व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

alfa27/stock.adobe.com

स्मारकविधीची मोहीम

येशू गुन्हेगारीचा अंत करेल

येशू गुन्हेगारीचा अंत करेल

 गुन्हेगारी आणि अन्याय सहन करणं काय असतं हे येशूला चांगलं माहीत आहे. कारण त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले, बेकायदेशीरपणे मारहाण करण्यात आली, अन्यायीपणे खटला चालवण्यात आला आणि त्याला दोषी ठरवलं गेलं. मग शेवटी त्याला क्रूरपणे मारण्यातही आलं. त्याची काहीही चूक नसताना त्याने स्वतःहून निःस्वार्थपणे ‘बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून दिलं.’ (मत्तय २०:२८; योहान १५:१३) आता, तो देवाच्या राज्याचा राजा आहे आणि लवकरच संपूर्ण पृथ्वीवरून अन्याय आणि गुन्हेगारी कायमची काढून टाकणार आहे.—यशया ४२:३.

 येशू या गोष्टी करेल तेव्हा तो काळ कसा असेल याचं बायबलमध्ये खूप सुंदर वर्णन केलंय:

  •   “दुष्ट लोक नाहीसे होतील; त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी तू त्यांना शोधलंस, तरी ते तुला सापडणार नाहीत. पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.”—स्तोत्र ३७: १०, ११.

 येशूने आपल्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे, त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? लूक २२:१९ मध्ये येशूने त्याच्या शिष्यांना त्याच्या मृत्यूची आठवण करायला सांगितलं. त्यामुळे दरवर्षी यहोवाचे साक्षीदार त्याच्या मृत्यूच्या स्मारकविधीसाठी एकत्र जमतात. या वर्षी रविवार, २४ मार्च २०२४ ला आम्ही तुम्हाला आमच्यासोबत स्मारकविधीसाठी हजर राहायचं आमंत्रण देतो.

स्मारकविधीचं​ ठिकाण​ शोधा