व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

इतर धार्मिक गटाकडून एखादी इमारत खरेदी करून तिला राज्य सभागृह बनवल्याने तो संमिश्र विश्‍वास होतो का?

सहसा यहोवाचे साक्षीदार इतर धर्मांबरोबर अशाप्रकारचे व्यवहार टाळतात. आणि जरी त्यांनी असा व्यवहार केलाच तर तो संमिश्र विश्‍वास होत नाही. तो एकदाच केलेला सौदा असेल. यहोवाच्या साक्षीदारांची स्थानीय मंडळी इतर धार्मिक गटांबरोबर मिळून उपासनेसाठी एखादी इमारत बांधत नाहीत जेणेकडून दोन्ही गटांना तिचा वापर करता येईल.

यहोवाच्या नजरेत संमिश्र विश्‍वासाचे कृत्य म्हणजे काय? प्रेषित पौलाने याबाबतीत काय म्हटले ते पाहा: “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्‍यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्‍वास ठेवणारा व विश्‍वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? . . . म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभु म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन.’” (२ करिंथकर ६:१४-१७) “भागी” व “मिलाफ” हे शब्द वापरून पौलाला काय म्हणायचे होते?

पौलाने येथे उल्लेखलेली “भागी” यात, उपासनेचा व मूर्तीपूजक आणि सत्य न मानणाऱ्‍या लोकांबरोबरच्या धार्मिक व्यवहारचा स्पष्टपणे समावेश होतो. त्याने, ‘भुतांच्या मेजावरचे’ न खाण्याविषयी करिंथकरांना कडक ताकीद दिली. (१ करिंथकर १०:२०, २१) तेव्हा, संमिश्र विश्‍वासाचे कृत्ये म्हणजे, इतर धार्मिक संघटनांच्या उपासनेत भाग घेणे किंवा त्यांच्याबरोबर सहवास राखणे. (निर्गम २०:५; २३:१३; ३४:१२) एखादी धार्मिक संघटना वापरत असलेली इमारत खरेदी करण्यामागचा केवळ एक मुख्य हेतू असतो; तो म्हणजे राज्य सभागृहासाठी एक ठिकाण मिळवणे. आणि राज्य सभागृह म्हणून त्याचा वापर करण्याआधी, खोट्या धर्माशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी आधी काढून टाकल्या जातात. त्यानंतर राज्य सभागृह केवळ यहोवाच्या उपासनेसाठी म्हणून समर्पित केले जाते. अशारितीने, खऱ्‍या उपासनेत खोट्या उपासनेचा कसलाही मिलाफ किंवा सहभाग नसतो.

अशाप्रकारची खरेदी करताना, ज्यांच्याकडून खरेदी केली जाणार आहे त्या लोकांबरोबर केवळ कामापुरता कमीतकमी व्यवहार ठेवणे इष्ट ठरेल. ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांनी, “विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका,” या पौलाच्या ताकीदीकडे लक्ष दिले पाहिजे. इतर धार्मिक विश्‍वास बाळगणाऱ्‍या लोकांपेक्षा आपण स्वतःला श्रेष्ठ समजत नसलो तरी, त्यांच्यात मिसळण्याचे किंवा त्यांच्या उपासनेत सहभाग घेतल्याप्रमाणे त्यांच्या जवळ जाण्याचे आपण टाळतो. *

एखाद्या मंडळीने, कुठल्या तरी धार्मिक संघटनेशी संबंधित असलेली इमारत राज्य सभागृहासाठी म्हणून भाड्याने घेण्याविषयी शास्त्रवचनीय दृष्टिकोन काय आहे? भाड्याने म्हटले, की त्या लोकांबरोबर वारंवार संपर्क येत राहतो जो मुळात टाळला पाहिजे. आणि केवळ एखाद्या प्रसंगासाठीच अशी इमारत भाड्याने घ्यायची असली तरी, वडील वर्गाने पुढील गोष्टींचा विचार केला पाहिजे: इमारतीच्या आत किंवा बाहेर कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा धार्मिक चित्रे असतील का? आपण त्या इमारतीचा वापर करताना समाजातील लोक आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील? आपण ही इमारत वापरल्याने मंडळीतील कोणाला अडखळण होऊ शकेल का? (मत्तय १८:६; १ करिंथकर ८:७-१३) वडीलजन या सर्व गोष्टींचा विचार करून मग त्यानुसार निर्णय घेतात. अशाप्रकारची इमारत खरेदी करून तिला राज्य सभागृह बनवण्याचे ठरवताना, त्यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या विवेकाचा देखील विचार केला पाहिजे.

[तळटीप]

^ परि. 6 यहोवाला नापसंत असलेल्या संघटनांबरोबर व्यवहार ठेवणे कितपत योग्य आहे, याबाबतीत आणखी माहितीकरता टेहळणी बुरूज एप्रिल १५, १९९९ पृष्ठे २८ व २९ पाहा.

[२७ पानांवरील चित्र]

या इमारतीचा पूर्वी सिनगॉग म्हणून वापर होत असे पण नंतर ती खरेदी करून डागडुजी केल्यावर आता तेथे एक राज्य सभागृह आहे