व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

साज-शृंगार “बायबलचा दृष्टिकोन: साज-शृंगार करण्यात मर्यादेची आवश्‍यकता” (ऑक्टोबर-डिसेंबर, २०००) या लेखाच्या संदर्भात मी हे पत्र लिहीत आहे. उचित साज-शृंगार सुंदर आहे—ती एक कला आहे. समाज कदाचित माझ्याकडे बोट दाखवेल किंवा माझ्या स्वरूपावरून माझ्याबद्दल काही मत बनवेल परंतु देवाला मी प्रिय आहे हे मला ठाऊक आहे. माझ्या गोंदणाकडे लोकांनी लक्ष देऊ नये तर माझे आंतरिक व्यक्‍तिमत्त्व पाहावे असे मला वाटते.

के. एम., अमेरिका

शरीरावर गोंदून घेणे किंवा न घेणे ही एक व्यक्‍तिगत बाब आहे हे त्या लेखात मान्य करण्यात आले होते. परंतु, आपले आंतरिक सौंदर्य दाखवण्याचा एक मार्ग आहे, ‘आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवणे.’ (१ तीमथ्य २:९) बायबल असेही स्पष्टपणे सांगते की, ख्रिश्‍चनाला फक्‍त स्वतःच्याच नव्हे तर “दुसऱ्‍याच्या” विवेकाचाही विचार केला पाहिजे. (१ करिंथकर १०:२९)—संपादक. (g०१ ४/८)

लैंगिक अत्याचार “तरुण लोक विचारतात . . . लैंगिक अत्याचाराला मी कसे तोंड द्यावे?” (ऑक्टोबर-डिसेंबर, २०००) या लेखाबद्दल मी आपले आभार मानू इच्छितो. मी अनैतिक संबंध ठेवत नसल्यामुळे शाळेमध्ये मला वाटेल ती नावे ठेवण्यात येत होती. शाळा संपल्यावर मला वाटले की, आता मला कोणी त्रास देणार नाही; पण पुष्कळ मुलींनी अश्‍लील प्रस्ताव मांडले आहेत. माझ्या ख्रिस्ती विश्‍वासांबद्दल सगळ्यांना माहीत करून दिल्यामुळे मला या प्रस्तावांना नकार देण्याची ताकद मिळाली आहे. अशाप्रकारचे आध्यात्मिक भोजन देत राहण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

एच. सी. झांबिया (g०१ ४/२२)

या लेखामुळे मला खूपच मदत मिळाली. तिसरीच्या माझ्या वर्गातला एक मुलगा मला एकटक पाहत राहतो. पण आता काय करावे हे मला माहीत झालंय.

एच. के., अमेरिका (g०१ ४/२२)

हा लेख अगदी वेळेवर आला! माझ्या कामाच्या ठिकाणी मला लैंगिक अत्याचार सहन करावा लागतो. मी खूपच तणावात होते. मला ही स्थिती एकदम असह्‍य झाली तेव्हाच हा लेख आला. आता, कामाच्या ठिकाणी लोकांशी कसे वागावे हे मला कळाले आहे.

एल. टी., अमेरिका (g०१ ४/२२)

नर्सेस गेल्या तीन वर्षांपासून मी नर्सिंग करत आहे. आजारी आणि त्रासलेल्या लोकांची काळजी घेणे सोपे काम नाही. “नर्सेस—नसत्या तर!” (जानेवारी-मार्च २००१) या लेखमालेतून इतरांनाही आमच्या कामाची प्रशंसा वाटते हे वाचून किती छान वाटले! शिवाय, लवकरच नर्सेसची गरज भासणार नाही या बायबलमधल्या आशेमुळे अधिकच प्रोत्साहन मिळते.—यशया ३३:२४.

जे.एस.बी., ब्राझील (g०१ ७/८)

माझे पती आणि मी बाह्‍य रुग्णांकरता नर्सिंगची एक सेवा चालवतो आणि ही लेखमाला वाचून आम्हाला खरोखर उत्तेजन मिळाले. आमच्या पेशाबद्दलचा आणि रुग्णांबद्दलचा दृष्टिकोन सुधारण्यास आम्हाला मदत मिळाली. तुम्ही खरोखर उत्तम कामगिरी बजावली आहे!

एस. एस., जर्मनी (g०१ ७/८)

या हृदयस्पर्शी लेखांबद्दल तुमचे धन्यवाद. नर्सिंगमुळे मी बऱ्‍याच गोष्टींमध्ये प्रौढ बनले आहे. नर्सिंगमुळे मी जीवनाच्या उद्देशाविषयी विचार करू लागले आणि बायबलचा अभ्यास करू लागले. सावध राहा! मासिकाच्या या अंकाने माझी सर्वात जास्त प्रशंसा केल्यासारखे मला वाटले आहे. बऱ्‍याच काळापर्यंत मला या लेखांतून उत्तेजन मिळेल.

जे. डी., प्रजासत्ताक (g०१ ७/८)

या लेखमालेबद्दल तुमचे आभारी आहे. मी बऱ्‍याच वर्षांपासून रेजिस्टर्ड नर्स म्हणून काम केले आहे. माझ्या रुग्णांबद्दल मला इतकी सहानुभूती वाटते की, त्यांच्या डोळ्यांमध्ये औषध टाकताना माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहात नाहीत. सावध राहा! मासिकाच्या या अंकाबद्दल संपूर्ण जगभरातील नर्सेस चांगला प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे.

एल.ए.आर., अमेरिका (g०१ ७/८)