व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका संपूर्ण जगाचा नाश!

एका संपूर्ण जगाचा नाश!

एका संपूर्ण जगाचा नाश!

आपल्या भोवतीचे जग पाहा. त्यातील शहरे, संस्कृती, विज्ञान क्षेत्रातील साध्यता, कोटी कोटींची लोकसंख्या. या जगाची स्थिरस्थावरता पाहून प्रभावित होणे सोपे आहे, नाही का? पण एखाद्या दिवशी हे जग पूर्णतः नाहीसे होईल अशी कल्पना तुम्हाला करवते का? कदाचित नाही. तथापि, एका विश्‍वसनीय पुराव्यानुसार, यापूर्वीही एक जग होते, आणि ते संपूर्णतः नष्ट करण्यात आले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आम्ही आदिमानवांच्या जगाविषयी बोलत नाही. नष्ट झालेले ते जग सुसंस्कृत, शहरे असलेले, कलेच्या क्षेत्रात पुढारलेले, वैज्ञानिक ज्ञानसंपदा असलेले जग होते. तरीपण, बायबलमधील अहवाल आपल्याला सांगतो की, कुलपिता अब्राहाम जन्मण्याच्या ३५२ वर्षांआधी, अचानक, दुसऱ्‍या महिन्याच्या १७ व्या दिवशी, एक प्रलय आला आणि त्यात संपूर्ण जग वाहून गेले. *

हा अहवाल खरा आहे का? अशी ही घटना खरोखरच घडली का? सध्याच्या जगाआधी खरोखर एक प्राचीन जग होते का, जे सुसंपन्‍न बनले आणि नंतर नष्ट झाले? तसे असल्यास, त्याचा अंत का झाला? नेमकी समस्या काय होती? त्याच्या नाशातून आपल्याला काही शिकता येते का?

एक प्राचीन जग खरोखर नष्ट झाले का?

एवढे मोठे महासंकट खरोखर घडले असते तर साहजिकच लोकांना त्याचा पूर्णपणे विसर पडणे शक्य नाही. त्यामुळेच, अनेक राष्ट्रांमध्ये त्या नाशाच्या आठवणी आहेत. उदाहरणार्थ, शास्त्रवचनांमधील ती अचूक तारीखच पाहा. प्राचीन दिनदर्शिकेतील दुसरा महिना म्हणजे सध्या ज्याला ऑक्टोबर महिना म्हणतात त्याच्या मध्यापासून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत. त्यामुळे १७ वा दिवस, अंदाजे, नोव्हेंबर १ तारखेशी जुळतो. म्हणून अनेक देशांमध्ये, मृतांसंबंधीचे सण वर्षाच्या त्या वेळी साजरे होतात हा निव्वळ योगायोग नसावा.

प्रलयाचे इतरही पुरावे मानवांच्या परंपरागत चालीरीतींमध्ये दिसून येतात. जवळजवळ प्रत्येक प्राचीन संस्कृतीत, एका जागतिक जलप्रलयातून काही पूर्वज बचावल्याची कथा आढळते. आफ्रिकी पीग्मी, युरोपमधील सेल्ट, दक्षिण अमेरिकेतील इंका—या सर्व लोकांमध्ये एकाच प्रकारच्या प्राचीन कथा आहेत; याच कथा अलास्का, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिकेतील काही भाग, चीन, न्यूझीलंड, भारत, मायक्रोनेशिया, मेक्सिको, आणि लिथुआनियामध्येही सापडतात.

