व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी बेशुद्ध का पडतो?

मी बेशुद्ध का पडतो?

मी बेशुद्ध का पडतो?

डॉक्टरांना माझ्या डोळ्यातला दाब तपासायचा होता. यासाठी त्यांना एका उपकरणाने माझ्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करायचा होता. पण यामुळे मला काय होईल, हे मला माहीत होतं. असं नेहमीच होत असतं. रक्‍त तपासण्यासाठी नर्स जेव्हा सूई टोचते तेव्हाही असंच होत असतं. कधीकधी तर, नुसत्या जखमांविषयी बोलण्यानंसुद्धा असं होतं—म्हणजे मी बेशुद्ध पडतो.

एका ब्रिटिश अहवालानुसार, आपल्यासारखे ३ टक्के लोक, वर सांगितलेल्या कोणत्याही परिस्थितीत असतात तेव्हा बेशुद्ध पडतात. तुम्ही या श्रेणीतले असाल तर बेशुद्ध पडू नये म्हणून अनेक प्रयत्न केले असतील पण त्यांचा काही उपयोग झाला नसेल. लोकांमध्ये बेशुद्ध पडू नये म्हणून तुम्ही कदाचित बाथरूमपर्यंत चालत गेला असाल. पण हे बरोबर नाही. तुम्ही कदाचित बाथरूमपर्यंत जायच्या आतच बेशुद्ध पडला तर तुम्हाला कुठेही लागू शकते. मी इतक्यांदा बेशुद्ध पडलो आहे की, सरतेशेवटी मी यामागचं कारण शोधून काढायचं ठरवलं.

एका डॉक्टरांशी बोलल्यानंतर आणि काही पुस्तके चाळल्यावर मला समजले, की याला व्हॅसोव्हॅगल प्रतिक्रिया म्हणतात. शरीरातील रक्‍ताभिसरणासाठी असलेल्या यंत्रणेतील हा एक दोष समजला जातो. जसे की जेव्हा तुम्ही स्थिती बदलता, उदाहरणार्थ तुम्ही बसलेले असता व मग उभे राहता.

काही परिस्थितीत जेथे तुम्हाला रक्‍त पाहावे लागते किंवा तुमच्या डोळ्यांची तपासणी करावी लागते तेव्हा तुमचे तंत्रिका तंत्र तुमच्या इच्छेविरुद्ध वागते; तुम्ही बसलेले असता किंवा उभे असता तेव्हा तुमचे तंत्रिका तंत्र असे वागते जणू काय तुम्ही झोपलेले आहात. सुरुवातीला चिंतेमुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. मग तुमच्या नाडीचे ठोके अचानक कमी होतात आणि तुमच्या पायाकडे जाणाऱ्‍या रक्‍त पेशी, तुम्ही झोपता तेव्हा ज्याप्रमाणे विस्फारतात त्याप्रमाणे फैलावतात. त्यामुळे, तुमच्या पायांकडे रक्‍त पुरवठा वाढतो आणि डोक्याकडे कमी होतो. तुमच्या मेंदूला ऑक्सीजनचे जे प्रमाण मिळाले पाहिजे ते मिळत नाही आणि तुम्ही बेशुद्ध पडता. असे होऊ नये म्हणून तुम्ही काय करण्याचे टाळू शकता?

रक्‍त तपासणीसाठी तुमचे रक्‍त काढले जात असते तेव्हा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी पाहू शकता किंवा मग त्याप्रसंगी पाठीवर झोपू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे, व्हॅसोव्हॅगल प्रतिक्रिया सुरु होण्याआधी तुम्हाला त्याआधीची काही लक्षणे दिसतील ज्यावरून तुम्ही सावध होऊ शकाल. त्यामुळे तुम्ही बेशुद्ध पडण्याआधी तुमच्याकडे कार्य करण्यासाठी सहसा पुरेसा वेळ असतो. पुष्कळ डॉक्टर असे सुचवतात, की तुम्ही खाली झोपून पाय एखाद्या खुर्चीवर ठेवावेत अथवा भिंतीला टेकवावेत. यामुळे तुमचे सगळे रक्‍त पायांत उतरणार नाही आणि कदाचित तुम्हाला, व्हॅसोव्हॅगल प्रतिक्रिया पूर्णपणे अनुभवावी लागणार नाही. काही मिनिटांतच तुम्हाला कदाचित बरे वाटू लागेल.

या माहितीने जशी मला मदत झाली आहे तशी तुम्हालाही झाली तर, तुम्ही देखील व्हॅसोव्हॅगल प्रतिक्रियेची लक्षणे ओळखू लागाल. आणि मग तुम्ही त्वरित कार्य करू शकता व ती प्रतिक्रिया सुरू होण्याआधी ती थांबवू शकता.—सौजन्याने. (g ४/०७)

[१४ पानांवरील संक्षिप्त आशय]

तुम्हाला तपासले जात असते तेव्हा पाठीवर झोपणे उचित असेल