व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चला, आपण यहोवाला भेट अर्पण करू या

चला, आपण यहोवाला भेट अर्पण करू या

चला, आपण यहोवाला भेट अर्पण करू या

एखादी व्यक्‍ती तुम्हाला दया दाखवते तेव्हा त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता कशी व्यक्‍त कराल? मिद्यानी लोकांबरोबर केलेल्या सशस्त्र युद्धानंतर इस्राएलच्या सेनापतींनी कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्‍त केली याचे एक उदाहरण विचारात घ्या. इस्राएली लोकांनी बआलपौरासंबंधी पाप केल्यानंतर हे युद्ध झाले होते. या युद्धात देवाने आपल्या लोकांना विजय मिळवून दिला, आणि लुटलेल्या वस्तूंची १२,००० सैनिकांमध्ये व बाकीच्या इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यात आली. यहोवाने सांगितल्यानुसार सैनिकांनी त्यांना मिळालेल्या हिश्‍शातून काही भाग याजकांना दिला. आणि इतर इस्राएल लोकांनी आपल्या हिश्‍शातून काही भाग लेव्यांना दिला.—गण. ३१:१-५, २५-३०.

पण, सेनापतींना आणखी बरेच काही देण्याची इच्छा होती. ते मोशेला म्हणाले: “जे सैनिक आमच्या स्वाधीन आहेत त्यांची मोजदाद तुझ्या दासांनी केली आहे; त्यांच्यापैकी एकहि कमी झालेला नाही.” त्यामुळे त्यांनी यहोवाला सोने व विविध प्रकारचे दागिने अर्पण करायचे ठरवले. या सोन्याच्या दागिन्यांचे एकूण वजन १९० किलोग्रॅम भरले.—गण. ३१:४९-५४.

त्याचप्रमाणे, आजही अनेक लोक यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल कृतज्ञता दाखवण्यास प्रवृत्त होतात. शिवाय, अशी कृतज्ञता केवळ देवाचे समर्पित सेवकच दाखवत नाहीत. एक उदाहरण विचारात घ्या. इटलीतील बोलोन्या या ठिकाणी एका स्टेडियममध्ये २००९ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला यहोवाच्या साक्षीदारांची ने-आण करण्यासाठी एका बसची व्यवस्था करण्यात आली होती. बस चालक शांत वृत्तीचा होता व त्याने सांभाळून बस चालवली होती. त्यामुळे त्या बसमधून प्रवास करणाऱ्‍या बंधुभगिनींनी त्याचे आभार व्यक्‍त करण्यासाठी एक भेट कार्ड, काही टिप व त्याबरोबर बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाची एक प्रत देण्याचे ठरवले. त्यावर बस चालक म्हणाला: “मी आनंदानं भेट कार्ड व ते पुस्तक घेईन, पण पैसे मी तुम्हाला परत करू इच्छितो कारण तुम्ही जे कार्य करत आहात ते पुढेही करत राहावे म्हणून मी हे दान देऊ इच्छितो. मी एक यहोवाचा साक्षीदार नसलो तरीही मला हे दान देण्याची इच्छा आहे कारण तुम्ही जे काही करता ते प्रेमापोटी करता हे मी पाहिलं आहे.”

यहोवाने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता दाटून येते तेव्हा जगभरात चाललेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यासाठी दान करण्याद्वारे तुम्ही ही कृतज्ञता व्यक्‍त करू शकता. (मत्त. २४:१४) काही जण, सोबतच्या चौकटीत सांगितलेल्या मार्गांनी दान देतात.

[२०, २१ पानांवरील चौकट]

दान देण्यासाठी काही जण निवडत असलेले मार्ग

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान

“जगभरात चाललेल्या कार्यासाठी” असे लिहिलेल्या दानपेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.

दर महिन्याला मंडळ्या ही रक्कम संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दानदेखील सरळ या शाखा कार्यालयांना पाठवले जाऊ शकते. (खालील मार्गांनी द्यावयाचे स्वेच्छिक दानदेखील तुमच्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला पाठवले जाऊ शकते.) चेक असतील तर ते “वॉच टावर”ला * देय असावेत. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तुसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्‍यक आहे.

सशर्त-दान योजना *

काही देशांमध्ये पैसे अशा खास योजनेत दान केले जाऊ शकतात ज्यामध्ये दात्याला ते हवे असल्यास परत केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुमच्या देशात कार्य करणाऱ्‍या स्थानिक शाखा कार्यालयाशी कृपया संपर्क साधावा.

धर्मादाय योजना *

पैशांची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता तुम्ही राहता त्या देशानुसार देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:

विमा: वॉच टावर संस्थेला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर संस्थेला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌सदेखील वॉच टावर संस्थेला थेट दान केले जाऊ शकतात किंवा मृत्यूनंतर हस्तांतर करण्यासाठी हिताधिकारी म्हणून वॉच टावर संस्थेला नामनिर्देशित केले जाऊ शकते.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती संस्थेच्या नावावर करून जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.

दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात पैसे किंवा सुरक्षितता वॉच टावर संस्थेच्या नावावर केली जाते. त्याच्या बदल्यात, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर संस्थेच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावर * संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. काही देशांत एखादी धार्मिक संस्था ट्रस्टची हिताधिकारी असल्यास करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात पण भारताच्या बाबतीत हे लागू होत नाही.

“धर्मादाय योजना” या शब्दांशावरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानाकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड * हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, याबाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते. माहितीपत्रक वाचल्यानंतर आणि स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांचा आणि धर्मादाय योजना कार्यालयाचा सल्ला घेऊन अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणारे कर फायदेदेखील वाढवता आले आहेत.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Jehovah’s Witnesses of India,

Post Box ६४४०,

Yelahanka,

Bangalore ५६० ०६४,

Karnataka.

Telephone: (०८०) २८४६८०७२

[तळटीपा]

^ परि. 10 भारतात हे चेक “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय असावेत.

^ परि. 11 भारताला हे लागू होत नाही

^ परि. 13 सूचना: कराच्या बाबत असलेले नियम विविध देशांत वेगवेगळे असतील. कराच्या नियमांविषयी व योजनेविषयी मत घेण्यासाठी कृपया तुमच्या अकाऊंटंटशी किंवा वकिलाशी संपर्क साधावा. शेवटचा निर्णय घेण्याआधी कृपया स्थानिक शाखा कार्यालयाशीदेखील संपर्क साधावा.

^ परि. 20 भारतात “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया” हे नाव वापरावे

^ परि. 21 भारतात उपलब्ध नाही