व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नमुना सादरीकरणं

नमुना सादरीकरणं

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-३५ पत्रिका)

प्रश्न: जगभरातले लोक मृत प्रियजनांच्या आठवणीत दरवर्षी काही दिवस पाळतात. तुम्हाला काय वाटतं, आपल्या मृत प्रियजनांना आपण परत भेटू शकतो का?

वचन: प्रेका २४:१५

सादरता: मृत जनांना पुन्हा जिवंत केलं जाईल या आशेबद्दल या पत्रिकेत सांगितलं आहे. या आशेमुळे तुम्हाला कसा फायदा होईल याबद्दलदेखील यात सांगितलं आहे. [शक्य असल्यास मृत लोकांसाठी काही आशा आहे का? हा व्हिडिओ दाखवा.]

सत्य शिकवा

प्रश्न: देवावर प्रेम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?

वचन: १यो ५:३

सत्य: देवाच्या आज्ञांचं पालन केल्याने, त्याच्यावर प्रेम असल्याचं आपण दाखवू शकतो.

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-३५ पत्रिका)

प्रश्न: तुम्हाला माहीत आहे का, की काही कासवं १५० वर्षं तर काही झाडं हजारो वर्षं जगतात. पण मानव फक्त ७० किंवा ८० वर्षं जगतात. मग मानवांचं आयुष्य इतकं कमी का?

वचन: उत्प ३:१७-१९

सादरता: मृत लोकांसाठी कोणती आशा आहे, हे या पत्रिकेत सांगितलं आहे.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.