व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हे सगळं फक्‍त एका गोड हसण्यामुळे झालं!

हे सगळं फक्‍त एका गोड हसण्यामुळे झालं!

फिलिपीन्झ देशात यहोवाचे साक्षीदार एका व्यापारी क्षेत्रात ट्रॉली लावून साक्षकार्य करत होते. दोन मुली तिथून जात होत्या. आणि त्यांची नजर ट्रॉलीवर पडली. त्या ट्रॉलीजवळ तर गेल्या नाहीत; पण त्यांचं लक्ष ट्रॉलीजवळ उभ्या असलेल्या हेलन नावाच्या बहिणीकडे गेलं. कारण त्यांना पाहून ती बहीण खूप गोड हसली. त्या मुली पुढे निघून गेल्या. पण हेलनचं ते गोड हसणं त्यांच्या मनात घर करून गेलं.

नंतर त्या मुली बसनी घरी जात होत्या, तेव्हा वाटेत त्यांना एक राज्य सभागृह दिसलं. तिथे jw.org चा बॉर्ड लावला होता. त्यांना आठवलं की ट्रॉलीवरसुद्धा हेच लिहिलं होतं. त्यामुळे त्या बसमधून उतरल्या आणि सभागृहाजवळ गेल्या. गेटजवळ वेगवेगळ्या मंडळ्यांच्या सभांचे दिवस आणि वेळा दिल्या होत्या.

त्या दोघी जणी पुढच्या सभेला आल्या. आणि विचार करा, राज्य सभागृहात आल्यावर त्यांना कोण दिसलं. त्यांना हेलन दिसली! तिचा हसरा चेहरा पाहून त्यांना लगेच आठवलं, की ही तीच आहे जी आपल्याला ट्रॉलीजवळ दिसली होती. हेलन म्हणते: “त्या सरळ माझ्याकडे आल्या, तेव्हा मला जरा भीतीच वाटली. आपलं काही चुकलं की काय असं मला वाटलं.” पण त्या मुलींनी सगळा किस्सा हेलनला सांगितला.

त्यांना ती सभा आणि तिथले लोक खूप आवडले. तिथे त्यांना खूप आपलेपणा वाटला. सभेनंतर इतरांना राज्य सभागृहाची साफसफाई करताना पाहून, ‘आम्हीपण मदत करू का?’ असं त्यांनी विचारलं. त्यातली एक मुलगी तर सध्या फिलिपीन्झमध्ये राहत नाही. पण दुसरी मुलगी सभांना येऊ लागली आणि तिने बायबल अभ्यासही सुरू केला आहे. हे सगळे फक्‍त एका गोड हसण्यामुळे झालं!