टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०१६

या अंकात २८ नोव्हेंबर-२५ डिसेंबर २०१६ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

जीवन कथा

चांगल्या उदाहरणांचं अनुकरण करण्याचा अतोनात प्रयत्न

प्रौढ ख्रिश्चनांकडून मिळणाऱ्या आध्यात्मिक मदतीमुळे इतरांना जीवनात चांगली ध्येयं ठेवण्यास मदत होते. इतरांनी आपल्यासमोर मांडलेल्या चांगल्या उदाहरणांमुळे कसा फायदा झाला आणि यामुळे दुसऱ्यांनाही आध्यात्मिक मदत करण्यास आपण कसे प्रेरित झालो हे थॉमस मॅक्लेन यांच्या शब्दांत वाचा.

विदेशी लोकांवर दया दाखवा

विदेशी लोकांप्रती यहोवा देवाचा काय दृष्टिकोन आहे? दुसऱ्या देशातील एखादी व्यक्ती आपल्या मंडळीत आल्यास, तिला आपलेपणाची जाणीव व्हावी यासाठी तुम्ही काय करू शकता?

परकीय भाषेतील क्षेत्रात सेवा करताना आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवा

स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची आध्यात्मिकता टिकवून ठेवणं ही प्रत्येक ख्रिश्चनाची पहिली जबाबदारी आहे. पण परकीय भाषिक मंडळीत सेवा करताना याबाबतीत तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागत असेल.

व्यावहारिक ज्ञान मिळवा आणि सांभाळून ठेवा

एखाद्या गोष्टीची फक्त माहिती असणे किंवा त्याविषयी समज असणे यापेक्षा व्यावहारिक ज्ञान कसं वेगळं आहे? आणि हे समजून घेतल्यास आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

भविष्यातील आशेवर आपला विश्वास मजबूत करा

प्राचीन काळातील आणि आज आपल्या काळातील विश्वासाच्या बाबतीत अप्रतिम उदाहरणं मांडलेल्यांकडून आपण धडा शिकू शकतो. तुम्ही तुमचा विश्वास कसा मजबूत करू शकता?

देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवा

विश्वास म्हणजे नेमकं काय? आणि तो तुम्ही कसा दाखवू शकता?

तुम्हाला माहीत होतं का?

पहिल्या शतकात यहुदीयामध्ये रोमन साम्राज्याने यहुदी अधिकाऱ्यांना किती प्रमाणात स्वातंत्र्य दिलं होतं? प्राचीन काळात खरोखरच लोक दुसऱ्याच्या शेतात निदण पेरत असतील का?