व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | चांगल्या लोकांसोबत वाईट का होते?

वाईट गोष्टींचा सुळसुळाट!

वाईट गोष्टींचा सुळसुळाट!

बांग्लादेशच्या ढाका शहरात राहणारी ३५ वर्षांची स्मिता * सगळ्यांच्याच मते खूप प्रेमळ व जीव लावणारी होती. नेहमी आनंदी असणारी ही तरुण विवाहित स्त्री किती कष्टाळू होती व देवाबद्दल शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगण्यास किती उत्सुक होती हेही सगळ्यांना माहीत होते. पण, अचानक तिला एक मोठा आजार झाला आणि एका आठवड्याच्या आतच ती दगावली. यामुळे तिच्या कुटुंबाला व मित्रांना जबरदस्त धक्का बसला.

जेम्स व त्याची बायको हे न्यू यॉर्कमध्ये राहणारे तिशीतले एक तरुण दांपत्य होते. त्यांचाही स्वभाव स्मितासारखाच होता. एकदा ते अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या आपल्या मित्रांना भेटायला गेले आणि पुन्हा कधीच घरी परतले नाहीत. मित्रांना भेटायला जाताना वाटेत एका भीषण वाहन अपघातात ते सापडले आणि प्रियजनांच्या व सहकर्मींच्या मनात पोकळी निर्माण करून गेले.

वाईट गोष्टी व दुःख किती वाढत आहे हे पाहण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही. युद्धांत सैनिकांसह सामान्य नागरिकांचाही बळी जातो. निरपराध लोक गुन्हेगारीचे व हिंसाचाराचे शिकार बनतात. जीवघेणे अपघात व भयंकर रोग सगळ्यांवरच घाला घालतात; ते व्यक्तीचे वय किंवा हुद्दा पाहत नाही. नैसर्गिक आपत्ती चांगल्या-वाईट लोकांत फरक न करता समाजचा समाज पुसून टाकतात. भेदभाव आणि अन्याय सर्वत्र पाहायला मिळतो. कदाचित वैयक्तिक पातळीवर तुम्ही स्वतः वाईट गोष्टी सोसल्या असतील.

त्यामुळे साहजिकच असे प्रश्न निर्माण होतात:

  • चांगल्या लोकांसोबत वाईट का होते?

  • त्यासाठी देव जबाबदार आहे का?

  • आपत्ती आकस्मिक असतात की मानव-निर्मित?

  • हे सगळे कर्माचे भोग आहेत का?

  • जगात एक शक्तिशाली परमेश्वर आहे तर मग तो चांगल्या लोकांचे वाइटापासून रक्षण का करत नाही?

  • वाईट गोष्टी व दुःख आपल्या जीवनातून कधी नाहीसे होईल का?

या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण आधी दोन मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळवली पाहिजेत: वाईट गोष्टी मुळात घडतातच का? देव लवकरच काय करणार आहे? (w14-E 07/01)

^ परि. 3 नावे बदलण्यात आली आहेत.