टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑगस्ट २०१७

या अंकात २५ सप्टेंबर-२२ ऑक्टोबर २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

तुम्ही धीराने वाट पाहण्यास तयार आहात का?

‘आम्ही आणखी किती वेळ धीराने समस्या सहन करायच्या?’ असा प्रश्न यहोवाच्या अनेक विश्वासू सेवकांनी त्याला विचारला. पण अशा वेळी यहोवा त्यांच्यावर रागावला नाही.

“सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती”

आपल्याला सामना कराव्या लागणाऱ्या अनपेक्षित चिंतांना आणि समस्यांना यहोवा का अनुमती देतो, असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? जर असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर कोणत्या गोष्टीमुळे यहोवावर पूर्ण विश्वास ठेवायला आणि संकटांचा सामना करायला तुम्हाला मदत मिळू शकेल, या प्रश्‍नाचं उत्तर या लेखात देण्यात आलं आहे.

जीवन कथा

परीक्षेत टिकून राहिल्याने आशीर्वादच मिळतात

साइबीरियात हद्दपार करण्यात आलेले काही लोक, मेंढराच्या शोधात असले तरी गायींविषयी का चौकशी करत होते? या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हाला पावेल आणि मारिया सिवूलस्की यांच्या जीवन कथेतून मिळेल.

आपण जुनं व्यक्तिमत्त्व काढून ते दूर कसं ठेवू शकतो?

जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकणे आणि ते नेहमी स्वतःपासून दूर ठेवणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण वाईट सवयींमध्ये कितीही गुरफटलेले असलो, तरी जुनं व्यक्तिमत्त्व काढून ते दूर ठेवणं आपल्याला कसं शक्य होऊ शकतं?

आपण नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करून कसं ठेवू शकतो?

आपण नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करावं आणि चांगली व्यक्ती बनावं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. यहोवाच्या मदतीने आपण अशा प्रकारची व्यक्ती बनू शकतो. या लेखात दिलेले काही व्यावहारिक मार्ग लक्षात घ्या ज्यामुळे आपल्याला करूणा, दया, नम्रता आणि सौम्यता हे गुण दाखवण्यास मदत मिळेल.

प्रेम—एक मौल्यवान गुण

शास्त्रवचनांतून स्पष्ट होतं, की प्रेम हा गुण यहोवाच्या पवित्र आत्म्यामुळे उत्पन्न होतो. पण, प्रेम म्हणजे काय? आपण हा गुण कसा विकसित करू शकतो? आणि दररोजच्या जीवनात तो कसा दाखवू शकतो?

आपल्या संग्रहातून

“आता आपलं पुढचं संमेलन केव्हा असणार आहे?”

१९३२ मध्ये मेक्सिको सिटीत भरवण्यात आलेलं अधिवेशन साक्षीदारांसाठी इतकं महत्त्वाचं का होतं?

वाचकांचे प्रश्न

येशूच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल मत्तयच्या अहवालामध्ये दिलेली माहिती ही लूकच्या अहवालापेक्षा वेगळी का आहे?