व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

पॅमेला नावाच्या एका स्त्रीला एक गंभीर आजार झाला होता आणि त्यासाठी ती उपचार घेत होती. पण उपचारासोबतच ती देवाला प्रार्थनाही करत होती. होणारा त्रास सहन करायचं बळ त्याने द्यावं अशी विनंती ती करत होती. मग प्रार्थना केल्यामुळे तिला काही फायदा झाला का?

पॅमेला म्हणते, “कॅन्सरवर उपचार घेताना मला बऱ्‍याचदा खूप भीती वाटायची. पण यहोवा देवाला प्रार्थना केल्यावर मला खूप शांत वाटायचं. आणि त्या परिस्थितीचा सामना करायला मला बळ मिळायचं. मला अजूनही खूप त्रास होतो, नाही असं नाही. पण प्रार्थनेने मला आयुष्याकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवलं. मी कशी आहे, असं लोक मला विचारतात, तेव्हा मी त्यांना म्हणते, ‘मला बरं तर वाटत नाही, पण मी आनंदी आहे.’”

पण एखादा गंभीर आजार झाल्यावरच किंवा एखादं मोठं संकट कोसळल्यावरच आपण प्रार्थना केली पाहिजे असं नाही. आपल्या सगळ्यांनाच, लहान-मोठ्या अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, आणि त्या वेळी आपल्याला मदतीची खूप गरज असते. मग प्रार्थना आपल्याला मदत करू शकते का?

बायबलमध्ये म्हटलं आहे, “तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे, म्हणजे तो तुला सांभाळेल. नीतिमान माणसाला तो कधीच पडू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) खरंच, किती दिलासा देणारे शब्द आहेत हे! आपण जर योग्य प्रकारे देवाला प्रार्थना केली, तर समस्यांचा सामना करण्यासाठी लागणारी मदत तो आपल्याला नक्कीच देईल.—“ प्रार्थनेमुळे मिळणारी मदत,” ही चौकट पाहा.