व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या, आणि हे जाहीर भाषण ऐका: “आपण कोणाच्या आज्ञेत राहिले पाहिजे?”

या, आणि हे जाहीर भाषण ऐका: “आपण कोणाच्या आज्ञेत राहिले पाहिजे?”

या, आणि हे जाहीर भाषण ऐका: “आपण कोणाच्या आज्ञेत राहिले पाहिजे?”

कोणाच्या तरी आज्ञेत राहण्याची कल्पनाच पुष्कळ लोकांना पचत नाही. ‘मला माझ्या मर्जीप्रमाणे वागण्यासाठी स्वतंत्र राहायचंय’ असा सर्वसामान्य दृष्टिकोन आहे. पण खरे तर, आपल्या दररोजच्या जीवनात आपण आज्ञाधारकपणाची कदर करतो. जेव्हा जेव्हा तुम्ही इशाऱ्‍याकडे कान देता किंवा सूचनांचे पालन करता तेव्हा तेव्हा तुम्ही काही प्रमाणात आज्ञाधारकता दाखवता. मानव समाजात सुव्यवस्था आणि शांती हवी तर लौकिक अधिकाऱ्‍यांच्या नियमांच्या आज्ञेत राहिले पाहिजे, ही गोष्ट कोण अमान्य करेल का? सर्व लोकांनी जर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास नकार दिला तर काय होईल याची जरा कल्पना करून पाहा!

पण मानव जेव्हा इतरांवर अधिकार गाजवू लागतात तेव्हा मात्र त्याचे परिणाम नेहमीच चांगले नसतात. अनेक युगांपूर्वी बायबलमध्ये असे लिहिण्यात आले: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उपदेशक ८:९) पण, आपण ज्याच्यावर भरवसा करू शकतो व ज्याच्या आज्ञेत राहू शकतो असा कोणी पात्र शासक आहे का? आहे तर, आपण त्याला कसे ओळखू शकतो? आणि त्याच्या शासनात आपण कशाची अपेक्षा करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरे “आपण कोणाच्या आज्ञेत राहिले पाहिजे?” या लक्षवेधक जाहीर भाषणात दिली जातील. हे भाषण, या महिन्याच्या सुरुवातीपासून यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेनात दिले जाईल. अशाप्रकारची शेकडो अधिवेशने संपूर्ण जगभरात भरवली जातील. तुम्हाला कोणते ठिकाण जवळ पडेल, हे शोधून काढण्यासाठी तुमच्या क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा किंवा पृष्ठ ५ वर या मासिकाच्या प्रकाशकांना लिहा. (g०५ ५/२२)