व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शाळेत यहोवाची स्तुती करणे

शाळेत यहोवाची स्तुती करणे

शाळेत यहोवाची स्तुती करणे

सबंध जगभरात, यहोवाच्या साक्षीदारांपैकी असणारी लहान मुले, शाळेत त्याची स्तुती करण्याचे निरनिराळे मार्ग शोधून काढताहेत. त्यांच्या बालसुलभ उत्साहाची प्रचिती देणारे काही अनुभव येथे दिले आहेत.

ग्रीसमध्ये एका लहान साक्षीदार मुलीला पृथ्वीच्या वातावरणाचे प्रदूषण या विषयावर एक निबंध लिहायला सांगण्यात आले होते. टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी) यात शोधल्यावर तिला संबंधित विषयावर एका सावध राहा! अंकात उपयुक्‍त माहिती सापडली. निबंधाच्या शेवटी तिने ही माहिती आपण सावध राहा! यातून घेतली आहे असा उल्लेख केला. तिच्या शिक्षिकेने तिला सांगितले की हा तिने आजपर्यंत वाचलेला सर्वोत्तम निबंध आहे. नंतर तिच्या शिक्षिकेने निबंधातील माहिती एका चर्चा परिषदेत वापरली आणि तेथेही या माहितीचे कौतुक करण्यात आले. या लहानशा साक्षीदार बहिणीने आपल्या शिक्षिकेला सावध राहा! याचे आणखी अंक आणून द्यायचे ठरवले. त्यांपैकी एक होता, “शिक्षक—नसते तर?” शिक्षिकेने सबंध वर्गात सावध राहा! नियतकालिकाची प्रशंसा केली आणि त्यामुळे काही विद्यार्थी या मासिकाची एक प्रत आपल्यालाही मिळू शकेल का असे विचारू लागले. विद्यार्थ्यांना निरनिराळे अंक वाचायला मिळावेत म्हणून बहिणीला मासिकाच्या अनेक प्रती शाळेत आणाव्या लागल्या.

बेनिन, आफ्रिका येथे एका किशोरवयीन मुलीला एका विचित्र प्रकारच्या दबावाला तोंड द्यावे लागले. नेहमीप्रमाणे, परीक्षेची तयारी करून घेण्याकरता मुलांना कठीण विषयांच्या शिकवणी लावण्यासाठी बऱ्‍याच विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी मिळून काही शिक्षकांना ठरवून घेतले. पण या शिक्षकांनी शनिवारी सकाळी शिकवणी ठेवल्या. साक्षीदार मुलीने मात्र आक्षेप घेतला: “शनिवारी सकाळी तर आमच्या पूर्ण मंडळीचे प्रचार कार्य असते. आठवडाभर मी या आनंदी प्रसंगाची वाटत पाहात असते. शनिवारी सकाळी मी त्याच्या बदली दुसरे काहीही करू शकणार नाही!” तिचे पिता एकटे पालक असून ते स्वतःही साक्षीदार आहेत. त्यांनी पालकांच्या व शिक्षकांच्या एका गटाला शिकवणीची वेळ बदलण्याची विनंती केली. पण कोणीही तयार झाले नाही. तेव्हा या लहान मुलीने शिकवणीशिवायच परीक्षेला बसायचे ठरवले. तिने आपल्या मंडळीसोबत प्रचाराला जाण्याचे सुरू ठेवले. तिच्या वर्गसोबत्यांनी तिची थट्टा केली आणि तिला तिचे साक्षकार्य आणि तिच्या देवालाही सोडून देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांना खात्री होती की ती परीक्षेत नक्कीच नापास होईल. पण झाले असे, की शिकवणी लावलेल्या त्या विशिष्ट गटातले सर्व विद्यार्थी नापास झाले पण आपली लहानशी साक्षीदार बहीण मात्र पास झाली. अर्थातच, यानंतर कोणीही तिची थट्टा केली नाही. आता विद्यार्थी तिला सांगताहेत, “तू आपल्या देवाची सेवा करत राहा.”

चेक गणतंत्रात एका १२ वर्षीय मुलीला कोणत्याही एका पुस्तकावर आधारित निबंध लिहायचा होता. तिच्या आईने तिला सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा उपयोग करण्याचे प्रोत्साहन दिले. या मुलीने एका प्रश्‍नाने आपल्या निबंधाची सुरुवात केली: “तुम्हाला काय वाटते, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य कोण?” मग तिने येशूविषयी, पृथ्वीवरील त्याच्या जीवनाविषयी आणि त्याच्या शिकवणुकींविषयी वर्णन केले. यानंतर “क्षमेविषयी धडा” या अध्यायाची तिने चर्चा केली. तिच्या शिक्षिकेने तिला उत्तम शेरा दिला व म्हटले की “हा तुझा सर्वात उत्कृष्ट निबंध आहे!” पुस्तकाची एक प्रत या शिक्षिकेला देण्यात आली तेव्हा तिने आनंदाने ती स्वीकारली. काही वर्गसोबत्यांनाही या पुस्तकाची प्रत हवी होती. दुसऱ्‍या दिवशी आपल्या लहानशा बहिणीला, एकूण १८ पुस्तके आपल्या वर्गसोबत्यांना देता आली तेव्हा तिला खूप आनंद वाटला.

तर अशाप्रकारे लहान मुले, मोठ्या आनंदाने शाळेत यहोवाची स्तुती करत आहेत. त्यांच्या बालसुलभ उत्साहाचे आपण सर्वांनी अनुकरण करावे. (w०५ ६/१५)