व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचा अभ्यास अधिक आनंददायक व परिणामकारक बनवा

बायबलचा अभ्यास अधिक आनंददायक व परिणामकारक बनवा

बायबलचा अभ्यास अधिक आनंददायक व परिणामकारक बनवा

बायबलचा अभ्यास करताना आपण आणखी आनंद कसा प्राप्त करू शकतो? आपण अभ्यास आणखी परिणामकारक कसा बनवू शकतो? आपण अशा तीन महत्त्वपूर्ण पावलांची चर्चा करू या, जी आपल्याला बायबलच्या वैयक्‍तिक अभ्यासाचा पूर्णपणे फायदा घेण्यास मदत करतील.

१ प्रार्थना करा: पहिले पाऊल म्हणजे प्रार्थना करणे. (स्तो. ४२:८) प्रार्थना का केली पाहिजे? देवाच्या वचनाचा अभ्यास हा आपल्या उपासनेचा भाग आहे असा विचार आपण केला पाहिजे. म्हणून, आपले मन व हृदय तयार करण्यासाठी व पवित्र आत्म्यासाठी यहोवाला प्रार्थना करणे गरजेचे आहे. (लूक ११:१३) कित्येक वर्षांपासून मिशनरी असलेली बारबरा म्हणते: “मी बायबलचे वाचन किंवा अभ्यास करण्याआधी नेहमी प्रार्थना करते. त्यानंतर, यहोवा माझ्यासोबत आहे आणि मी जे करते ते त्याला पसंत आहे असं मला वाटतं.” अभ्यासापूर्वी केलेल्या प्रार्थनेमुळे आपले मन व हृदय खुले होते, ज्यामुळे आपल्यासाठी वाढून ठेवलेले मुबलक आध्यात्मिक अन्‍न आपण पूर्णपणे ग्रहण करू शकतो.

२ मनन करा: पुरेसा वेळ नसल्यामुळे, काही जण फक्‍त वरवर देवाच्या वचनाचे वाचन करतात. पण, बायबलचा अभ्यास केल्यामुळे त्यांना जे अनेक फायदे मिळाले असते ते बायबलचे वरवर वाचन केल्याने त्यांना मिळत नाहीत. कार्लोस, गेल्या ५० पेक्षा अधिक वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहेत. अभ्यास आणखी परिणामकारक बनवण्यास मनन करण्यासाठी वेळ काढणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव त्यांना झाली आहे. ते म्हणतात: “मी आता एका वेळी बायबलची केवळ काही पाने वाचतो म्हणजे प्रत्येक दिवशी एकदोन पाने वाचतो. यामुळे मी जे काही वाचले आहे त्यातून महत्त्वपूर्ण धडे शिकण्यासाठी मला मनन करायला जास्त वेळ मिळतो.” (स्तो. ७७:१२) आपण मनन करण्यासाठी वेळ काढतो, तेव्हा देवाच्या इच्छेविषयीचे आपले ज्ञान व समज आणखी वाढते.—कलस्सै. १:९-११.

३ लागू करा: एखाद्या कामाचे व्यावहारिक मोल आपल्याला समजते तेव्हा त्यापासून आपल्याला जास्त फायदा होतो. बायबल अभ्यासाविषयी हेच म्हणता येईल. गॅब्रिएल नावाचा एक तरुण बांधव नियमितपणे बायबलचा अभ्यास करतो. तो म्हणतो: “बायबलचा अभ्यास मला रोजच्या जीवनातील समस्यांचा सामना करण्यास मदत करतो व इतरांना मदत करण्यास मला तयार करतो. अभ्यासादरम्यान मी जे काही शिकतो ते मी माझ्या वैयक्‍तिक जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतो.” (अनु. ११:१८; यहो. १:८) होय, बायबलमध्ये देवाच्या ज्ञानाचा खजिना आहे; हे ज्ञान आपण आत्मसात करू शकतो व आपल्या जीवनात लागू करू शकतो.—नीति. २:१-५.

उजळणी: अगाध बुद्धीचा स्रोत असलेल्या यहोवाने जे ज्ञान दिले आहे त्याचा शोध घेण्याचा किती मोठा सुहक्क आपल्याला लाभला आहे! (रोम. ११:३३) म्हणून, पुढच्या वेळी तुम्ही अभ्यास करायला बसाल तेव्हा प्रथम, यहोवाला प्रार्थना करा आणि योग्य मनोवृत्तीसाठी व त्याच्या पवित्र आत्म्यासाठी त्याच्याजवळ विनंती करा. मग, वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी वेळोवेळी थांबा. तसेच, तुम्ही ज्या गोष्टी शिकलात त्या तुमच्या रोजच्या जीवनात लागू करत राहा. तुम्ही ही महत्त्वपूर्ण पावले उचलली, तर तुम्ही करत असलेला बायबलचा अभ्यास अधिक आनंददायक व परिणामकारक असल्याचे तुम्हाला जाणवेल.