व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाकडून पत्र

नियमन मंडळाकडून पत्र

यहोवावर प्रेम करणाऱ्यांनो:

“तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील,” असे येशूने म्हटले. (योहान ८:३२) किती प्रोत्साहनदायक हे शब्द आहेत. असत्याची भरभराट असलेल्या या कठीण ‘शेवटल्या काळीसुद्धा’ सत्य समजणे शक्य आहे. (२ तीमथ्य ३:१) देवाच्या वचनातील सत्य सर्वात प्रथम तुमच्या केव्हा लक्षात आले होते ते तुम्हाला आठवते का? तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला असेल.

सत्याचे अचूक ज्ञान असणे व ते इतरांना सांगण्यात भाग घेणे जितके आवश्यक आहे तितकेच या सत्यानुसार आपले आचरण असणे महत्त्वाचे आहे. यासाठी, आपण स्वतःला देवाच्या प्रेमात टिकवून ठेवले पाहिजे. म्हणजे नेमके केले पाहिजे? येशूने त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री दिलेल्या उत्तरात या प्रश्‍नाचे उत्तर आहे. त्याने आपल्या विश्वासू अनुयायांना असे सांगितले: “जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.”—योहान १५:१०.

आपल्या पित्याच्या आज्ञांचे पालन करून येशू त्याच्या प्रेमात टिकून राहिला. हीच गोष्ट आपल्याबाबतीतही खरी आहे. देवाच्या प्रेमात टिकून राहण्याकरता आपण आपल्या दररोजच्या जीवनात सत्याने वागले पाहिजे. सत्य आपल्याला बंधमुक्त करेल असे येशू ज्या दिवशी बोलला होता त्याच संध्याकाळी त्याने असे म्हटले: “जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.”—योहान १३:१७.

हे प्रकाशन तुम्हाला, दररोजच्या जीवनात सत्याने वागल्यामुळे “सार्वकालिक जीवनासाठी . . . देवाच्या प्रीतिमध्ये” राहण्यास मदत करेल, असे आम्हाला मनापासून वाटते.—यहूदा २१.

यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