व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

JW प्रसारण

Roku वर JW प्रसारण ॲप इंस्टॉल करा

Roku वर JW प्रसारण ॲप इंस्टॉल करा

Roku वर JW प्रसारण पाहण्याआधी तुम्हाला Roku प्लेअर सेट करावा लागेल आणि JW प्रसारण हा सॉफ्टवेअर इंस्टॉल करावा लागेल. खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा:

  • Roku प्लेअर सेट करा

  • कंप्यूटरवरून JW प्रसारण इंस्टॉल करा

  • Roku वरून JW प्रसारण इंस्टॉल करा

Roku प्लेअर सेट करा

Roku प्लेअर सेट करण्यासाठी आणि इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी त्या प्लेअरसोबत तुम्हाला काही सूचना मिळतील. Roku प्लेअर कनेक्ट केल्यावर स्क्रीनवर येणाऱ्‍या सूचनांचे पालन करून सेटअप पूर्ण करा.

नोंद: वरील सेटअप पूर्ण करण्याकरता तुम्हाला तुमच्या कंप्यूटरवरून किंवा मोबाईल उपकरणावरून इंटरनेट कनेक्शन लागेल.

सेटअप करताना तुम्हाला तुमच्या Roku प्लेअरला लिंक करण्यासाठी सांगितले जाईल. लिंक करण्याकरता www.roku.com/link या वेबसाईटवर जा आणि त्यातील कोड तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एन्टर करा. त्यानंतर तुमच्या कंप्यूटर किंवा मोबाईल उपकरण यांवरील सूचनांनुसार Roku अकाउंट क्रिएट करा.

तुमच्या अकाउंटला Roku प्लेअर लिंक केल्यानंतर तुमच्या टीव्हीची स्क्रीन रिफ्रेश होईल.

आणखी मदत हवी असेल तर पूर्ण सेटअप प्रक्रिया दाखवणारा Roku व्हिडिओ पाहा.

कंप्यूटरवरून JW प्रसारण इंस्टॉल करा

Roku प्लेअर हे व्हिडिओ (किंवा “चॅनल”) प्ले करणारे एक उपकरण आहे. तुम्हाला ज्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायचे असतील ते चॅनल्स ॲड करावे लागतील. तुमच्या कंप्यूटरवरूनदेखील तुम्ही नवीन चॅनल ॲड करू शकता.

  • कोणत्याही इंटरनेट ब्राउजरवरून Roku चॅनल स्टोरमध्ये जा आणि JW प्रसारण या पेजला भेट द्या.

  • तुम्ही तुमच्या Roku अकाउंटला लॉग-इन केले नसेल तर ते करा.

  • ॲड चॅनल या बटणावर क्लिक करा. चॅनल ॲड झाल्यानंतर हिरव्या रंगाचा ॲड चॅनल या बटणाचे नाव इन्स्टॉल्ड असे होईल.

वेब ब्राउजरवरून चॅनल ॲड केल्याने ते तुमच्या Roku प्लेअरवर इंस्टॉल होत नाही, ते फक्‍त त्यात ॲड होते. तुम्हाला तुमच्या Roku प्लेअरवर अलीकडेच ॲड केलेले चॅनल्स इंस्टॉल करावे लागतील.

  • तुमच्या Roku रिमोटवरील होम हा बटण दाबा.

  • अप किंवा डाऊन ॲरो यांचा वापर करून सेटिंग्समध्ये जा.

  • ओके बटण दाबा.

  • सेटिंग्स या पेजवर सिस्टम अपडेट दिसत नाही तोपर्यंत वर किंवा खाली जा आणि मग त्यावर आल्यावर ओक बटण दाबा. यानंतर सिस्टम अपडेटचा पेज लोड होईल. स्क्रीनच्या उजव्या बाजूला ठळकपणे चेक नाव्ह असे दिसेल.

  • ओके बटण दाबा.

आता Roku प्लेअर, तुम्ही आधी ॲड केलेले चॅनल चेक करून इंस्टॉल करेल.

  • परत Roku च्या होम स्क्रीनवर जा आणि मेन मेन्यूमधील माय चॅनल्स निवडा. Roku प्लेअरवर तुम्ही इंस्टॉल केलेले JW प्रसारण व इतर सर्व चॅनल्स या स्क्रीनवर तुम्हाला दिसतील.

  • jw.org च्या लोगोवर क्लिक करा आणि मग JW प्रसारण लॉन्च करण्यासाठी ओके या बटणावर क्लिक करा.

Roku वरून JW प्रसारण इंस्टॉल करा

तुम्ही थेटपणे तुमच्या Roku प्लेअरवरूनदेखील JW प्रसारण इंस्टॉल करू शकता.

  • Roku च्या होम स्क्रीनवर जा.

  • तुमच्या Roku रिमोटवरील अप किंवा डाऊन ॲरो यांचा वापर करून मेन मेन्यूवरील सर्च यावर जा.

  • ओके बटण दाबा.

Roku च्या सर्च स्क्रीनवर तुम्ही टाईप केलेल्या नावाशी जुळणारे चित्रपट, टीव्ही शो, नट, दिगदर्शक, गेम्स आणि चॅनल्स शोधू शकता. JW प्रसारण एक चॅनल आहे, त्यामुळे तो शोधताना त्याच्या बाजूला चॅनलचे सिम्बल दिसेल. JW प्रसारण शोधण्यासाठी खाली दिलेल्या कीवर्ड्‌सपैकी कोणताही एक कीवर्ड टाईप करा:

  • jw प्रसारण

  • jw.org

  • jwtv

  • Jehovah

  • रिझल्ट लिस्टमध्ये JW प्रसारण दिसेल्यानंतर तो चॅनल हायलाईट होईपर्यंत राईट ॲरो दाबत राहा आणि मग ओके बटण दाबा. आता ॲड चॅनल हा पर्याय हायलाइट झाला पाहिजे.

  • JW प्रसारण इंस्टॉल करण्यासाठी परत ओके बटण दाबा.

JW प्रसारण पाहण्यासाठी गो टू चॅनल यावर क्लिक करा किंवा Roku च्या होम स्क्रीनवर जाऊन माय चॅनल्स यामध्ये JW प्रसारण शोधा.