमेकांना क्षमा करणं सोपं जातं. पण एकाची चूक असते तेव्हा त्याला क्षमा करणं खूप कठीण जातं. आपला सोबती माफी मागतो तेव्हा त्याला माफ करणं यासाठी खऱ्‍या अर्थाने नम्र असण्याची आवश्‍यकता असते.”—किमया.

बायबल तत्त्व: लगेच “सलोखा कर.”—मत्तय ५:२५.

आपण जर मनातून राग काढून टाकला नाही तर यामुळे आपण स्वतःला शारीरिक आणि भावनिक रीत्या इजा पोचवू शकतो. तसंच यामुळे आपला विवाहही धोक्यात येऊ शकतो