अर्थात, काळपरत्वे त्या कथांमध्ये अतिशयोक्‍ती करण्यात आली, परंतु त्या सर्व कथांमधील वेगवेगळ्या माहितीतून एक समान गोष्ट दिसते आणि ती म्हणजे: मानवजातीच्या दुष्टाईमुळे देवाचा क्रोध भडकला. त्याने महाप्रलय आणला. संपूर्ण मानवजात नष्ट करण्यात आली. परंतु, काही नीतिमान लोकांचा बचाव झाला. या नीतिमान लोकांनी बांधलेल्या जहाजात त्यांचा आणि प्राण्यांचा बचाव झाला. कालांतराने, कोरडी जमीन शोधण्यासाठी पक्षी पाठवण्यात आले. शेवटी, हे जहाज एका डोंगरावर जाऊन टेकले. बाहेर आल्यावर वाचलेल्या लोकांनी एक अर्पण केले.

यातून काय सिद्ध होते? ही समानता योगायोगाची म्हणता येणार नाही. या सर्व कथांमधून मिळणारा संयुक्‍त पुरावा बायबलमधील प्राचीन साक्षीला पुष्टी देतो की, मानवजातीच्या जगाला नष्ट केलेल्या प्रलयामधून वाचलेल्यांद्वारे सर्व मानव आले आहेत. त्यामुळे, नेमके काय घडले हे जाणण्यासाठी आपल्याला काल्पनिक गोष्टींवर किंवा दंतकथांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. बायबलच्या इब्री शास्त्रवचनांमध्ये हा अहवाल जतन केलेला आहे.—उत्पत्ति, अध्याय ६-८.

बायबलमध्ये, जीवनाच्या उगमापासूनचा प्रेरित ऐतिहासिक अहवाल सापडतो. आणि पुरावा दर्शवतो की तो केवळ इतिहासच नाही. त्यातील सत्य भविष्यवाणी आणि गहन बुद्धी दाखवते की, त्याच्या दाव्यानुसार ते खरोखर देवाने मानवजातीला कळवलेले वचन आहे. बायबल हे दंतकथांप्रमाणे नाही; त्याच्या ऐतिहासिक अहवालांमध्ये नावे, तारखा त्याचप्रमाणे वंशाची आणि भौगोलिक तपशीले देखील दिली आहेत. प्रलयाआधी जीवन कसे होते आणि एक संपूर्ण जग अचानक नष्ट का करण्यात आले याविषयीची कल्पना ते देते.

प्रलयापूर्वीच्या त्या समाजात नेमकी कोणती समस्या होती? पुढील लेखात या प्रश्‍नाचे उत्तर दिले आहे. जे लोक सध्याच्या संस्कृतीचे भविष्य सुरक्षित आहे असे समजतात त्यांच्याकरता हा महत्त्वाचा प्रश्‍न ठरेल.

[तळटीप]

[४ पानांवरील तक्‍ता]

जलप्रलयासंबंधी जगभरात असलेल्या कथा

देश समानता १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०

ग्रीस ७ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

रोम ६ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

लिथुआनिया ६ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

अस्सिरिया ९ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

टान्झानिया ७ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

भारत - हिंदू ६ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

न्यूझीलंड - माओरी ५ ◆ ◆ ◆ ◆ ◆

मायक्रोनेशिया ७ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

वॉशिंग्टन अमेरिका - याकिमा ७ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

मिसिसिप्पी अमेरिका - चॉकटॉ ७ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

मेक्सिको - मिचोएकन ५ ◆ ◆ ◆ ◆ ◆

दक्षिण अमेरिका - क्वेचुआ ४ ◆ ◆ ◆ ◆

बोलिव्हिया - चिरीगुआनो ५ ◆ ◆ ◆ ◆ ◆

गयाना - अरावाक ६ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆

१:दुष्टाईमुळे देव क्रोधित

२:प्रलयाद्वारे नाश

३:देवाचा आदेश

४:देवाने पूर्वसूचना दिली

५:फार कमी मानव वाचले

६:जहाजाने वाचले

७:प्राणी वाचवण्यात आले

८:पक्षी किंवा इतर प्राणी बाहेर पाठवण्यात आले

९:शेवटी डोंगरावर येऊन टेकतो

१०:बलिदान अर्पिण्यात येते