व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यशया ३०:२१ असे का म्हणते, की यहोवाचे वचन ‘तुझ्या मागून’ कानी पडेल कारण, आधीच्या वचनात तर यहोवा जणू काय पुढे आहे व असे म्हणत आहे, की “तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील”?

यशया ३०:२०, २१ म्हणते: “प्रभु तुम्हास भाकरीची टंचाई व पाण्याची कमताई करील, तरी यापुढे तुझे शिक्षक दृष्टिआड राहणार नाहीत; तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. ‘हाच मार्ग आहे; याने चला,’ अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.”

या वचनाचा अक्षरशः अर्थ घेतल्यास वाचक, महान शिक्षक यहोवाला त्याच्या पुढे पाहतो आणि यहोवाची वाणी मागून ऐकतो. परंतु, हे वचन लाक्षणिक आहे व त्याच अर्थाने ते समजलेही पाहिजे.

धन्याची चाकरी करणारा, धन्याच्या प्रत्येक सूचनेनुसार तत्परतेने कार्य करण्यास तयार असलेल्या सेवकाचे चित्र, २० व्या वचनामधील आलंकारिक शब्दांवरून आपल्याला दिसते. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी एक सेवक जसा त्याच्या हातांच्या हालचालींकडे लक्षपूर्वक पाहतो त्याप्रमाणे यहोवाचे लोक आज, आपल्या पृथ्वीवरील संघटनेद्वारे यहोवा देत असलेल्या प्रगतीशील बायबल आधारित सूचनांकडे लक्षपूर्वक पाहतात. (स्तोत्र १२३:१, २) होय, ते त्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतात, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ मिळणारी यहोवाची प्रत्येक सूचना ते तत्परतेने ऐकतात.—मत्तय २४:४५-४७.

मग, यहोवाचे सेवक मागून जी वाणी ऐकतात ती कशास सूचित करते? मागून येणारी वाणी ही, गतकाळातील यहोवाच्या वाणीला सूचित करते असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत असेल; हीच वाणी यहोवाने आपल्या वचनात लिहून ठेवली आहे आणि आपला ‘विश्‍वासू कारभारी’ याच्याकरवी ती समजावून सांगितली जात आहे. (लूक १२:४२) यहोवाचे आधुनिक दिवसांतील सेवक, बायबलचा मनःपूर्वक अभ्यास करण्याद्वारे व ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ अर्थात ‘विश्‍वासू कारभारी’ याने तयार केलेल्या प्रकाशनांच्या साहाय्याने बायबलच्या तत्त्वांचे आपल्या जीवनात अनुकरण करण्याद्वारे त्याची वाणी ऐकत आहेत. महान शिक्षक पुरवत असलेल्या शिक्षणावर अवलंबून राहण्याद्वारे, त्याची जाणीव ठेवण्याद्वारे, शतकांपूर्वी लिहिण्यात आलेल्या त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे त्याचे सेवक लाक्षणिक अर्थाने त्याला पुढे पाहतात आणि मागून त्याची वाणी ऐकतात.—रोमकर १५:४.