व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. २ २०१८ | आनंदी कुटुंबाचं गुपित काय?

आनंदी कुटुंबाचं गुपित काय?

कुटुंबं कशामुळे तुटतात याची बरीच कारणं आपण ऐकली आहेत. पण कुटुंबं आनंदी कशामुळे होतात हे आपण जाणण्याचा प्रयत्न करू या.

  • अमेरिकेत १९९० ते २०१५ या सालादरम्यान ५० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या घटस्फोटाच्या प्रमाणात दुप्पटीने वाढ झाली आहे आणि ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या घटस्फोटाच्या प्रमाणात तीन पटीने वाढ झाली आहे.

  • पालक गोंधळात आहेत. कारण काही तज्ज्ञ म्हणतात की मुलांची सतत स्तुती केली पाहिजे, तर इतर तज्ज्ञ म्हणतात की त्यांना कडक शिस्त लावली पाहिजे.

  • यशस्वी होण्यासाठी लागणारी कौशल्यं विकसित न करताच तरुण प्रौढ होत आहेत.

तरीही, सत्य हेच आहे की . . .

  • विवाहबंधन आनंदी आणि कायमस्वरूपी टिकणारं बनू शकतं.

  • आपल्या मुलांना प्रेमाने शिस्त लावण्याचं पालक शिकू शकतात.

  • तरुण, प्रौढ होण्यासाठी लागणारी कौशल्यं शिकू शकतात.

हे सर्व कसं शक्य आहे? सावध राहा! च्या या अंकात अशा १२ गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे ज्यामुळे कुटुंबं आनंदी बनू शकतात.

 

१: वचनबद्धता

वैवाहिक बंधन मजबूत करण्यासाठी तीन व्यावहारिक मार्ग.

२: एकजूट

तुम्हाला तुमचा विवाह जोडीदार फक्‍त एका रूम पार्टनरसारखा वाटतो का?

३: आदर

काय केल्याने व बोलल्याने तुमच्या विवाह जोडीदाराला आदर मिळाल्यासारखा वाटेल हे जाणून घ्या.

४: क्षमाशीलता

आपल्या सोबत्याच्या अपरिपूर्णतांकडे लक्ष केंद्रित न करण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

५: संवाद

तीन महत्त्वपूर्ण पावलं उचलल्यामुळे तुमच्या मुलांशी तुमचं नातं घनिष्ठ होऊ शकतं.

६: शिस्त

शिस्त लावल्यामुळे मुलाचा आत्मसन्मान कमकुवत होतो का?

७: मूल्यं

तुमच्या मुलांना तुम्ही कोणती मूल्यं शिकवली पाहिजेत?

८: उदाहरण

मुलांनी तुमचं ऐकावं अशी जर तुमची इच्छा आहे, तर तुमचं वागणं तुमच्या बोलण्यानुसार असलं पाहिजे.

९: ओळख

आपल्या विश्‍वासांबद्दल तरुण ठाम भूमिका कशी घेऊ शकतात?

१०: भरवशालायक

प्रौढ बनण्यासाठी महत्त्वाची असलेली एक गोष्ट म्हणजे आईबाबांचा भरवसा मिळवणं.

११: मेहनत

तरुणपणी कष्ट करायला शिकल्यामुळे जीवनात यशस्वी व्हायला तुम्हाला मदत होईल.

१२: ध्येयं

ध्येयं पूर्ण केल्यामुळे तुमचा आत्मविश्‍वास, तुमची मैत्री आणि आनंद वाढू शकतो.

कुटुंबासाठी अधिक मदत

आनंदी वैवाहिक जीवनासाठी आणि आनंदी कुटुंबासाठी बायबलचा सल्ला तुम्हाला मदत करू शकतो.