टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०१३

या अंकात सृष्टीतील अशा पुराव्यांचे परीक्षण करण्यात आले आहे ज्यांतून आपल्या देवाचे सामर्थ्य व बुद्धी दिसून येते. शिवाय, येशूने केलेल्या एका हृदयस्पर्शी प्रार्थनेच्या अनुषंगाने आपण कसे कार्य करू शकतो हेही जाणून घ्या.

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—फिलिपीन्झमध्ये

जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. कोणत्या गोष्टींमुळे काहींनी आपली नोकरी सोडली, मालकीच्या वस्तू विकल्या आणि ते फिलिपीन्झमधील दूरदूरच्या भागांत राहायला गेले त्याविषयी जाणून घ्या.

सृष्टी देवाच्या अस्तित्वाची साक्ष देते

आपण इतरांना आपल्या निर्माणकर्त्याबद्दलचे सत्य जाणून घेण्यास कसे साहाय्य करू शकतो आणि त्याच्यावरील आपला स्वतःचा विश्‍वास कसा दृढ करू शकतो हे जाणून घ्या.

“यहोवाचे दास बनून त्याची सेवा करा”

आपण सैतानाचे गुलाम बनण्याचे कसे टाळू शकतो? यहोवाचे दास बनून त्याची विश्‍वासूपणे सेवा केल्याने कोणते आशीर्वाद मिळतात?

जीवन कथा

यहोवावर विसंबून राहिल्यानं मिळणारे आशीर्वाद

मॅल्कम आणि ग्रेस ॲलन या दांपत्याने प्रत्येक ७५ पेक्षा जास्त वर्षे यहोवाची सेवा केली आहे. जे यहोवावर विसंबून राहतात त्यांना तो आशीर्वाद देतो हे त्यांना कशा प्रकारे शिकायला मिळाले ते वाचा.

एका अर्थभरीत प्रार्थनेतून शिकण्यासारखे धडे

लेव्यांच्या प्रार्थनेतून आपण कोणकोणते धडे घेऊ शकतो? आपण आपल्या प्रार्थना आणखी अर्थभरीत कशा बनवू शकतो?

येशूने केलेल्या हृदयस्पर्शी प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करा

येशूने प्रार्थना केली तेव्हा त्याने आपल्या वैयक्‍तिक इच्छेऐवजी यहोवाच्या इच्छेला जास्त महत्त्व दिले. आपण त्याच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने कसे कार्य करू शकतो?

इतरांना सावध करण्यासाठी तुम्ही आणखी जास्त प्रयत्न कराल का?

काहींनी त्यांच्या दैनंदिन कामांत कशा प्रकारे लोकांना साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे त्याविषयी जाणून घ्या.