व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राज्य सभागृहे सर्वांसाठी खुली

राज्य सभागृहे सर्वांसाठी खुली

राज्य घोषकांचा वृत्तान्त

राज्य सभागृहे सर्वांसाठी खुली

सार्वजनिक सेवाकार्याकरता आपल्या शिष्यांना प्रशिक्षित करत असताना, येशू ख्रिस्ताने त्यांना सुवार्ता ‘छपरावरून गाजवण्याचे’ प्रोत्साहन दिले. (मत्तय १०:२७, ईझी टू रीड व्हर्शन) होय, त्याने त्यांना ख्रिस्ती सेवा उघडपणे, सर्वांच्या देखत करण्यास सांगितले. या सल्ल्याच्या अनुषंगाने, यहोवाचे साक्षीदार देखील आपले कार्य उघडपणे करतात. असे केल्यामुळे त्यांना विरोधाला तोंड देण्यास आणि लोकांच्या नजरेत स्वतःविषयी चांगले मत बनवण्यास मदत झाली आहे.

यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांत सर्वांना प्रवेश असूनही पूर्वग्रहामुळे काही लोक राज्य सभागृहांत यायला कचरतात. फिनलंड देशात हे पाहण्यात आले आहे. अर्थात, काही लोक कोणत्याही नवीन ठिकाणी जायला थोडे घाबरतात. नवे राज्य सभागृह बांधले जाते किंवा एखाद्या जुन्या सभागृहाचे नविनीकरण केले जाते तेव्हा या नव्या सभागृहाला भेट देण्याकरता सहसा खास सार्वजनिक आमंत्रण दिले जाते. राज्य सभागृहाच्या आसपासच्या परिसरातील लोकांना यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याविषयी माहिती करून घेण्याकरता निमंत्रित करण्याचा खास प्रयत्न केला जातो.

एका परिसरात, साक्षीदारांनी आपल्या नव्या सभागृहाच्या उद्‌घाटन प्रसंगी नियतकालिक वाटपाची मोहीम देखील आयोजित केली. या कार्यादरम्यान दोन साक्षीदारांना एक वयस्क गृहस्थ भेटले ज्यांनी सांगितले की त्यांनी टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिके वाचली होती व ती त्यांना आवडली. बांधवांनी त्यांना राज्य सभागृहाला भेट देण्याच्या सार्वजनिक निमंत्रणाविषयी सांगितले आणि त्यांना तेथे घेऊन जायलाही ते तयार झाले. ते गृहस्थ आनंदाने तयार झाले. त्यांची पत्नी हे संभाषण ऐकत होती आणि ती लगेच म्हणाली, “मला सुद्धा यायचंय!”

राज्य सभागृहात प्रवेश करताच त्यांनी चहुकडे नजर टाकली आणि म्हणाले: “अरे, हे तर काळं नाही. उलट, हे अतिशय सुंदर आहे आणि इथं अगदी प्रसन्‍न वातावरण आहे. मी तर ऐकलं होतं की राज्य सभागृहात काळोख असेल!” हे जोडपे काही वेळ राज्य सभागृहात थांबले आणि जाण्याआधी त्यांनी प्रदर्शनाकरता ठेवलेल्या साहित्यापैकी काही प्रकाशने मागून घेतली.

एका मंडळीने आपल्या नव्या राज्य सभागृहाच्या समर्पणाच्या कार्यक्रमाकरता स्थानिक वृत्तपत्रात सार्वजनिक आमंत्रणाची जाहिरात देण्याचे ठरवले. या कार्यक्रमाविषयी मुख्य संपादकांना सूचित करण्यात आले तेव्हा त्यांनी यासंदर्भात एक सविस्तर लेख लिहिण्याचे सुचवले. बांधवांना ही कल्पना आवडली आणि काही काळानंतर या वृत्तपत्रात अर्ध्या पानाचा एक उत्तम लेख प्रकाशित झाला. सदर लेखात सभागृहाच्या समर्पण कार्यक्रमाविषयी आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीच्या कार्यांविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

हा लेख प्रकाशित झाल्यानंतर एका वयस्क साक्षीदार बहिणीला त्या परिसरात राहणारी एक स्त्री भेटली. ती तिला म्हणाली: “आजच्या बातमीपत्रात यहोवाच्या साक्षीदारांविषयी एक सुरेख लेख आला होता!” बहिणीला त्या स्त्रीला साक्ष देण्याची संधी मिळाली आणि त्यासोबत तिने विसाव्या शतकात यहोवाचे साक्षीदार हे माहितीपत्रक देखील तिला दिले.

नव्या राज्य सभागृहांच्या संबंधाने अशाप्रकारे सार्वजनिक निमंत्रण आणि समर्पण समारोह आयोजित केल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांविषयी असलेले काही गैरसमज दूर करणे तर शक्य झालेच आहे पण त्यासोबत प्रचारकांनाही अधिकाधिक लोकांना सभांना येण्याचे निमंत्रण देण्याचे उत्तेजन मिळाले आहे. होय, यहोवाच्या साक्षीदारांची राज्य सभागृहे सर्वांकरता खुली आहेत, याचा फिनलंडप्रमाणेच इतर अनेक देशांत लोकांना प्रत्यय आला आहे.