व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगातील जवळजवळ एक तृतीयांश लोकांना टीबी

चाळीस देशांतील ८६ आरोग्य तज्ज्ञांनी आपल्या एका अहवालात म्हटले: १९९७ मध्ये जगातील जवळजवळ एक तृतीयांश लोकांना (१८६ कोटी) टीबी झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, यावर्षी १८.७ लाख लोक टीबीमुळे मरण पावले आणि त्याच वर्षी ७९.६ लाख नवीन टीबी केसेसची नोंद करण्यात आली. “यांपैकी, ८० टक्के केसेस २२ राष्ट्रांमध्ये आढळल्या. आणि यांतील निम्मे रुग्ण ५ आशियाई देशांतील आहेत,” असे द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनने म्हटले. याच अभ्यासानुसार टीबी संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या १० देशांपैकी नऊ देश आफ्रिकेतील आहेत. एचआयव्ही संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या देशांत टीबीमुळे दगावणाऱ्‍या लोकांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक होती. या देशांमध्ये रोगांवर “योग्यरीतीने नियंत्रण” न ठेवल्यामुळे टीबी असलेल्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. अभ्यास करणाऱ्‍यांचा अंदाज आहे, की या वर्षी जवळजवळ ८४ लाख लोकांना टीबी होण्याची शक्यता आहे. आपल्याला टीबी झाला आहे हे पुष्कळ लोकांना तर कळणारही नाही. पण योग्य आहार न घेतल्यास किंवा रोगप्रतिकार शक्‍ती कमी झाल्यास त्यांच्या शरीरातील टीबीचे सुप्तावस्थेतील जीवाणू पुन्हा जिवंत होतील.

पेंगणाऱ्‍या ड्रायव्हरविरुद्ध झिंगणारे ड्रायव्हर

द न्यू यॉर्क टाईम्स बातमीपत्र म्हणते, “पुरेशी झोप न घेता गाडी चालवल्यामुळे होणारे परिणाम, दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्‍या परिणामांच्या बरोबरीचे आहेत.” स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने दोन गटाच्या लोकांचा अभ्यास केला. एका गटात ११३ लोक होते ज्यांना एपनिया (एक प्रकारचा निद्रानाश) झाला होता. त्यामुळे त्यांना रात्री झोप येत नव्हती, पण दिवसा मात्र ते पेंगत असत. आणि दुसऱ्‍या गटात ८० लोक होते ज्यांना ४० टक्के अल्कोहोलचे प्रमाण असलेली दारू पाजण्यात आली. मग या दोन्ही गटांच्या “सात चाचण्या घेण्यात आल्या. सातापैकी तीन चाचण्यांमधून असे समजले, की ज्यांना निद्रानाशामुळे दिवसा झोप येत होती त्या लोकांची अवस्था दारू प्यायलेल्या लोकांपेक्षा खूपच वाईट होती. अमेरिकेतील १६ राज्यांत असा कायदा आहे, की एखाद्याच्या रक्‍तात .०८ टक्के अल्कोहोल असल्यास त्या मनुष्याचे गाडी चालवणे बेकायदेशीर आहे,” असे टाईम्सने म्हटले. चाचण्या घेणारे अध्यक्ष, डॉ. नेलसन बी. पोवल यांच्या मते, डोळ्यांवर झापड येते तेव्हा गाडी चालवणे अत्यंत धोखादायक आहे.

‘टीव्ही शिवाय मजाच नाही!’

तुम्हाला एखाद्या सामसुम बेटावर काही काळ पाठवले तर तुम्ही तुमच्यासोबत काय न्याल? जर्मनीतील २,००० युवकांना असा प्रश्‍न विचारण्यात आला. बहुतेक युवकांना, टीव्ही, रेडिओ, सिडी, कॅसेट्‌स या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या वाटतात, असे वृत्त वेस्टफॉलिस्शे रुंटशौ या वृत्तपत्राने दिले. मग, खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि कुटुंबातील सदस्य. एका १३ वर्षीय मुलाने म्हटले: “टीव्ही शिवाय मजाच नाही.” एक तृतीयांश मुलांनी म्हटले, की ते आपल्यासोबत चाकू, कुदळ, करवत यांसारखी कामी येणारी साधने नेतील. फक्‍त ०.३ मुलांनी म्हटले की ते आपल्यासोबत बायबल नेतील. या सर्वेतील सर्वात लहान मुलगी जी सात वर्षांची आहे ती म्हणाली: “मी फक्‍त माझ्या आईला सोबत नेईन, ती असल्यावर मला आणखी काही नको.”

मुले आणि धार्मिक कार्यक्रम

“मुले धार्मिक कार्यक्रमांना जातात का?” हा प्रश्‍न कॅनडियन सोशियल ट्रेन्ड्‌स नावाच्या पुस्तकात विचारण्यात आला आहे. तेच पुस्तक या प्रश्‍नाचे उत्तर देते, की कॅनडाच्या आकडेवारी विभागाच्या मते, “कॅनडामध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी ३६ टक्क्यांपेक्षा जास्त मुले महिन्यातून एकदा तरी धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात; यापैकी, बहुतेक मुले दर आठवड्यात धार्मिक कार्यक्रमाला जातात. याव्यतिरिक्‍त, २२ टक्के मुले, वर्षांतून एकदाच धार्मिक कार्यक्रमाला जातात.” पण त्या लेखाने दाखवून दिले, की “अँग्लिकन व युनाएटेड चर्चच्या कार्यक्रमांना मुलांची उपस्थिती कमी (१८ टक्के) असते.” रोमन कॅथलिक मुलांची उपस्थिती त्यामानाने जरा बरी आहे, कारण २२ टक्के मुले दर आठवड्याला धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात. मुस्लिम मुलांची धार्मिक सभांना दर आठवडी ४४ टक्के हजेरी असली तरी, सर्वे घेण्याच्या आधीच्या वर्षी मात्र “३९ टक्के मुले त्यांच्या धार्मिक सभांना जात नव्हती. आणि त्यावर्षी मुले धार्मिक सभांना न येण्याची आजपर्यंतची सर्वात जास्त टक्केवारी होती.”