व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नमुना सादरीकरणं

नमुना सादरीकरणं

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल? (T-३७ पत्रिका)

प्रश्न: कुटुंबांसाठी, तरुणांसाठी आणि मुलांसाठी भरवशालायक मार्गदर्शन मिळवणं किती सोपं आहे, याबद्दल आम्ही लोकांना सांगत आहोत. [घरमालकाला जास्त जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याला पत्रिका द्या.]

सादरता: [पत्रिकेचं दुसरं पान दाखवा.] jw.org या वेबसाईटवर असे काही लेख आणि व्हिडिओ आहेत, ज्यांमध्ये खूप चांगली माहिती आहे.

वचन: स्तो ११९:१०५

सत्य शिकवा

प्रश्न: तुम्हाला काय वाटतं, बायबलमध्ये दिलेली माहिती विज्ञानाशी जुळते का?

वचन: ईयो २६:७

सत्य: बायबलमधली विज्ञानाशी संबंधित असलेली माहिती अगदी अचूक आहे.

मंडळीच्या सभेची आमंत्रणपत्रिका (inv-MR)

सादरता: मी तुम्हाला शास्त्रावर आधारित एक भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करू इच्छितो. हे भाषण यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात दिलं जाईल. आणि यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही. [सभेची आमंत्रणपत्रिका द्या. मग घरमालकाला पत्रिकेतून आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सभेची वेळ आणि ठिकाण दाखवा. तसंच, जाहीर भाषणाचा विषयसुद्धा सांगा.]

प्रश्न: तुम्ही कधी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेला आहात का? [घरमालकाची परवानगी असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हा व्हिडिओ दाखवा.]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.