मोशे आणि अहरोन यांनी खूप धैर्य दाखवलं
मोशे आणि अहरोन यांच्या काळात फारो हा जगातला सगळ्यात शक्तिशाली राजा होता. पण ते त्याच्याशी खूप धैर्याने आणि निर्भयपणे बोलले. त्यांना असं का करता आलं? मोशेबद्दल बायबल म्हणतं: “विश्वासानेच त्याने इजिप्त देश सोडला. पण त्याने राजाच्या क्रोधाला भिऊन असं केलं नाही. तर जो अदृश्य होता त्याला पाहत असल्यासारखा तो विश्वासात खंबीर राहिला.” (इब्री ११:२७) मोशे आणि अहरोन यांचा यहोवावर मजबूत विश्वास होता आणि ते त्याच्याच मदतीवर अवलंबून राहिले.
कोणत्या परिस्थितींमध्ये एखाद्या अधिकाऱ्यासमोर आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी तुम्हाला धैर्य दाखवावं लागू शकतं?