व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान ३-४

येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो

येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो

४:६-२६, ३९-४१

येशूला कोणत्या गोष्टीमुळे अनौपचारिक रीतीने साक्ष देण्यासाठी मदत झाली?

  • ४:७—येशूने संभाषणाची सुरुवात देवाच्या राज्याविषयी सांगून किंवा मी मसीहा आहे असं सांगून नाही तर पाणी मागून केली

  • ४:९—ती स्त्री शोमरोनी जातीची आहे म्हणून येशूने भेदभाव केला नाही

  • ४:९, १२—ती स्त्री जेव्हा वाद होण्याची शक्यता असणाऱ्‍या मुद्द्‌यांबद्दल बोलली, तेव्हा येशू विचलित न होता विषयाला धरून राहिला.—मेरा चेला बन जा  अध्या. ८ परि. ३

  • ४:१०—येशूने त्या स्त्रीच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचा उपयोग करून संभाषण सुरू केलं

  • ४:१६-१९—जरी ती स्त्री अनैतिक जीवन जगत होती तरी येशू तिच्याशी आदराने वागला

या अहवालातून आपल्याला अनौपचारिक साक्षकार्याच्या महत्त्वाबद्दल काय समजतं?