व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही सहन करत असलेल्या दुःखाबद्दल देवाला काय वाटतं?

तुम्ही सहन करत असलेल्या दुःखाबद्दल देवाला काय वाटतं?

काही लोक मानतात की देवाचं आपल्या दुःखांकडे लक्ष नाही आणि त्याला आपली पर्वा नाही.

बायबल काय सांगतं यावर विचार करा

  • देवाचं आपल्यावर लक्ष असतं आणि तो आपली काळजीसुद्धा करतो

    “परमेश्‍वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत.” हे पाहून “परमेश्‍वराला वाईट वाटले.”—उत्पत्ति ६:५, ६, ईझी-टू-रीड व्हर्शन.

  • देव सर्व दुःखांचा अंत करेल

    “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:१०, ११.

  • देव तुमच्याबद्दल काय इच्छितो?

    “परमेश्‍वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन.”—यिर्मया २९:११, १२.

    “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.”—याकोब ४:८.